
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, हत्या, मारहाण, चोरी या सारख्या घटना घडत असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं नांदेडसह राज्यात खळबळ उडाली आहे. नांदेडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं अपहरण करण्यात आलं, अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जीवन घोगरे यांचं नेमकं अपहरण का करण्यात आलं? आणि त्यांना मारहाण का करण्यात आली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे आकराच्या दरम्यान जीवन घोगरे यांंचं अपहरण करण्यात आलं होतं, नांदेडच्या सिडको भागातील ही घटना आहे. चार चाकी वाहनातून आलेल्या काही जणांनी जीवन घोगरे यांचं अपहरण केलं, त्यानंतर त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली, या घटनेत घोगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांचं अपहरण नेमकं का आणि कशासाठी करण्यात आलं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, हत्या, मारहाण, चोरी या सारख्या घटना घडत असतानाच आता चक्क नेत्याच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. pic.twitter.com/F72mblmFOq
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2025
सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?
दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की, घटनास्थळी एक गाडी उभी आहे, याच गाडीतून घोगरे यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर ती गाडी सुसाट वेगानं पुढे निघून गेली, घोगरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं नांदेडसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.