Live Update : प्रकाश आंबेडकर 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : प्रकाश आंबेडकर 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
Picture

प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर

मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरुन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

10/07/2020,12:45PM
Picture

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बळींच प्रमाण वाढलं

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बळींच प्रमाण वाढलं, चार दिवसात आठ जणांचा कोरोनाने मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या पोहचली 21 वर, इचलकरंजी शहरात सर्वाधिक आठ बळी

10/07/2020,10:26AM
Picture

पुण्यात मास्क न घालता फिरणाऱ्या 1 हजार 661 जणांवर कारवाई

पुण्यात गेल्या 7 दिवसात मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या 1 हजार 661 पुणेकरांवर कारवाई, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 1 हजार 528 जणांवरही कारवाई, तसेच गेल्या 2 दिवसात विना मास्क वाहनांवरुन फिरणाऱ्यांची 51 वाहने जप्त

10/07/2020,10:12AM
Picture

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा स्फोट

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा स्फोट, कारागृहात एकाच दिवशी 132 कैद्यांना कोरोनाची लागण, कारागृहातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 279 वर, रॅपिड ॲण्टिजेन किटद्वारे सुरु आहे कैद्यांची कोरोना चाचणी, लक्षणं नसलेल्या कैद्यांवर कारागृहातील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार

10/07/2020,10:06AM
Picture

औरंगाबादमध्ये आजपासून कडकडीत संचारबंदी

औरंगाबादमध्ये आजपासून कडकडीत संचारबंदी, संपूर्ण शहरासह एमआयडीसीत संचारबंदी सुरू, जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकाने राहणार बंद, रस्त्यावर येण्यास नागरिकांना असणार बंदी, शहरभर पोलिसांचा फौजफाटा तैनात, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

10/07/2020,10:02AM
Picture

दादर भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

दादर भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, भाजी विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यांची झुंबड, जवळपास अर्धा किलोमिटरपर्यंत सकाळी ट्रॅफिक जॅम, हाजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर, जी-नॉर्थ दादर आणि माहीम या ठिकाणी सगळ्यात जास्त रुग्णसंख्या आणि कोरोना बळी, त्यामुळे मनपासाठी इथे कोरोनाला रोखणं तारेवरची कसरत ठरतेय

10/07/2020,9:58AM
Picture

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापौर संदीप जोशी न्यायालयात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापौर संदीप जोशी न्यायालयात, ‘स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल करा’, महपौर संदीप जोशी यांचा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज, तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप, तुकाराम मुंढेंसह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, यासाठी न्यायालयात अर्ज

10/07/2020,9:53AM
Picture

जालन्यात 8 नवीन कोरोना रुग्णांची वाढ

जालन्यात 8 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण बाधित रूग्ण 860, बरे झालेले एकूण रुग्ण 515, आतापर्यंत मयत रुग्ण 37, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती

10/07/2020,9:50AM
Picture

विकास दुबे पहाटे 6.18 ला पळाला, 6.40 ला खात्मा, 22 मिनिटात काय काय घडलं?

10/07/2020,9:41AM
Picture

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक

10/07/2020,9:41AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

10/07/2020,9:39AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *