AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग, शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना शिंदे गटानं मोठा निर्णय घेतला आहे, हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग, शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 8:45 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत उत्सुकता होती, मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे, ते म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पालघरमधून मोठी बातमी समोर येत आहे, पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहिला जात आहे. डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे.

स्थानिक पातळीवर झालेलय्या या  निर्णयाला पक्षाकडून मान्यता देण्यात आली असून, डहाणूमध्ये सुरु असलेली एकाधिकारशाही संपवण्यासाठी एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी  शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिली आहे. दरम्यान जागा वाटप आणि उमेदवार ठरवले जात असून, सोमवारी शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष आणि 27 उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. डहाणूमध्ये शिंदे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या युतीला ठाकरे गट आणि माकपचा देखील छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान दुसरीकडे  शुक्रवारी भाजपच्या वतीने डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा नगराध्यक्ष पादसाठी तर  अन्य 27 उमेदवारांचे सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, यावेळी खासदार डॉ हेमंत सावरा यांची उपस्थित होती. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी पक्षांतराला सुरुवात झाल्याचंही पहायला मिळत आहे. .सोमवारी रात्री पालघर शहरातील शिवसेना शिंदे गटातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ