Maharashtra News LIVE Update | माजी वनमंत्री संजय राठोड यांना दिलासा, महिलेच्या शरीर सुखाच्या आरोपांप्रकरणी क्लीनचीट

| Updated on: Aug 22, 2021 | 12:16 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | माजी वनमंत्री संजय राठोड यांना दिलासा, महिलेच्या शरीर सुखाच्या आरोपांप्रकरणी क्लीनचीट
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Aug 2021 07:20 PM (IST)

    माजी वनमंत्री संजय राठोड यांना दिलासा, महिलेच्या शरीर सुखाच्या आरोपांप्रकरणी क्लीनचीट

    माजी वनमंत्री संजय राठोड यांना दिलासा, महिलेच्या शरीर सुखाच्या आरोपांप्रकरणी क्लीनचीट, यवतमाळ येथील एका महिलेने आरोप केले होते, या प्रकरणाचा पोलीस तपासानंतर अखेर क्लीनचीट देण्यात आली

  • 21 Aug 2021 06:44 PM (IST)

    सांगलीतील जेष्ठ पत्रकार, प्रख्यात निवेदक, उत्कृष्ट रंगकर्मी अरुण नाईक यांचे निधन

    सांगली :

    सांगलीतील जेष्ठ पत्रकार, प्रख्यात निवेदक, उत्कृष्ट रंगकर्मी अरुण नाईक यांचे निधन

    वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

    सांगलीतील राहत्या घरी निधन

  • 21 Aug 2021 05:51 PM (IST)

    नारायण राणे यांची जनसंवाद यात्रा वसईतून नालासोपाराच्या दिशेने रवाना

    वसई : नारायण राणे यांची जनसंवाद यात्रा वसईतून नालासोपाराच्या दिशेने रवाना

    वसईच्या पार नाका येथील हुतात्मा स्मारक, वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी अप्पाच्या पुतळ्याला नारायण राणे यांचे अभिवादन

    अभिवादन करून नारायण राणे यांची जनसंवाद आशीर्वाद यात्रा नालासोपारा निर्मळच्या दिशेने रवाना

  • 21 Aug 2021 04:23 PM (IST)

    सिंधुदुर्गात आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

    सिंधुदुर्ग:-

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांचे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश.

    पक्षाचे सिंधुदूर्ग जिल्हा निरिक्षक आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुडाळमधे झाला प्रवेशाचा कार्यक्रम.

    यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंञी प्रविण भोसले, प्रवक्ते काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.

    पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजप पक्षासोबत युती केल्यामुळे रतन कदम होते नाराज.

    काही दिवसापूर्वी आठवलेंच्या विरोधात घेतली होती भुमिका. मात्र आता रतनभाऊ कदम यांनी कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादीत प्रवेश.

  • 21 Aug 2021 04:21 PM (IST)

    अनिल देशमुखांचे पीए संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पीए संजीव पालांडे, कुंदन शिंदे दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे

    पुढील सुनावणी 24 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे

    दोघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती

    मात्र पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवसी दोन्ही आरोपी सुनावणी दरम्यान हजर राहणार आहेत

  • 21 Aug 2021 03:09 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

    उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळला

    सुभाष टेकडी येथील वेंकट सदन इमारतीचा स्लॅब कोसळला

    या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

    महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

    इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची महानगरपालिकेची नोटीस

  • 21 Aug 2021 12:21 PM (IST)

    खांदा कॉलनी येथील भूमी लँडमार्क इमारतीला आग

    खांदा कॉलनी येथील भूमी लँडमार्क इमारतीला लागली आग

    इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली

    घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहोचली

    अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु

    आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट

    भूमी लँडमार्क इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस

  • 21 Aug 2021 11:09 AM (IST)

    मनमाड बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून करण्यात प्रशासकाची नियुक्ती

    मनमाड :

    मनमाड बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून करण्यात प्रशासकाची नियुक्ती

    सहायक निबंधक पी.जी. देवरे यांची प्रशासक म्हणून करण्यात आली नियुक्ती

    बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपून मिळाली होती सहा महिन्यांची मुदतवाढ

    ती ही संपल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून करण्यात आली प्रशासकाची नियुक्ती

  • 21 Aug 2021 11:09 AM (IST)

    भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

    औरंगाबाद -

    भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

    एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

    जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

    एमआयएमवर गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का नाही करत

    इम्तियाज जलील यांचा पोलीस प्रशासनाला सवाल

  • 21 Aug 2021 11:07 AM (IST)

    पुण्यात गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

    पुणे -

    - गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन,

    - महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन,

    - स्वारगेट चौकात राष्ट्रवादीचे आंदोलन

  • 21 Aug 2021 08:25 AM (IST)

    नाशकात नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिम आणखी तीव्र करणार

    नाशिक -

    नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिम आणखी तीव्र करणार

    पेट्रोल पंपावर कर्मचार्यांशी वाद घालणार्याला बेड्या ठोकणार

    पोलीस आयुक्तांचा पेट्रोल पंप चालकांना दिलासा

    पेट्रोल पंप कर्मचाऱयांना मारहाणीच्या अनेक घटना घडल्याने पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीच वातावरण

    पोलीस आयुक्तांकडून पेट्रोल पंप चालकांना धीर

  • 21 Aug 2021 08:24 AM (IST)

    अकलूज ,बार्शी ,पंढरपूर , अक्कलकोटसह 13  नगरपरिषदा, नगरपंचायतची प्रभाग रचना होणार

    सोलापूर -

    अकलूज ,बार्शी ,पंढरपूर , अक्कलकोटसह 13  नगरपरिषदा, नगरपंचायतची प्रभाग रचना होणार

    राज्यात डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायती, नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घेतला हाती

    शासनाने बारा मार्च 2020 च्या आदेशानुसार सर्व नगर परिषदांमधील प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असेल,

    प्रभाग रचनेसाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घेण्यात येणार

  • 21 Aug 2021 08:24 AM (IST)

    कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे अर्थात सीपीआर रुग्णालय सर्वच रुग्णांसाठी झाले खुले

    कोल्हापूर

    कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे अर्थात सीपीआर रुग्णालय सर्वच रुग्णांसाठी झाले खुले

    कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या साडेचार महिन्यापासून इतर आजारांसाठी बंद होते रुग्णालय

    जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच प्रमाण घटल्यान जवळपास सर्वच भाग पुन्हा झाले सुरू

    रुग्णालय इतर रुग्णांसाठी खुले करण्यात करण्यात आले सिपीआर परिसराच सॅनिटायझेशन

  • 21 Aug 2021 08:23 AM (IST)

    ताबा सुटल्याने दुचाकीसह तरुण पंचगंगा नदीत बुडाला

    कोल्हापूर

    ताबा सुटल्याने दुचाकीसह तरुण पंचगंगा नदीत बुडाला

    कोल्हापूर च्या शिंगणापूर बंधाऱ्यावर पहाटेच्या सुमारास घडली घटना

    दुचाकीस्वाराचा मृत्यू तर त्याचा सहकारी गंभीर जखमी

    दोघेही कामावरून घरी जात असताना घडला दुर्दैवी अपघात

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जवानांनी दुचाकीस्वाराचा मृत्यूदेह काढला बाहेर

    मृत दुचाकीस्वाराची ओळख पटवण्याच काम सुरू

  • 21 Aug 2021 08:20 AM (IST)

    बार्शीतील जगप्रसिद्ध नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटल सरकारकडे समर्पित करण्याची मागणी

    सोलापूर-

    बार्शीतील जगप्रसिद्ध नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटल सरकारकडे समर्पित करण्याची मागणी

    डॉक्टर नेने यांच्या कन्येने मुख्यमंत्र्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत हॉस्पिटल शासनाकडे समर्पित करण्याची केली मागणी

    जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल तयार सादर करण्यासाठी प्रांताधिकारी, शल्यचिकित्सकांची केली होती

    नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल (भारत सरकार ) यांना  देण्याबाबत मागील दोन वर्षापासून सुरू आहे चर्चा

    नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांशी व्हीसी द्वारे साधला होता संवाद

    यात  कॅन्सर हॉस्पिटल चे संस्थापक डॉक्टर बी एम नेने यांच्या केनिया स्थित कन्या डॉक्टर ज्योती नेने त्रिपाठी यांनी वडिलांच्या इच्छेनुसार नर्गिस हॉस्पिटल हे शासनास समर्पित करण्याची केली विनंती

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तात्काळ अहवाल देण्याचा दिला आहे आदेश

  • 21 Aug 2021 07:42 AM (IST)

    महादेवखोरा येथे वाहतुकीला पूल नसल्याने नागरिकांची जीवघेणी कसरत

    औरंगाबाद -

    वाहतुकीला पूल नसल्याने नागरिकांची जीवघेणी कसरत

    करंजखेडच्या आदिवासी वस्तीतील महादेवखोरा येथील नागरिकांची वाहत्या पाण्यात वेदनादायी वाट

    कन्नड तालुक्यातील करंजखेड गावांपासुन काही अंतरावर असलेल्या महादेव खोरा वस्तीतील प्रकार

    नाल्यातून जिवघेणी कसरत करुन रस्ता करावा लागतोय पार

    पुल बनविण्यात आला नसल्याने नागरिकांना सहन करावा लागतोय मोठा त्रास

  • 21 Aug 2021 07:23 AM (IST)

    नागपूर वाहतूक पोलिसांनी आता स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कसली कंबर

    नागपूर -

    नागपूर वाहतूक पोलिसांनी आता स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कसली कंबर

    कारने स्टंटबाजी करणाऱ्या चारजणां विरोधात गुन्हे दाखल करून कार केल्या जप्त

    काही दिवसांपूर्वी सुद्धा एकावर कारवर स्टंट बाजी करण्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्यात आला होता

    स्वतःसोबत इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो

  • 21 Aug 2021 07:06 AM (IST)

    बारामतीकरांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न - अजित पवार

    बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय होणार

    बारामतीकरांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे

    महिलांना आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला

    रोजगार अडचणीत आलाय

    राज्य सरकारचं उत्पन्न साडेचारवरुन सव्वातीन लाख कोटींवर आलंय, पगार द्यावेच लागतात

    कोरोना काळ आहे, काळजी घ्या, नियमांचं पालन करा

  • 21 Aug 2021 07:04 AM (IST)

    बारामतीकरांचं प्रेम, पाठिंबा आणि पवारसाहेबांचे आशिर्वाद यामुळे हे सगळं होतंय - अजित पवार

    बारामती :

    गेली दिड वर्षापासून कोरोनाचं संकट

    कोरोनामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्यात

    या काळातही विकासकामे सुरु आहेत

    बारामतीत अनेक कामे सुरुयत

    बारामतीकरांचं प्रेम, पाठिंबा आणि पवारसाहेबांचे आशिर्वाद यामुळे हे सगळं होतंय

    सच्चर कमिटीचा अहवाल, त्यामध्ये अनेक गोष्टी आल्यात, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न, मात्र वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीनं घ्याव्या लागतात

    आम्हाला बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरु करायची सवय लागलीय, पवारसाहेबांमुळे ही सवय लागलीय, आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही

    मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भुमिका नसते, लवकर काम सुरु केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो

  • 21 Aug 2021 06:46 AM (IST)

    भुसावळ हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले

    भुसावळ हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले

    धरणातून 48,204 क्युसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 21 Aug 2021 06:45 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशिनचे वाटप

    बारामती :

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशिनचे वाटप,

    सहारा फाउंडेशनच्या वतीने शिलाई मशिन वाटप

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप

    मुस्लिम बॅंकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांचीही उपस्थिती

  • 21 Aug 2021 06:45 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

    बारामती :

    - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

    - बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन..

    - नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी घेतली माहिती..

    - काम दर्जेदार करण्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना सुचना

Published On - Aug 21,2021 6:42 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.