Maharashtra News Live Update : आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण

| Updated on: Dec 27, 2021 | 12:28 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update : आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 110 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 57 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपली आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुट्टी असेल. भाजप ठाकरे सरकारविरोधात आक्रमक होताना दिसून येत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Winter Session Live )  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Dec 2021 08:35 PM (IST)

    आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण

    आमदार समीर मेघेंनंतर अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना

    – 2400 पैकी 32 जणांना लागण, 400 जणांचा रिपोर्ट येणं बाकी…

    – अधिवेशनाला कोरोनाचा विळखा…

    – सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन…

  • 26 Dec 2021 08:13 PM (IST)

    बाईक बाजूला घ्यायला सांगितल्यामुळे कल्याणमध्ये वाद, पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    कल्याण : रस्त्यावर बाइक उभी करून फोनवर बोलत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा काही तरुणासोबत वाद झाला. या वादानंतर चौघांनी मिळून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान सोन्याची चेन आणि काही रोकडसुद्धा गहाळ झाल्यानंतर याप्रकरणी चौघांपैकी दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून इतर दोघांच्या शोध सुरू आहे .

  • 26 Dec 2021 07:26 PM (IST)

    राज्यात ओमिक्रॉनचा उच्चांक, दिवसभरात आढळले 31 नवे रुग्ण, चिंता वाढली !

    राज्यात ओमिक्रॉनचा उच्चांक

    दिवसभरात आढळले 31 रुग्ण

    सर्वाधिक रुग्ण आढळले मुंबईत

    27 रुग्ण दिवसभरात एकट्या मुंबईत

    ठाण्यात 2 ,पुणे ग्रामीण 1 आणि अकोला 1

    आतापर्यंत राज्यात 141 रुग्णांची नोंद

    त्यापैकी 61 रुग्णांना उपचार करून सोडलं घरी

    राज्याची चिंता वाढली !

  • 26 Dec 2021 06:31 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील टेंभापुरी परिसरात दहा ते बारा एकर शेतातील उसाला भीषण आग

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील टेंभापुरी परिसरात दहा ते बारा एकर शेतातील उसाला भीषण आग

    दहा ते बारा एकरवरील उसाला चारही बाजूने लागली भीषण आग

    गावकर्‍यांचा अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

    मात्र दहा ते बारा एकरवरील ऊस जळून जाण्याची शक्यता

    जवळपास तीन ते चार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

    शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

    बारा एकरवरील ऊस नष्ट होण्याचा धोका

  • 26 Dec 2021 06:14 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमास मान्यता देण्याची विनंती

    मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतिसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत ही भेट घेण्यात आली. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री छनग भुजबळ, मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम दिलेला आहे. तसेच हा कार्यक्रम राज्यपाल यांनी मान्य करावा अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिक माहिती दिलीय. राज्यपाल कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमाबाबत अभ्यास करुन तसेच माहिती घेऊन राज्यपाल निर्णय घेतील असे थोरात यांनी सांगितले.

  • 26 Dec 2021 05:50 PM (IST)

    महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला

    मुंबई : महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला. राजभवानात जाऊन घेतली कोश्यारी यांची भेट.

  • 26 Dec 2021 05:47 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 132 कोरोना रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 132 कोरोना रुग्णांची वाढ

    - दिवसभरात रुग्णांना 121 डिस्चार्ज

    - पुणे शहरात करोनाबाधीत 2 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 2 मृत्यू.

    -76 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 509025.

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 981

    - एकूण मृत्यू -9114

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 488930.

    - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6075.

  • 26 Dec 2021 05:26 PM (IST)

    मी शिवसेना पक्षात आहे आणि राहणार- आमदार तानाजी सावंत 

    मुंबई : मी शिवसेना पक्षात आहे आणि राहणार

    शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे

    ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे

    कोण काय म्हणतंय, चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही

    फडणवीस व माझ्या भेटीचा विपर्यास केला गेला आहे

    शैक्षणिक काम होते मात्र वेगळा अर्थ काढला गेला

    जाणीवपूर्वक मला बदनाम केले जात आहे मी नाराज नाही

    आमदार डॉ. तानाजी सावंत यांची टीव्ही 9 ला माहिती

  • 26 Dec 2021 05:23 PM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सीताबर्डी मार्केटमध्ये मोठी गर्दी

    नागपूर -नवीन वर्षाच्या स्वागताच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी

    नागपुरात कोरोना रुग्णांनाची संख्या वाढत असताना सीताबर्डी मार्केट मध्ये मोठी गर्दी

    अनेकांच्या तोंडावर मास्क नाही , कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन

    दुकान 9 वाजता पर्यँतच सुरू राहणार असल्याने मार्केट मध्ये वाढली गर्दी

    सीताबर्डी मार्केट मधील गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरणार का ?

  • 26 Dec 2021 01:21 PM (IST)

    अध्यक्षपदाचं नाव निश्चित नाही, बाळासाहेब थोरात यांची माहिती

    अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अद्याप कोणतही नाव निश्चित करण्यात आलेलं नाही. माध्यमातून या संदर्भातील चर्चा सुरु असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

  • 26 Dec 2021 01:17 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार: बाळासाहेब थोरात

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी,अशी मागणी करणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ सोबत असतील, असं थोरात म्हणाले. राज्यपालांची भेट 5.30 वाजता घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनं आणि राज्यपालांच्या मान्यतेनं ही प्रक्रिया होत असते. अध्यक्षाची निवड आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांनी राज्य सरकारला यापूर्वी सूचना दिल्या होत्या ते कार्यवाही करतील, असं थोरात म्हणाले.

  • 26 Dec 2021 12:53 PM (IST)

    Bharati Pawar : भारती पवार यांनी कोरोना काळात रुग्णांच्या झालेल्या हेळसांडीवरून आरोग्य अधिकाऱ्यांना झाडलं

    रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही'

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पहिल्यांदाच अधिकाऱ्यांवर इतक्या चिडल्या

    कोरोना काळात रुग्णांच्या झालेल्या हेळसांडीवरून आरोग्य अधिकाऱ्यांना झाडलं

    शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने भडकल्या पवार

    दिल्लीच्या अधिकाऱ्यांचे उदाहरण देत अधिकाऱ्यांना काम सुधारण्याची दिली समज

  • 26 Dec 2021 12:16 PM (IST)

    कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी अंबाबाई ला प्रार्थना केली: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार 

    कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी अंबाबाई ला प्रार्थना केली: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

    काल महत्वाचा निर्णय मोदींनी जाहीर केला

    15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारी पासून लसीकरणाल सुरवात होऊल

    एक सुरक्षा कवच या निमित्ताने मिळालं

    कोरोना काळात केंद्राने कोल्हापूर साठी ही भरीव मदत दिली आहे

  • 26 Dec 2021 11:40 AM (IST)

    ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येईल: अविनाश भोंडवे

    ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येईल: अविनाश भोंडवे

    यामध्ये डॉक्टर फ्रन्टलाईन वर्करला मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल त्यांना बाधा होऊ नये यासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे ...

    यामुळे डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल,

  • 26 Dec 2021 08:29 AM (IST)

    नाशिक शहरातील टोईंगचा मुद्दा चिघळण्याची शक्यता

    - नाशिक शहरातील टोईंगचा मुद्दा चिघळण्याची शक्यता - अगोदर पार्किंगची व्यवस्था करा,नंतर टोईंग करा अन्यथा तीव्र आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा - टोईंग वरून दररोज चालक आणि वाहतूक विभागाचे उडतात खटके

  • 26 Dec 2021 07:39 AM (IST)

    पुण्यातील 18 गावातील बोगस भरती प्रकरणी कारवाई होणार

    महापालिकेतील समाविष्ट 18 गावातील बोगस कर्मचारी भरती प्रकरणी कारवाईसाठी जिल्हा परिषद सीईओंच विभागीय आयुक्तांना पत्र,

    या बोगस भरती प्रकरणात 18 गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असे मिळून 212 जणांचा समावेश आहे,

    ज्यांनी ज्यांनी मान्यतेचे ठराव मांडले त्यांच्यावरही कारवाई करण्याची विभागीय आयुक्तांना करण्यात. आलीये,

    मात्र आता गावं महापालिकेत समाविष्ट झाल्यानं नेमकी काय कारवाई केली जाते ? याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय...

  • 26 Dec 2021 07:20 AM (IST)

    राज्यात ऐन थंडीत पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता

    राज्यात पुढील दोन दिवसात ऐन थंडीत पावसाची शक्यता,

    विदर्भ आणि मराठवाड्यात 28 आणि 29 तारखेला पावसाची शक्यता आहे,

    हवामान वेधशाळेने हा अंदाज वर्तवलाय,

    सध्या राज्यात किमान तापमानात दिवसेंदिवस घट होतीये

    जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदीया, नागपूर,वर्धा, अमरावती या जिल्हयांना यलो अलर्ट देण्यात आलाय,

  • 26 Dec 2021 07:12 AM (IST)

    ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा नियमावली लागू..

    ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा नियमावली लागू..
    सामान्य ताप,खोकला जरी असेल तरी सुद्धा आता औरंगाबादेत RTPCR चाचणी सक्तीची..
    प्रशासनाच्या वतीने आता कडक नियमावली लागू..
    एखादी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णांची rt-pcr चाचणी घेणे देखील सक्तीचे..
    जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला निर्णय..
  • 26 Dec 2021 07:11 AM (IST)

    नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागातील 15 वर्ष जुनी वाहन जाणार भंगारात

    महापालिकेच्या अग्निशमन विभागातील 15 वर्ष जुनी वाहन जाणार भंगारात

    अग्निशमन विभागातील 9 फायर टेडर 15 वर्ष जुनी आहेत , त्यांचं आयुष्य संपलं

    त्यामुळे ते स्क्रॅप मध्ये काढलं जाणार

    त्या ठिकाणी 3 नवीन वॉटर फायर टेडर खरेदी केले जाणार

    16 ते 18 वर्ष जुनी आहेत वाहने

    शहर सोबत जिल्ह्याची जबाबदारी असते त्यामुळे विभागावर मोठी जबाबदारी

    विभाग सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने उचलले जात आहे पावलं

  • 26 Dec 2021 06:08 AM (IST)

    राजेश टोपे यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे.

    बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती. त्याचबरोबर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती.

Published On - Dec 26,2021 6:06 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.