LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

वसई : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या, शाळा बुडवून मित्रांसोबत फिरायला आल्या होत्या, पाण्याचा अंदाज न आल्याने मुली बुडाल्याची माहिती, वसईचे वालीव पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, मुलींचा शोध सुरु, दोन्ही मुली वांद्र्याच्या असल्याची प्राथमिक माहिती, बुडालेल्या मुली सातवीत शिकणाऱ्या आहेत, तर त्यांच्यासोबत आलेले मुलं हे नवव्या वर्गात शिकतात

12/02/2020,2:48PM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

सिंचन घोटाळा प्रकरण, नागपूर एसीबीकडून सात गुन्हे

नागपूर : सिंचन घोटाळा प्रकरणी नागपूर एसीबीकडून सात गुन्हे दाखल, नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल, एका गुन्ह्यात दोनपेक्षा जास्त आरोपींची संख्या, उद्या सिंचन घोसाळ्याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी, सिंचन विभागाच्या आजी माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

12/02/2020,2:15PM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

तुकाराम मुंढे यांची नागपुरात धडक कारवाई, कचरा डेपोवर छापा

नागपूर : शहरातील भांडेवाडी कचरा डेपोत अनियमितता तपासण्यासाठी छापा, नागपुरात कचरा संकलनात होत असलेल्या अनियमिततेची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढेंकडून पाहणी, कचरा मोजणीतंही अनियमितता होत असल्याची माहिती, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची नागपुरात धडक कारवाई

12/02/2020,10:52AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

कोल्हापुरात पोलीस आणि नागरिकांत धक्काबुक्की, दोन पोलीस जखमी

कोल्हापूर : आकुर्डे येथे पोलीस आणि नागरिकांत धक्काबुक्की, धक्काबुक्कीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी, यात्रेच्या दिवशी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस गेले असल्याची माहिती, याला विरोध म्हणून नागरिक पोलिसांच्या अंगावर धावून गेले

12/02/2020,10:50AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

निवडणूक जिंकताच केजरीवाल कामाला, आम आदमी पक्षाची आमदार बैठक

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर आज आम आदमी पक्षाची आमदार बैठक, अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता बैठक, केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात राघव चड्डा, दिलीप पांडे, आतीशी यांना स्थान मिळण्याची शक्यता

12/02/2020,10:48AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

पतीनेच सांगितलं माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेव, पती विरोधात गुन्हा

पुणे : पतीनेच सांगितलं माझ्या पत्नीशी ठेव शारीरिक संबंध, पुण्यातील धक्कादायक प्रकार, भारती विद्यापीठ पोलीसात पती विरोधात गुन्हा दाखल, आरोपीला अटक, होस्टेलमध्ये राहत असताना तीथं काम करणाऱ्या एकाने महिलेवर जबरदस्ती केली होती, पिडीतीने पतीला सांगितल्यावर मीच तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितल्याचं उत्तर दिल्याने पत्नीला धक्का

12/02/2020,10:41AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून अत्याचार

सोलापूर : सोलापुरात अल्पवयीन मुलीवर दहा जणांनी केला अत्याचार, सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल, पाच जण पोलिसांच्या ताब्यात, तर अन्य पाच जणांचा शोध सुरु, विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

12/02/2020,9:38AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

देवेंद्र फडणवीस यांना 20 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना 20 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचं प्रकरण, ॲड सतिश उके यांनी दाखल केला कारवाईची विनंती करणारा अर्ज, न्यायालयात उकेंच्या अर्जावर पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला, यापूर्वी न्यालयात अनुपस्थित राहण्याची मुभा दिली होती

12/02/2020,9:37AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

नालासोपऱ्यात फेरीवाल्यांची दादागिरी, पत्रकाराला दमदाटी

नालासोपारा : नालासोपऱ्यात फेरीवाल्यांची दादागिरी, भर रस्त्यात दुकान थाटून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांकडून पत्रकाराला दमदाटी, पत्रकाराला दमदाटी करतानाचा व्हीडिओ व्हायरल, फेरीवाल्या विरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

12/02/2020,9:29AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

कमी किंमतीत डॉलर देण्याचं आमिष देऊन फसवणूक करणारी टोळी गजाआड

नवी मुंबई : कमी किंमतीत अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने नोटांच्या आकाराचे कागदी बंडल देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई, मोहम्मद जहाँगीर मुजाहिद्दीन शेख असं आरोपीचं नाव, त्याने व त्याच्या साथीदारांनी नवी मुंबईच्या विविध भागांत केलेले सहा गुन्हे उघड, आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, तीन मोबाइल फोन, त्याचप्रमाणे 62 अमेरिकन डॉलर आणि इतर साहित्य जप्त

12/02/2020,9:27AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत पहिला रणजी सामना रंगणार

बारामती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पहिला रणजी सामना रंगणार, महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या संघात पहिला रणजी सामना, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात, आजपासून 15 तारखेपर्यंत बारामतीत रणजी सामना, बारामतीच्या क्रिकेटप्रेमींना मेजवानी

12/02/2020,9:24AM
Maharashtra News, LIVE : वसईत खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्या

पुण्यात संगणकाच्या दुकानाला आग, संगणक जळून खाक

पुणे : पुण्यातील कँम्प परिसरातील कोहिनूर हॉटेल समोर असलेल्या एका संगणक असलेल्या दुकानामध्ये आग, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पुणे अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आगीमध्य़े संगणक जळाल्याने मोठे नुकसान, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

12/02/2020,9:23AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *