Video| भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकली; अपघातात दोन तरुण जखमी

बीएमडब्लूच्या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आहे. डीपी रोड परिसरात हा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकून हा अपघात घडला.

Video| भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकली; अपघातात दोन तरुण जखमी


पुणे –  बीएमडब्लूच्या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आहे. डीपी रोड परिसरात हा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकून हा अपघात घडला. अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर तरुण अडकले गाडीत

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक भरधाव बीएमडब्लू  डीपीरोडकडे चालली होती. गाडी म्हात्रे पूल परिसरात येताच  दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच  अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात मध्यरात्री अडीच्या सुमारास घडला होता. हे दोनही तरुण गाडीमध्ये अडकले होते.  अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 वाजून 50 मिनिटांनी गाडीतून त्यांची सूटका केली, व त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात गाडीचे नुकसान 

दरम्यान या अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा समोरचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला. गाडी दुभाजकाला धडकल्याने वाहनाच्या समोरच्या काचेला देखील तडे गेले आहेत. घटनेबाबत तपास सुरू असून, तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सबंधित बातम्या 

प्रोटेक्ट टू Crime आणि प्रोटेक्ट टू Terrorism सरकारची भूमिका; भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची राऊतांवर जळजळीत टीका!

मालेगावची घटना हा प्रयोग, देशात अराजक माजवण्याचा हा डाव; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI