AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर पेट्रोल ओतलं अन्…भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल…महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच खळबळ

Dharashiv Bhuvikas Bank female employee poured petrol: महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमातच मोठा गोंधळ उडाला. भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन....

अंगावर पेट्रोल ओतलं अन्...भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल...महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच खळबळ
धाराशिवमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न
| Updated on: May 01, 2026 | 11:57 AM
Share

Maharashtra Din Program: आज 1 मे रोजी सगळीकडे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. शासकीय स्तरावर कार्यक्रम सुरू आहेत. पण धाराशिवमध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमातच मोठा गोंधळ उडाला. येथील भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. सेवेत कायम करण्यासाठी ही महिला गेल्या काही दिवसांपासून मागणी करत आहे. आज तिने शासकीय कार्यक्रम सुरू असताना अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून घेतले. याप्रकारामुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली.

पेट्रोल ओतून घेतले पेटवून

शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी महिला कर्मचार्‍याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये महिला 70 टक्के भाजल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बेबी किसनराव पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी त्या भूविकास बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. अनुकंपा तत्वावर त्यांना भूविकास बँकेत नोकरी मिळाली होती. इतर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तर पाटील यांना थकीत वेतन आणि इतर प्रलंबित लाभ मिळालेले नाहीत. त्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने आणि सरकार दरबारी दाद मिळत नसल्याने निराशा आली होती. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल टाकल्याचे समजते.

1 मे रोजी ध्वजारोहणचा कार्यक्रम सुरू असतानाच बेबी पाटील यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलीस आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर पाटील यांना उपचारासाठी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

भूविकास बँका बंद झाल्यानंतर इतर सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी मागील तीन वर्षापासून महिलेचे प्रयत्न सुरू आहेत. तर आता जिल्हा उपनिबंधक यांच्यावर महिलेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आत्मदहनामध्ये भाजलेल्या महिलेवर धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे. महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता