Maharashtra News LIVE Update | राज्यपालांकडून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक

| Updated on: Aug 20, 2021 | 12:54 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज्यपालांकडून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Aug 2021 08:04 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक

    प्रसिद्ध सिने अभिनेत्री व समाजसेविका दिपाली भोसले सय्यद आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात तब्बल ४० मिनिटे चर्चा.

    सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सांगली येथील १००० (एक हजार ) मुलींच्या लग्नाची जबाबदारी दिपाली सय्यद यांनी घेतली असून प्रत्येक मुलीच्या नावे ५०००० रू (पन्नास हजार) रुपये ची मुदत ठेव करण्यात आली असून याचे वाटप दि ९ सप्टेबंर|२०२१ रोजी सांगली येथे होणार असून या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार आहेत.

  • 19 Aug 2021 05:50 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

    यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात भीषण अपघात अपघातात तीन जण ठार दोन जण गंभीर जखमी गाडीचा ब्रेक आणि कल्च खाली बिसलरी बॉटल आल्याने गाडी झाडावर आदळून अपघात खंडाळा घाटातील घटना अपघातात मध्यप्रदेश येथील खंडवा जिल्ह्यातील नागरिक असल्याची माहिती जखमींना पुसद च्या मेडिकेयर हॉस्पिटलमध्ये केले दाखल

  • 19 Aug 2021 05:47 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, शाखाध्यक्षांच्या निवडीची घोषणा करणार

    पुणे :

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर

    मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक,

    शाखाध्यक्षांच्या निवडीची करणार घोषणा

  • 19 Aug 2021 05:46 PM (IST)

    नाशिकच्या एमजी रोड वरील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्युटर दुकानाला आग

    - नाशिकच्या एमजी रोड वरील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्युटर दुकानाला लागली आग - अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल - आगीच कारण अस्पष्ट

  • 19 Aug 2021 04:32 PM (IST)

    आम्ही घरात बसून काम करु शकत नाही, केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

    केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यंमत्री भारती पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    - मंत्री भारती पवारांचा मुख्यमंत्र्यांना जन आशिर्वाद यात्रेवरुन टोला - आम्ही घरात बसुन काम करु शकत नाही. त्यामुळे आम्ही जनतेत जात आहोत. लोकशाहीने दिलेला अधिकाराचे कोव्हीड नियमांचे पालन करुन आम्ही जन आशिर्वाद यात्रा करत आहोत - मुख्यमंत्री मला माफ करा असा टोला लगावत - आम्ही जनतेत जाणार आम्ही, कुपोषण आरोग्याची माहीती घेणार, मला सभागृहात उत्तर द्यावे लागते. - मुख्यमंत्री आम्हाला जनतेपासुन तोडु नका अशा प्रकारच्या टिका करुन राजकारण करु नका असा मुख्यमंत्रींना टोला. - राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोणाची परिस्थीती अद्यापही चिंताजनक आहे त्या जिल्ह्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याची गरज , ईशान्येकडील राज्यांनी याची कडक अंमलबजावणी करत करोणा आटोक्यात आणला - आता पर्यत देशात ५६. ६४ कोटी लोकांना लसीकरण , सर्वाधीक लसींचे डोस महाराष्ट्राला - राज्यात एक लाख डोस वाया गेले - ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यु झाला याबाबत राज्याकडुन केंद्राला अद्यापही माहीती मिळालेली नाही. केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहुन १३ ऑगस्ट पर्यत आकडेवारी देण्यास सांगितले होते.

  • 19 Aug 2021 03:11 PM (IST)

    मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

    उस्मानाबाद - मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण

    आरोपी देवानंद रोचकरी व बाळासाहेब रोचकरी यांना 5 दिवसांची 23 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

    देवानंद रोचकरी यांच्यावर आजवर 35 गंभीर गुन्हे नोंद असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती

    बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या कटात कोण सहभागी , अधिकारी यांचा समावेश तपासणीसाठी दिली पोलीस कोठडी

    तुळजापूर तालुका कोर्टाने दिली कोठडी , पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची माहिती

  • 19 Aug 2021 03:10 PM (IST)

    गोपीचंद पडळकरांनी केलेल्या आरोपांनंतर एमपीएससी आयोगानं परीपत्रक काढलं

    गोपीचंद पडळकरांनी केलेल्या आरोपांनंतर एमपीएससी आयोगानं काढलं परीपत्रक,

    विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारीत येत नाही,

    राज्य शासनाच्या अखत्यारीत हा विषय येतो, शासनाने दिलेल्या मागणीपत्रानुसार आम्ही भरती,

    आरक्षित जागांचा विषय आमच्याकडे येत नाही, एमपीएससी आयोगानं परिपत्रक काढतं दिली माहिती,

    तर एमपीएससीच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ,महाराष्ट्र लोकसेवा अभियांत्रिकी सेवा 2020 आणि राज्य सेवा पुर्व परीक्षा 2020

    या तिन्ही पुर्व परीक्षांचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागणार, एमपीएससी आयोगानं दिली माहिती

  • 19 Aug 2021 03:09 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं जाण्याची शक्यता

    मुंबई : अनिल देशमुख यांच्या विरोधात NBW अर्थात अजामीनपात्र वॉरंट काढलं जाण्याची शक्यता

    ईडी अजामीनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता

    तपासाला सहकार्य करत नसल्याने वॉरंट काढलं जाण्याची शक्यता

    अनिल देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री आहेत

    त्यांच्या विरोधात मनी लॉनदरिंगचा गुन्हा दाखल आहे

  • 19 Aug 2021 12:41 PM (IST)

    नवी मुंबई शहरात आतापर्यंत 2 तर उरण परिसरात डेल्टाचा एक रुग्ण आढळला

    नवी मुंबई -

    नवी मुंबई शहरात आतापर्यंत 2 तर उरण परिसरात डेल्टाचा एक रुग्ण आढळला

    दोन्ही रुग्ण ऐरोली आणि घणसोली परिसरातील

    वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे यांची माहिती

    नागरिकांनी डेल्टाबाबत सतर्क राहण्याची गरज

    आयुक्त अभिजित बांगर यांचा इशारा

  • 19 Aug 2021 12:40 PM (IST)

    पिंपरीच्या नेहरूनगर लसीकरण केंद्रावर एका महिलेचा गोंधळ, चाकू घेऊन सेल्फी पॉइंटचे नुकसान

    पिंपरीच्या नेहरूनगर लसीकरण केंद्रावर एका महिलेचा गोंधळ

    चाकू घेऊन सेल्फी पॉइंटचे नुकसान

    खुर्ची आणि हाताने कर्मचाऱ्यांना मारहाण

    शिवीगाळ आणि धमकी देऊन महिला पसार

    संभ्रमातून महिलेने गोंधळ घातल्याची पिंपरी पोलिसांची माहिती

    लसीमुळं नागरिकांचा मृत्यू होतो असा महिलेचा समज

  • 19 Aug 2021 12:16 PM (IST)

    मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पुर्ण जॅम, वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर लांबच लांब रांगा

    - मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पुर्ण जॅम

    - वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर लांबच लांब रांगा

    - नारायण राणे यांचा रथ सांताक्रुझ फ्लायओव्हर इथे पोहोचला

    - राणेंच्या रथ यात्रेत ६०० ते ७०० गाड्या

    - नारायण राणे यांचा अभुतपुर्व रोड शो

  • 19 Aug 2021 11:58 AM (IST)

    पनवेल मनपा करणार सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण

    पनवेल मनपा करणार सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण

    नगरसेवकांनी आपल्या प्रभागाची माहिती द्यावी आरोग्य विभागाचे आवाहन

    महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राला भरघोस प्रतिसाद

  • 19 Aug 2021 10:33 AM (IST)

    सुरगाणा तालुक्यातील नार नदीत एकजण वाहून गेला, दोन दिवसांनंतर मृतदेह सापडला

    नाशिक -

    सुरगाणा तालुक्यातील नार नदीत एकजण वाहून गेला

    नदी पार करताना पाय घसरून गेला वाहून

    तब्बल 2 दिवस शोधकार्यानंतर सापडला मृतदेह

    65 वर्षांच्या रामजू कुवर यांचा नदीत वाहीन गेल्याने मृत्यू.

  • 19 Aug 2021 10:32 AM (IST)

    पुण्यातील सुरेश पिंगळे प्रकरणाची आता चौकशी होणार

    - पुण्यातील सुरेश पिंगळे यांच्या प्रकरणाची आता चौकशी होणार

    - पुणे पोलीस उपायुक्त महेश गट्टे यांची माहिती

    - सुरेश पिंगळे यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता

    - पिंगळे यांना काल संध्याकाळी 5 पर्यंत दाखल दिला जाणार होता, पुणे पोलिसांची माहिती

    - पुणे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा पिंगळे यांच्या पत्नीने केला होता आरोप

  • 19 Aug 2021 09:59 AM (IST)

    ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द

    पालघर -

    पालघर जिल्हा नवीन मुख्यालयाचा आज लोकार्पण सोहळा

    ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द

    दूर दृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार लोकार्पण सोहळा

    नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे ,राज्यमंत्री अब्दुल सत्तार राहणार उपस्थित

  • 19 Aug 2021 09:57 AM (IST)

    नाशकात विनाहेल्मेट वाहनचालकांची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

    नाशिक -

    - विनाहेल्मेट वाहनचालकांची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

    - म्हसरुळ परिसरातील ईच्छामणी पेट्रोल पंपावरील काल संध्याकाळची घटना

    - म्हसरुळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल, आरोपी फरार

    - घटनेवेळी पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्त नव्हता

  • 19 Aug 2021 09:56 AM (IST)

    औंधमधील मोदींचे मंदिर हटवल्यानंतर राष्ट्रवादीचे उपरोधीक आंदोलन

    - औंधमधील मोदींचे मंदिर हटवल्यानंतर राष्ट्रवादीचे उपरोधीक आंदोलन,

    - भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींचे मंदिर तयार केले होते,

    - सोशल मीडियात या मंदिराची जोरदार चर्चा होती,

    - काल रात्री मोदींचे मंदिर हटवण्यात आले,

    - एव्हीआयवरून लाईव्ह फ्रेम दिलीय

  • 19 Aug 2021 08:07 AM (IST)

    औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस

    औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस

    औरंगाबादेत सलग 3 दिवसांपासून पाऊस सुरू..

    तब्बल 3 दिवसांपासुन सूर्यदर्शनही नाही

    समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांची मिटली चिंता..

    जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास झाली सुरुवात

    15 दिवसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस ठरला संजीवनी..

    औरंगाबाद,बीड, परभणी,नांदेड, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा..

  • 19 Aug 2021 07:47 AM (IST)

    लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची कारागृहात रवानगी

    नाशिक - लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची कारागृहात रवानगी..

    झनकर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी होणार सुनावणी..

    ठाणे एसीबी ने केली वैशाली झनकर यांच्यावर कारवाई..

    8 लाखांची लाच स्वीकारताना त्यांचा वाहनचालकन सापडला एसीबीच्या हाती

  • 19 Aug 2021 07:37 AM (IST)

    कोल्हापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

    कोल्हापूर

    कोल्हापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

    एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

    सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड चोरट्यांनी केले लंपास

    संभाजीनगर,रुईकर कॉलनी नागाळा पार्क परिसरातील घटना

    दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या चे ही प्रकार

    चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केलेले आव्हान

    नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

  • 19 Aug 2021 07:34 AM (IST)

    पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू अड्यावर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई

    पुणे

    -पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू अड्यावर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई

    -जेसीबीच्या साह्याने दारू अड्डा केला उद्ध्वस्त

    -दोन दिवसांपूर्वी याचं गावातील एका गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर गावच्या महिला सरपंच सह ग्रामपंचायत सदस्यांनी जाऊन दारू अड्डा उद्ध्वस्त केला होता

    -या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गावातील दारू अड्ड्यांवर कारवाई करत तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे

  • 19 Aug 2021 06:46 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर चोरट्यांनी केली दगडफेक

    उस्मानाबाद -

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर चोरट्यांनी केली दगडफेक

    वाशी पोलिसात गुन्हा नोंद , राष्ट्रवादी गाव संपर्क अभियानला जात असताना हल्ला

    हल्ल्यात गाडीची मागील काच फुटली , कोणीही जखमी नाही

  • 19 Aug 2021 06:45 AM (IST)

    अकोला जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम 

    अकोला -

    अकोला जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम

    रात्री जोरदार पावसाची हजेरी

    गेल्या 1 तासापासून सुरू आहे जोरदार पाऊस

    शहरातल्या अनेक भागातील लाईट बंद

Published On - Aug 19,2021 6:40 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.