Laxman Hake: सहकारी बँकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कुठं गेलं? लक्ष्मण हाके आक्रमक, म्हणाले- आमदार-खासदारांच्या मुलांसाठी…
Laxman Hake On OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर उपसमितीच्या उत्तरांवर लक्ष्मण हाके नाराज आहेत. लक्ष्मण हाकेंनी सहकार कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील काही ठिकाणी सहकारी बँकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यानंतर आता लक्ष्मण हाकेंनी यावर एक वक्तव्य केले आहे. ते चर्चेत आले आहे. सहकारी बँकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कुठं गेलं? असा सवाल करत लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी आमदार खासदारांवर टीका केली आहे. तसेच एक खळबळजनक विधान केले आहे.
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, चंद्रशेखरबावनकुळे हे उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बैठका घेतल्या आहेत. मात्र ज्या घडामोडी घडतात त्यावर आम्ही समाधानी नाही. प्रशासनाला काय करायचं हे कळत नाही. आम्ही नोकरीमधलं रिप्रेझेंटेशन मागितलं. त्याबाबत माहिती नाही. आरक्षणाबाबत उत्तर मागितली. ते या मला कळत नाही. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जात नाहीत.
त्या संदर्भात उपसमितेकडे आम्ही चर्चा केली. पण आता उपसमिती सचिवांकडे हा मुद्दा घेऊन गेले आहेत. आम्हाला प्रॉपर पद्धतीने उत्तर मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका सध्या होत आहेत. ओबीसीचे आरक्षण या निवडणुकांमध्ये लागू करण्यात यावं, ही मागणी आमची होती. महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. दोन जिल्ह्याची आकडेवारी मी याबाबत देतो. सांगलीतील 21 जागांपैकी एसटीला एक ओबीसी एक आणि व्हीजेएनटीला एक अशा तीनच जागा मिळाल्या, असं हाके म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, साताऱ्यात व्हीजेएनटीला एक आणि ओबीसी एक आणि एससीला एक अशा जागा देण्यात आल्या. सोलापूरला ओबीसीला एकच जागा होती. तर त्यावर राजन पाटील यांच्या पुत्राने अर्ज भरला. संजय शिंदे यांच्या पुतण्याने देखील या जागांसाठी अर्ज भरला आहे. त्या ओबीसीच्या जागेवर सर्व आमदारांचे पुत्र आहेत. सहकाराच्या आईचा घो… या सहकारामध्ये ओबीसी व्हीजेएनटी यांना आरक्षण नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, आमदार खासदारांच्या मुलांचा तरतुदीसाठी या सहकारी बँकांच्या निवडणुका आहेत. एससी, एसटी, ओबीसीचं आरक्षण सहकारच्या निवडणुकीत का होत नाही? सातारा सोलापूर सांगली येथे एकच जातीला 90-90% जागा आहेत. सहकार कायदा हा बदलला पाहिजे आणि त्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी आरक्षण लागू झालं पाहिजे. याचे निवेदन आम्ही आज दिला आहे, अशी माहिती हाकेंनी दिली आहे.