
पुणे- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये लोणावळा आणि सासवड या शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर या शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
लोणावळा नगरपरिषदेने राबवल्या या उपाय योजना
शहरातील सांडपाणी प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमार्फत एसटीपी प्रकल्प आणि एफएसटीपी प्रकल्प डोंगरगाव येथे बांधण्यात आला आहे. एकूण 40 शौचालयांपैकी 10 शौचालये ताराकिंत शौचालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्या तारांकित शौचालयामध्ये नेहमी मिळणाऱ्या सुविधांपेक्षा जास्त सुविधा जसे हँड वॉश, हॅड ड्रायर, सॅनिटरी नॅपकिन, इनसायनरेटर मशीन अशा अनेक सुविधा देण्यात येतात.
सासवड नगरपरिषदे केली अशी स्वच्छता
कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत 600 लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. शहराला ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त झाला. सासवड नगरपरिषदेने शहरामध्ये 6 हजारहून अधिक वृक्षांची लागवड व जोपासना केलेली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या:
शूटरला 1 लाख दिले, हात निकामी झाल्यामुळे पत्नीला थेट गोळ्या घातल्या, थरकाप उडवणारा हत्येचा कट
Pimpri ChinchwadCrime |सरकारी नोकरी पडली ८.५ लाखाला; फसवणूक प्रकरणी टीसीला अटक