तुने मुझे एक धोखा दिया है, मै तुम्हे सौ धोखे दूंगा, मेरा नाम महादेव जानकर है… जानकर कडाडले

जित पवारांची बारामती, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, चंद्रशेखर बावनकुळे यांचे कामठी,पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड, एकनाथ शिंदे यांचे कोपर या ठिकाणी आपण सभा घेणार आहे, कोणालाही सोडणार नाही. भाजप आणि काँग्रेस आम्हाला समान अंतरावर आहेत, दोन्हीही मोठे पक्ष छोट्या पक्षांना खात आहेत. मी आमदार करणारा माणूस त्यांच्याकडे मी का भीक मागत बसू असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

तुने मुझे एक धोखा दिया है, मै तुम्हे सौ धोखे दूंगा, मेरा नाम महादेव जानकर है... जानकर कडाडले
mahadev jankar
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 8:18 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडे न जाता विधानसभेला 288 जागा लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. दौंड येथे त्यांनी आपल्या पक्षाचा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केले आहे. आम्हाला महायुतीतील पक्षांनी विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कसल्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलवलं नाही त्यामुळे आम्ही महायुतीतुन बाहेर पडलो असे यावेळी महादेव जानकर यांनी सांगितले. मी देणारा आहे घेणारा नाही, मला विधानसभा परिषद देत होते मी घेतली नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत देखील आता जाणार नाही. आता आमचं काय होईल यासाठी आम्ही खंबीर आहोत असेही जानकर यावेळी म्हणाले.

तुने मुझे एक धोका दिया है

धमकीला घाबरू नका. महादेव जानकर हिंदकेसरी आहे. एक दगड आला तर दहा दगड जातील. माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर तुमचे खानदान ठेवणार नाही असाही इशारा जानकर यांनी यावेळी दिला.ते पुढे म्हणाले की ज्या वेळेस मी 2014 ला बारामतीमध्ये खासदारकीला उभा होतो, त्यावेळेस ते महाभाग (राहुल कुल) माझ्या सोबत नव्हते, नंतर विधानसभेला माझ्याकडे आले, पाया पडले आणि मला तिकीट द्या म्हणाले त्यावेळी ‘त्यांना बायको नव्हती आणि आम्हाला पण नवरा नव्हता’ आम्ही त्यांना तिकीट दिले. नंतर त्यांनी आम्हाला धोका दिला. तुने मुझे एक धोका दिया है, मै तूम्हे सौ धोके दूंगा उसका नाम महादेव जानकर है असे यावेळी जानकर म्हणाले. काही लोक गद्दार झाले पैसे घेऊन त्यांच्याकडे गेले त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं. त्याचा बदला घ्यायचा असेल तर सीटींग आमदाराचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

15 आमदार महाराष्ट्रात निवडून आणतोय

महाराष्ट्रातील 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार आहे. मी 15 आमदार महाराष्ट्रात निवडून आणतोय लिहून ठेवा. रासपा शिवाय महायुती आणि महाविकास आघाडीला सरकार बनवता येणार नाही. मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री बनणार नाही दौंडवर माझे खास प्रेम कारण दौंड मध्ये माझा उमेदवार निवडून आलेला आहे. ज्या आमदाराला मी माझे तिकीट दिले होते त्यालाही तुम्ही मतदान केलेले आहे, चूक तुमची नाही, चूक माझी आहे. माणसं निवडताना माझी गलती झाली त्याची माफी मागण्यासाठी दौंडकरांनो मी तुमच्या दारात आलो आहे असेही जानकर यावेळी म्हणाले.

उमेदवार पळवून नेतील

2014 साली दौंड मधील जनतेने माझ्यावर आमदार निवडून देऊन उपकार केले आहेत, परंतू आज दौंडचा उमेदवार जाहीर करणार नाही. दौंडसाठी सक्षम उमेदवार आल्यानंतर नाव निश्चित केले जाईल, आज लोकांचे मत जाणून घेण्यात येईल पार्लमेंटरी बोर्डाकडे ती यादी पाठवून नाव निश्चित केली जाईल.दोन-तीन जनांची नावं आलेत परंतु पार्लमेंटरी बोर्डाकडे अंतिम निर्णय आहे. राष्ट्रीय समाज पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळवून नेतील असे जानकर यांनी सांगितले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.