AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे बिहार निवडणुकीची धामधूम, दुसरीकडे आज महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्षप्रवेश, भाजपाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, बड्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे.

एकीकडे बिहार निवडणुकीची धामधूम, दुसरीकडे आज महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्षप्रवेश, भाजपाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 5:09 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतराला देखील वेग आला आहे, दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे.

नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाझे यांचे सख्खे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, विशेष म्हणजे हेमंत वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार होते,  आता भाजपाने शिवसेना ठाकरे गटाचा थेट नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवारच गळाला लावल्यानं हा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेमंत वाजे हे यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ते गटनेता आणि उपनगराध्यक्ष देखील होते,  तर त्यांच्या आई रुक्मिणी वाजे या आमदार होत्या, वडील देखील नगराध्यक्ष होते. हेमंत वाजे यांना गळाला लावत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी खेळी खेळली आहे. भाजपाच्या या खेळीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे थेट नगराध्यक्ष पदासाठी हेमंत वाजे यांच्या इतका तुल्यबळ दुसरा उमेदवार नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि पर्यायाने माणिकराव कोकाटे यांची आता या मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यात आहे. त्यामुळे आता भाजपकडून हेमंत वाजे यांनाच नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.  हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.