Maharashtra News LIVE Update | उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक
Breaking News

| Edited By: prajwal dhage

Aug 19, 2021 | 12:02 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 19 Aug 2021 12:02 AM (IST)

  पुण्यात चंद्रकांत पाटील रस्त्याची पाहणी करताना दुचाकीस्वार येऊन धडकला

  पुणे : चंद्रकांत पाटील रस्त्याची पाहणी करताना दुचाकीस्वार येऊन धडकला

  उतारावरुन येताना दुचाकीस्वाराचा ताबा सुटला

  सुदैवानं कोणाला दुखापत नाही

  पोलिसांनी तातडीने दुचाकीस्वाराचा उचलून बाजूला नेले

 • 19 Aug 2021 12:00 AM (IST)

  उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक

  उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर चोरट्यांनी केली दगडफेक

  वाशी पोलिसात गुन्हा नोंद, राष्ट्रवादीच्या गाव संपर्क अभियानला जात असताना हल्ला

  हल्ल्यात गाडीची मागील काच फुटली , कोणीही जखमी नाही

 • 18 Aug 2021 09:08 PM (IST)

  मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस, शेलार नदीला पूर आल्याने शेलगाव देशमुख गावात पाणी घुसले

  बुलडाणा : मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस

  शेलार नदीला पूर आल्याने शेलगाव देशमुख गावात पाणी घुसले

  तर शेतातही पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान

  नदीकाठच्या घरात जवळपास 3 फुटापर्यंत पाणी

  जिल्ह्यात इतर ठिकणीही पाऊस

 • 18 Aug 2021 08:26 PM (IST)

  उल्हासनगरच्या रिजन्सी प्लाझा इमारतीत शॉक लागून दोघांचा मृत्यू

  उल्हासनगर : उल्हासनगरच्या रिजन्सी प्लाझा इमारतीत शॉक लागून दोघांचा मृत्यू

  इमारतीच्या टेरेसवर काम करत असताना लागला शॉक

  मृत्युमुखी पडलेले दोघेही इमारतीत काम करणारे कामगार

  घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल

 • 18 Aug 2021 07:35 PM (IST)

  बदलापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंनी केलं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं स्वागत

  बदलापूर :  बदलापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्याकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं स्वागत

  शिवसेनेनं भाजपच्या मंचावर जाऊन केलं कपिल पाटील यांचं स्वागत

  कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतं बदलापूर

  स्थानिक आणि युतीचे खासदार म्हणून निवडून गेलेले असल्यानं कपिल पाटील यांचं शिवसेनेकडून स्वागत

 • 18 Aug 2021 07:12 PM (IST)

  अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस, नगर शहरात सखल भागात पाणी

  अहमदनगर : जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात

  पावसामुळे बळीराजा सुखावला, तर पिकांना मिळाला दिलासा

  नगर शहरात सखल भागात पाणी साचलं

  सकाळपासून होते ढगाळ वातावरण

  दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाची हजेरी

 • 18 Aug 2021 05:46 PM (IST)

  नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट -

  नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  शून्य मृत्यू

  तर 7 जणांनी केली कोरोनावर मात

  आज झालेल्या चाचण्या - 4871

  एकूण रुग्णसंख्या - 492978

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 482761

  एकूण मृत्यूसंख्या - 10118

 • 18 Aug 2021 05:42 PM (IST)

  नाशिक विद्यार्थी डॉक्टर आत्महत्या प्रकरण, त स्वप्नील शिंदे यांच्या नातेवाईकांचं पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन  

  नाशिक - विद्यार्थी डॉक्टर आत्महत्या प्रकरण

  मृत स्वप्नील शिंदे यांच्या नातेवाईकांचं पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन

  गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा

  पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न

  रॅगिंग होत असल्याने स्वप्नील शिंदे याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

 • 18 Aug 2021 05:28 PM (IST)

  संजय राठोड यांचा जबाब अजूनही नोंदवून घेतला नाही, Sit कडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

  यवतमाळ- माजी मंत्री संजय राठोड यांचे अद्याप पर्यंत बयान नोंदवून घेण्यात आलेले नाही

  संजय राठोड हे यवतमाळमध्ये आले नसल्याची माहिती

  आज संजय राठोड यांचे बयान नोंदविले जाणार होते

  मात्र अद्याप याबाबत Sit कडून  कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही

 • 18 Aug 2021 04:55 PM (IST)

  अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळलं

  मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच

  सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान फेटाळलं

  हायकोर्टाचा निर्णय योग्यच - सर्वोच्च न्यायालय

  सीबीआयनं दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास हायकोर्टानं दिला होता नकार

  या निकालाला अनिल देशमुखांनी दिलेलं आव्हान सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं आहे

  अनिल देशमुखांचा पुढचं पाउल क़ाय असणार याकडे लक्ष

 • 18 Aug 2021 04:35 PM (IST)

  राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंचा खोटा इतिहास वाचवण्याचं काम करतायत, प्रवीण गायकवाडांचे समर्थक आक्रमक 

  मुंबई : राज ठाकरेंविरोधात प्रवीण गायकवाडांचे समर्थक आक्रमक

  राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंचा खोटा इतिहास वाचवण्याचं काम करतायत

  पुणे ही कोणाच्या बापाची जाहागिरदारी नाही

  आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार मग ते राज ठाकरे असो किंवा कोणीही

  इतिहासावरती चर्चेला चर्चेनं गुद्द्याला गुद्द्यानं उत्तर देऊ कार्यकर्त्यांचा मनसेला इशारा

  प्रवीण गायकवाड समर्थक आणि मनसे सैनिकांमध्ये इतिहासावरून वादाची ठिणगी

  संभाजी ब्रिगेडनं पत्रकार परिषद घेऊन मनसेला दिला इशारा

 • 18 Aug 2021 03:43 PM (IST)

  गोपीचंद पडळकर यांना तत्काळ अटक करावी, सचिन खरात यांची मागणी

  सांगली -गोपीचंद पडळकर चमकोगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी

  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (सिदनाक) यांची मागणी

  बैलगाडा शर्यत हा विषय सुप्रीम कोर्टात आहे

  राज्य सरकारची परवानगी नसताना पडळकर बैलगाडा शर्यत घेत आहेत

 • 18 Aug 2021 03:42 PM (IST)

  संभाजी छत्रपतींनी स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू होणार, नांदेडमधील आंदोलनाची तयारी सुरू 

  नांदेड : 20 तारखेच्या नांदेडमधील आंदोलनाची मराठा क्रांती मोर्चाकडून तयारी सुरू

  खासदार छत्रपती संभाजीराजे नांदेडमध्ये करणार मूक आंदोलन

  राज्यातील मराठा समन्वयकांना आंदोलनाचं निमंत्रण

  राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या एक महिन्यानंतरही अपूर्णचं

  छत्रपती संभाजीराजेंनी स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू होणार

  कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची तयारी सुरू

  सोशल मीडियात समन्वयकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

 • 18 Aug 2021 01:53 PM (IST)

  काल नागपुरात दिवसभर संततधार पावसानंतर आज पुन्हा दुपारनंतर पावसाला सुरुवात

  नागपूर ब्रेकिंग -

  काल नागपुरात दिवसभर संततधार पावसानंतर आज पुन्हा दुपारनंतर पावसाला सुरुवात

  काही भागात हलक्या स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस

  सकाळ पासूनच ढगाळ वातावरण मात्र दुपार नंतर झाली पावसाला सुरुवात

 • 18 Aug 2021 01:12 PM (IST)

  मुंबई हायकोर्टाकडून राज कुंद्रा यांना दिलासा

  मुंबई हायकोर्टाकडून राज कुंद्रा यांना दिलासा

  महाराष्ट्र साइबर सेलने दाखल केलेल्या प्रकरणात राज कुंद्रा ह्याला 25 अगस्त पर्यन्त अटके पासून दिलासा

  महाराष्ट्र सायबर सेल मध्ये पोर्न प्रकरणात दाखल आहे एफआईआर

  त्याच एबीए साठी कुन्दरने हाई कोर्ट मध्ये दाखल केला होता अर्ज

  सध्या राज कुंद्रा गुन्हे प्रोपर्टी सेल मार्फ़त शुरू पोर्न प्रकरणात आहेत अटकेत

 • 18 Aug 2021 12:22 PM (IST)

  नाशकात मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

  नाशिक

  - मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

  - मयत डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात घेत होता शिक्षण

  - रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

  - काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंग मुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न

  - रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी

  - कॉलेज प्रशासनाकडून आरोपांच खंडन,आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉकटरला वेळो वेळी सहकार्य केल्याची माहिती

  - मयत झालेल्या विद्यार्थी डॉकटरवर मानसोपचार सुरू असल्याची कॉलेज प्रशासनाची माहिती

  - मानसिक स्थिती ठीक नसल्याने मयत डॉक्टर विद्यार्थ्यांच्या आईला दिली होती मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी.

 • 18 Aug 2021 10:53 AM (IST)

  ऑगस्ट महिना संपत आला तरी बारामतीत दमदार पाऊस होईना, धरणे, तलाव अजूनही कोरडेच

  बारामती :

  - ऑगस्ट महिना संपत आला तरी दमदार पाऊस होईना

  - पावसाअभावी धरणे, तलाव अजूनही कोरडेच

  - विहिरींचीही पाणी पातळी घसरली

  - पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे स्त्रोत आटले

  - सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतीही अडचणीत

  - शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा

 • 18 Aug 2021 10:51 AM (IST)

  बारामती तालुक्यातील 48 गावांसाठी पाच नवीन नळपाणी पुरवठा योजना

  बारामती :

  - बारामती तालुक्यातील 48 गावांसाठी पाच नवीन नळपाणी पुरवठा योजना

  - देऊळगाव रसाळ, कटफळ-जैनकवाडी, गोजुबावी-खराडेवाडी अशा पाच योजना

  - पाणीपुरवठा योजनांसाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु

  - जिरायत भागातील गावांसाठी ठिकठिकाणी पाईपलाईन होणार

  - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवली जाणार योजना

 • 18 Aug 2021 10:50 AM (IST)

  गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद शहरात लसीकरण सुरळीत सुरु

  औरंगाबाद -

  गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद शहरात लसीकरण सुरळीत सुरू

  जवळपास 71 लसीकरण केंद्रावर सुरू आहे लसीकरण

  दररोज 8 हजार नागरिकांना दिले जातायत लसींचे डोस

  औरंगाबाद महापालिकडे 18 हजार लसींचा साठा शिल्लक

  लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

 • 18 Aug 2021 10:50 AM (IST)

  राज्यातील स्थगिती मिळालेल्या 16 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका लवकरचं होणार

  राज्यातील स्थगिती मिळालेल्या 16 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका लवकरचं होणार

  कोरोनामुळं निवडणूका स्थगित करण्याचा सहकार प्राधिकरणानं घेतला होता निर्णय

  मात्र येत्या 27 सप्टेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादी प्राधिकरणाला सादर करण्याच्या सूचना

  सप्टेंबर अखेरीस जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार

  सहकारी बँकांच्या निवडणूका होणार प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांची माहिती

  सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक,धुळे, नंदुरबार, जळगाव,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे,उस्मानाबाद व लातूर या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या होणार निवडणुका

  लवकरच निवडणुकीचं बिगूल वाजणार

 • 18 Aug 2021 10:49 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या

  पिंपरी चिंचवड -

  - चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या

  - पिंपरी चिंचवड मधील पुनावळे मधील घटना

  -आरोपी पती राहुल प्रतापे याने पत्नी गौरी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन काल रात्री कोयत्याने वार करून केली हत्या

 • 18 Aug 2021 10:17 AM (IST)

  नगर जिल्ह्यातील सातशे गावे कोरोनामुक्त

  अहमदनगर

  नगर जिल्ह्यातील सातशे गावे झाली कोरोनामुक्त

  तर जिल्ह्यात दरोरोज पंधरा हजार कोरोना चाचण्या

  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०३ टक्के इतकी

  जिल्ह्यात सद्या ६ हजार५७ रुग्णांवर उपचार सुरू

 • 18 Aug 2021 10:17 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाक बंगला येथे बंदुकीच्या धकावर लूटमार करण्याचा प्रयत्न

  नागपूर -

  नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाक बंगला येथे बंदुकीच्या धकावर लूटमार करण्याचा प्रयत्न

  ज्वेलर्स च्या दुकानात लुटीचा प्रयत्न

  संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

  तीन अज्ञात आरोपींनी दुकानात प्रवेश करताच शटर बंद केलं

  दुकान मालक आणि त्यांची पत्नी आत पळाले

  त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेले

  त्यामुळे अनर्थ टळला

 • 18 Aug 2021 08:27 AM (IST)

  भुसावळ हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मिलीमीटरने उघडले

  भुसावळ हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मिलीमीटरने उघडले

  भुसावळच्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्याने

  हतनूर धरणातून 5932 क्युसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग

 • 18 Aug 2021 08:02 AM (IST)

  भारती पवार यांची जनसंवाद यात्रा अडचणीत, गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

  नाशिक -

  भारती पवार यांची जनसंवाद यात्रा अडचणीत?

  गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

  शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल झाली जनसंवाद यात्रा

  मात्र यात्रे दरम्यान कोरोना नियमांची पायमल्ली तर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

  सर्वसामान्यांवर कारवाई, मग नेत्यांना अभय का ? असा सवाल

  पोलिसांकडून यात्रेची माहिती घेण्यास सुरुवात

 • 18 Aug 2021 07:42 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का दिल्याबद्दल दोघांना अटक

  पिंपरी चिंचवड

  - हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का दिल्याबद्दल दोघांना अटक

  - पिंपळे गुरव मधील हॉटेल व्हीला कासा येथे सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केलीय

  -स्वप्निल रविंद्र यादव व सागर रामचंद्र मांडजे असे अटक आरोपींचे नावे आहेत. तसेच, मालक सचिन परदेशी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय

  -आरोपींनी हॉटेलमध्ये ग्राहकांना अवैधरित्या हुक्का उपलब्ध करून दिला. सामाजिक सुरक्षा पथकाने आरोपींना ताब्यात घेतले असून, हुक्का संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे

 • 18 Aug 2021 07:41 AM (IST)

  खेड आणि मंचर भागात फायरिंग करून दहशत पसरवणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक

  पुणे

  -पुणे जिल्ह्याच्या खेड आणि मंचर भागात फायरिंग करून दहशत पसरवणाऱ्या खुनातील फरार कुख्यात आरोपीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकला यश

  -सुधीर थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव असून आरोपीवर मंचर,खेड पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत

 • 18 Aug 2021 07:35 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात डेंग्यूवर नियंत्रण नाहीच, दर दिवसाला सात नव्या रुग्णांची नोंद

  - नागपूर जिल्ह्यात डेंग्यूवर नियंत्रण नाहीच, दर दिवसाला सात नव्या रुग्णांची नोंद

  - १९ दिवसांत ९३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली

  - जून मध्ये ६८ तर जुलै महिन्यात २५० पेक्षा जास्त डेंग्यूच्या रुग्णांची नोंद

  - जानेवारी ते १४ ॲागस्टपर्यंत ४१८ रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

 • 18 Aug 2021 07:34 AM (IST)

  नागपुरात अकरावीसाठी 12 हजारावर विधर्थ्यांची नोंद

  नागपूर -

  अकरावीसाठी 12 हजारावर विधर्थ्यांची नोंद

  27 ऑगस्ट ला पहिल्या फेरी ची यादी लागणार

  नागपूर महापालिका हद्दीतील कॉलेज मध्ये 59 हजार 250 जागा आहेत

  यात सर्वाधिक जागा विज्ञान शाखेच्या आहेत

  विधर्थ्यांना ऑन लाईन नोंदणी करायची आहे

 • 18 Aug 2021 07:33 AM (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन 10 दिवसांपासून रखडलेलं

  - एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन 10 दिवसांपासून रखडलेलं

  - वेतन न मिळाल्याने एसटीचे कर्मचारी चिंतेत

  - एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रखडलं वेतन

  - एसटीची शासनात विलीगीकरण करण्याची मागणी

  - उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने बिघडलं एसटीचं आर्थिक गणित

  - नागपूर जिल्हयात दीड हजारच्या वर कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत

 • 18 Aug 2021 07:32 AM (IST)

  भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

  - भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

  - युवा मतदारांवर डोळा ठेवत भाजपची निवडणूक तयारी सुरु

  - प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे सुरु

  - ‘जिल्ह्यात ५० हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार भाजप’

  - ‘एका बुथवर २५ रुणांची फळी तयार करणार’

  - भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

  - १८ ते २५ वयोगटातील नव्या मतदारांवर भाजपा डोळा

  - महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपची तयारी

 • 18 Aug 2021 07:03 AM (IST)

  नागपुरात काल 12 तासात 17.1 मिमी पावसाची नोंद झाली

  नागपूर -

  नागपुरात काल 12 तासात 17.1 मिमी पावसाची नोंद झाली

  अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

  तर शहरात अनेक सकल भागात पाणी साचल होत

  आज सकाळी ढगाळ वातावरण आहे, सध्या पाऊस नसला तरी पावसाची शक्यता

 • 18 Aug 2021 06:41 AM (IST)

  अकोल्यात रात्री पुन्हा जोरदार पावसाची हजेरी

  अकोला -

  अकोल्यात रात्री पुन्हा जोरदार पावसाची हजेरी

  सकाळ पासून होते ढगाळ वातावरण

  दुपारी झाला जोरदार पासून

  पुन्हा दुपारच्या विश्रांती नंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी

  गेल्या 1 तासापासून सुरू आहे जोरदार पाऊस

Published On - Aug 18,2021 6:39 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें