पतीचा घोटाळा लपवण्यासाठी पत्नीचा थयथयाट, माहिती अधिकार कार्यकर्त्यावरच उगारली चप्पल, पुण्यातला प्रताप!

घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीने शैलेंद्र यांना मारहाण केली. महापालिका कार्यालयातच पत्नीने चप्पलेने मारायला सुरुवात केली. पतीविरुद्ध अपिल का केले, याचा राग मनात धरून पत्नीने हे प्रकरण चांगलेच पेटवले.

पतीचा घोटाळा लपवण्यासाठी पत्नीचा थयथयाट, माहिती अधिकार कार्यकर्त्यावरच उगारली चप्पल, पुण्यातला प्रताप!
पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याला अभियंत्याच्या पत्नीकडून मारहाण


पुणेः पतीने केलेला घोटाळा लपवण्यासाठी पत्नीने पुढाकार घेत सदर प्रकरण शोधून काढणाऱ्या माहिती अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला. महापालिकेतील कथित घोटाळ्यासंबंधात नाव असलेल्या अभियंत्याच्या (Engineer in Municipal corporation) पत्नीने माहिती कार्यकर्त्याला (RTI Activist) चप्पलेनेच मारहाण केली असून वरून त्यानेच आपल्याला धक्का दिल्याचा बनाव केला. पुणे महापालिकेत शुक्रवारी माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित (Shailendra Dixit) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला.

घोटाळा लपवण्यासाठी महापालिकेत पत्नीचा थयथयाट

माहिती अधिकाराखाली पुण्यात माहिती अधिकार कर्यकर्ते शैलेंद्र दीक्षित यांचं अपिल सुरु होतं. पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन 7 मधील 200 कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र दीक्षित यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी माहिती मागवली होती. मात्र हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीने शैलेंद्र यांना मारहाण केली. महापालिका कार्यालयातच पत्नीने चप्पलेने मारायला सुरुवात केली. पतीविरुद्ध अपिल का केले, याचा राग मनात धरून पत्नीने हे प्रकरण चांगलेच पेटवले.

कार्यालयात घुसून पत्नीचा थयथयाट

आपण केलेला गैर व्यवहार लपवण्यासाठी सदर कनिष्ठ अभियंत्याने पत्नीला कार्यालयात बोलावल्याचा आरोप शैलेंद्र यांनी केला आहे. 12 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सदर प्रकरणी अपिल सुरु असताना अभियंत्याच्या पत्नीने महापालिकेच्या कार्यालयात घुसून असा थयथयाट केला. माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण तर केलीच, शिवाय मला धक्का का मारला, असा कथित बहाणा करून सदर कार्यकर्त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

इतर बातम्या-

दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!

ठाकरे सरकारकडून राजकारणाचे गुन्हेगारीकरण; आशिष शेलारांनी केला आघाडीचा पंचनामा

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI