स्वतःचा चेहरा आरशात पाहा, सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांची घेतली फिरकी

| Updated on: Nov 02, 2022 | 6:11 PM

आयुष्य पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पदं का दिली नाहीत. एकाच घरात सत्ता नको बरं का.

स्वतःचा चेहरा आरशात पाहा, सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांची घेतली फिरकी
सुषमा अंधारे
Image Credit source: tv 9
Follow us on

जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पाचोरा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मतदारसंघात महाप्रबोधन सभा घेतली. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, चांद्यापासून बांध्यापर्यंत जोडण्यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरू झाली. चूप बैठो कान काटुंगा. तुम्ही सोबत आलात तर तुम्हाला सेट करू. आम्हाला विरोध केलात तर तुम्हाला शूट करू. असं राजकारण सुरू आहे. या दडपशाहीला उत्तर दिलं पाहिजे. संयमी, संविधानिक चौकटीत उत्तर देत आहोत. सुसंस्कृत नेतृत्वाच्या शिस्तबद्धतेला धक्का न लागू देता काही प्रश्न या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं विचारत आहोत.

यानंतर सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, दसरा मेळाव्यात 40 चुकारं भावंड तिकडं गेलीत. फावल्या वेळेत शायरी करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी काही स्टेटमेंट केलीत. गुलाबरावांनी आम्ही शिवसेनेचे खरं वासरदार असल्याचं सांगितलं. शिवाय सत्तापालट झालं पाहिजे. एकाचं घरात किती दिवस सत्ता ठेवायची असं गुलाबराव म्हणाले होते.

त्यावर उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, गुलाबराव पाटील हे 1992 साली पंचायत समिती सदस्य झाले. 1997 ला जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999 ला पहिल्यांदा गुलाबराव आमदार झाले. 2004 ला दुसऱ्यांदा आमदार झाले. 2009 ला ते पराभूत झाले होते. 2014 ला पुन्हा गुलाबराव आमदार झाले.

2016- 2019 आमदार आणि सहकार राज्यमंत्री होते. 2019 निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले. गुलाबराव तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. गुलाबरावजी स्वतःला हा नियम का लावून घेतला नाही. जळगावमधला तुम्ही आमदार व्हा. मी थांबतो, असं दुसऱ्या कुणाला का म्हणाले नाहीत.

आयुष्य पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांना पदं का दिली नाहीत. एकाच घरात सत्ता नको बरं का. यावेळी मला तिकीट नको. दुसऱ्याला द्या, असं का म्हणाला नाहीत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. वेड्यात काढण्याचे धंदे बंद करावेत गुलाबरावांनी, असंही सुषमा अंधारे यांनी खडसावून सांगितलं.

लोकांना तत्वज्ञान पाजळतो की, का बरं एकाच घरात सत्ता तेव्हा गुलाबरावजी तुम्ही स्वतःला हा नियम का घालून घेतला नाही. गेल्या 20 वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गानं सत्ता भोगतोय. गेल्या 20 वर्षात जळगावमधला जो कुणी काम करणारा आहे त्याला आमदारकी का दिली नाही, असा सवालही सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना विचारला.