Pimpri ChinchwadCrime |सरकारी नोकरी पडली ८.५ लाखाला; फसवणूक प्रकरणी टीसीला अटक

सरकारी नोकरीच्या आशेने त्यांनी आरोपी संजीवनीला स्वतः व भावाच्या नोकरीसाठी म्हणून तब्बल साडे आठ लाख रुपये दिले. काही दिवसातच आपल्याला टीसी म्हणून सरकारी नोकरी लागेल असा विश्वास त्यांना वाटला . मात्र पॆसे देऊन बराच कला गेल्यानंतरही आरोपी काही सांगत नसल्याचं त्यांच्या लक्षात आले.

Pimpri ChinchwadCrime |सरकारी नोकरी पडली ८.५ लाखाला; फसवणूक प्रकरणी टीसीला अटक
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे- रेल्वेमध्ये टीसी म्हणून सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय सुमित्रा हुले यांनी निगडी पोलिसांत तक्रात दिली आहे. निगडी पोलिसांनी तक्रारीची दाखल घेत फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत महिला टीसी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून संबंधित महिलेला अटक केली आहे. संजीवनी पाटणे (वय २५) असं या आरोपी महिला टीसी अधिकाऱ्याचे नाव आहे.

आधी केली मैत्री
फिर्यादी सुमित्रा हुले यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे . या व्यवसायातून त्यांची संजीवनी यांच्याशी ओळख झाली. हळूहळू दोघींमध्ये चांगली मैत्री झाली. ज्या ज्या वेळी दोघींची भेट व्हायची त्या त्यावेळी नोकरी संदर्भातील गप्पा मारायच्या. याचाच फायदा आरोपी संजीवनीना घेतला.

अशी केली फसवणूक
आरोपी संजीवनीने एकदा सुमित्रा यांना आणि त्यांच्या भावाला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. आरोपी टीसी अधिकारी असल्यानं फिर्यादी महिलेला त्यांच्यावर विश्वास बसला. पुढे सरकारी नोकरीच्या आशेने त्यांनी आरोपी संजीवनीला स्वतः व भावाच्या नोकरीसाठी म्हणून तब्बल साडे आठ लाख रुपये दिले. काही दिवसातच आपल्याला टीसी म्हणून सरकारी नोकरी लागेल असा विश्वास त्यांना वाटला . मात्र पॆसे देऊन बराच कला गेल्यानंतरही आरोपी काही सांगत नसल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरोपीला सातत्याने विचारणाही केली.या मात्र आरोपीने टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. पुढे पैसे देऊन एकालाही सरकारी ना लागल्यानं आपली फसणूक झाल्याचं फिर्यादी सुमित्रा यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ निगडी पोलीस स्टेशनला धावघेत टँकर दाखल केली.

संबधित बातम्या

पुणे म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करताय? वाचा मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर

पतीचा घोटाळा लपवण्यासाठी पत्नीचा थयथयाट, माहिती अधिकार कार्यकर्त्यावरच उगारली चप्पल, पुण्यातला प्रताप!

Video| भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकली; अपघातात दोन तरुण जखमी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI