Maharashtra News LIVE Update | बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Jun 30, 2021 | 11:06 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 30 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening 

Maharashtra News LIVE Update | बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 30 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jun 2021 09:30 PM (IST)

    बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

    पुणे : बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स

    उद्या 1 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे आदेश

    अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही ईडीच समन्स

    अमित याला 2 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे समन्स

    पैशांच्या अफरातफर प्रकरणात दोघांना ईडीचे समन्स

    पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे.

    ही जमीन सरकारी होती.

    या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल आहे

    या गुन्ह्याच्या अनुषणगाने ईडीने त्यांचा गुन्हा दाखल केला आहे.

    ईडीचा हा गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

    त्यावर हायकोर्टाने ही अविनाश भोसले यांना चौकशीला समोर जाण्याचे आदेश दिले आहेत.

    मुंबई हायकोर्टा कडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागतं आहे.

    अविनाश भोसले यांना उद्या 1 जुलै रोजी चौकशी ला हजर राहण्या बाबत समन्स बजावलं आहे.

    तर त्यांचा मुलगा अमित अविनाश भोसले याला 2 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्या बाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावलं आहे.

  • 30 Jun 2021 08:24 PM (IST)

    कन्फर्म तिकीटाचे आमिष देऊन प्रवाशाला लुटणारा चोरटा गजाआड

    कल्याण : तिकीट कन्फर्म करुन देण्याच्या बहाण्याने चोरटा त्या प्रवाशाला कल्याणहून कुर्ला रेल्वे स्टेशनला घेऊन गेला. त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील रोकड आणि मोबाईल घेऊन पसार झाला. या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे चांद मोहम्मद खान या चोरट्याचा या अशा प्रकारचा तिसरा गुन्हा आहे.

  • 30 Jun 2021 07:53 PM (IST)

    कर्जतच्या चारफाट्यावरील अतिक्रमण हटावसाठी नारीशक्ती सघंटना आक्रमक

    रायगड :

    कर्जत तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या चारफाट्यावरील अतिक्रमण हटावसाठी नारीशक्ती सघंटना आक्रमक.

    यासाठी पहिल्यादांच महिला उपोषण करीत असून आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे

    कर्जत चारफाटा चौकातील चार बाजूला जाणाऱ्या मार्गाशेजारी सर्व अनधिक्रुत हॉटेल, टपऱ्या आणि व्यापारी गाळ्यांमुळे पर्यटकांची वाहने सतत रोडवर थाबंल्यामुळे चारही मार्गावर सतत वाहतूक कोंडी असते.

    या वाहतूक कोडींचा त्रास कर्जतमधील सामान्य जनतेसह पर्यटकांच्या वाहनांनाही होतो

  • 30 Jun 2021 07:44 PM (IST)

    चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यात वीज पडून शेतमजुराचा मृत्यू

    चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील सोनूर्ली येथे वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, कवडू मोहूर्ले (36) असं मृतक शेतमजूराचे नाव असून आज संध्याकाळी शेतातून परत येत असताना त्याच्या अंगावर पडली वीज, कोरपना भागात आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

  • 30 Jun 2021 07:37 PM (IST)

    चंद्रपुरात पतीकडून रागाच्या भरात पत्नीची हत्या

    चंद्रपूर : चिमूर तालुक्यात पतीने रागाच्या भरात केली पत्नीची हत्या, मासळ बुद्रुक येथील घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना दिली माहिती, सोशल मीडियावरून जुळले होते दोघांचे सूत, या दाम्पत्याला आहे 8 महिन्यांची मुलगी, पतीच्या संशयी स्वभावाने दोघांत होत होती सतत भांडणे, अखेर या वादाचे हत्येत झाले पर्यवसान, पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत न्यायालयाकडून मिळविली 3 दिवसांची पोलीस कोठडी

  • 30 Jun 2021 07:35 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या बैठकीत काय-काय झालं?

    महाविकास आघाडीच्या बैठकीत काय-काय झालं?

    विरोधकांनी अजित पवार आणि अनिल परबांच्या विरोधात दिलेल्या पत्राबाबत चर्चा झाली

    विरोधी पक्ष सरकारला बदनाम करत असल्याचा बैठकीत निघाला सूर

    अजित पवार आणि अनिल परबांवर केंद्राकडून कारवाईसाठी दबाव आणत असल्याची झाली चर्चा

    अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात झाली चर्चा

    महाविकास आघाडी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनुकूल असल्याचं चित्र

  • 30 Jun 2021 06:44 PM (IST)

    भिवंडीतील काल्हेर इथे गोदामाला आग, दोन तासात आग आटोक्यात

    भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावच्या हद्दीतील ओशीमाता कंपाऊंडमध्ये मशीन केमिकलच्या गोदामाला  आग लागली. यामध्ये केमिकलसह ड्रम जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन फोमच्या सहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

  • 30 Jun 2021 06:18 PM (IST)

    जळगावात भाजपचे आणखी 8 नगरसेवक फुटणार, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

    जळगाव : भाजपचे आठ नगरसेवक फुटणार, भारतीय जनता पक्षाचे आणखी आठ नगरसेवक नाराज असून ते आपल्या संपर्कात आहेत, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. ते म्हणाले, अगोदर 27 नगरसेवक फुटले त्या गटासोबत हे आठ नगरसेवक फुटून जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

  • 30 Jun 2021 04:59 PM (IST)

    चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर नक्षत्र हॉटेलसमोर अपघात, चार ठार

    जळगाव : चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर नक्षत्र हॉटेलसमोर अपघात

    अपघातात 4 जण ठार, 1 महिला 2 पुरुष आणि 3 वर्षीय बालिकेचा समावेश

    मृतात 1 चाळीसगाव तर 3 तांदुळवाडी येथील एकाच कुटुंबातील नागरिक

    मृतांची नावे भगवान पाटील वाघडू, विलास मोरे, अलका मोरेव मुलगी रेणुका मोरे

  • 30 Jun 2021 04:28 PM (IST)

    पवार आणि ठाकरे यांच्या बैठकीत मीही होतो, काही प्रकल्पावर चर्चा झाली, कोणतेही मतभेद नाहीत : जितेंद्र आव्हाड

    मुंबई :  शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठका चालली

    त्या बैठकीत मी पण होतो. काही प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली

    बाकी कुठलाही मतभेद नाही,

    गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

  • 30 Jun 2021 04:26 PM (IST)

    जळगाव महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांची एकनाथ खडसेंसोबत बंद खोलीत चर्चा   

    जळगाव : महापालिकेच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट

    महापौर, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याशी बंद खोलीत भेट

    राजकीय विषयावर चर्चा होण्याची शक्यता

    पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे, याच अनुषंगाने खडसेंची भेट

  • 30 Jun 2021 03:52 PM (IST)

    इचलकरंजी नगरपालिकेत सभेमध्ये नगरसेवकांचा गोंधळ

    इचलकरंजी : इचलकरंजी नगरपालिकेत सभेमध्ये नगरसेवकांचा गोंधळ

    नगरसेवक सागर चाळके यांनी माजी आमदार यांनी 107 कोटी कामाच्या अंतर्गत टक्केवारी घेतल्याचा केला आरोप

    भाजपचे नगरसेवक मनोज साळुंखे किसन शिंदे यांनी  सागर चाळके नगरसेवक यांचा केला निषेध

    सभागृहातील सर्वच नगरसेवक एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा घडला प्रकार, माइक फेकून दिला

    सभागृहामध्ये झाले गोंधळाचे वातावरण भाजपाच्या नगरसेवकांनी केले ठिय्या आंदोलन

  • 30 Jun 2021 12:01 PM (IST)

    अपेक्षा आहे की, राज्य सरकार सर्वांवर हमीपत्राची सक्ती करणार नाही - हायकोर्ट

    अपेक्षा आहे की, राज्य सरकार सर्वांवर हमीपत्राची सक्ती करणार नाही - हायकोर्ट

    कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेआधी रूग्णालयही हमीपत्र घेतंच, मात्र कुठलाही डॉक्टर रूग्णाबद्दल हमी देत नाही - हायकोर्ट

    पुणे महापालिकेचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता पुण्याची निवड

    पुण्यात जर घरोघरी लसीकरण यशस्वी ठरलं तर सर्वत्र राबवणार, राज्य सरकारची माहिती

  • 30 Jun 2021 11:58 AM (IST)

    अहमदनगर महापौर आणि उपमहापौर पदाच्या नीवड प्रक्रियेला सुरवात

    अहमदनगर -

    महापौर आणि उपमहापौर पदाची नीवड प्रक्रियाला सुरवात

    महापौर पदासाठी सेनेकडून रोहिणी शेंडगे तर राष्ट्रवादी कडून उपमहापौर पदासाठी गणेश भोसले यांचा अर्ज

    विरोधात अर्ज न आल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

  • 30 Jun 2021 11:57 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडच्या भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल राष्ट्रवादीने वाहतुकीसाठी खुला केलाय

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड च्या भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल राष्ट्रवादीने वाहतुकीसाठी खुला केलाय

    -उड्डाणपुलाचे उदघाटन कोणत्या नेत्याने करायचे याचा सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी याच्या मध्ये वाद सुरू होता

    -अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसने या पुलाचे उदघाटन केले

    -त्यामुळे भाजप राष्ट्रवादी वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे

  • 30 Jun 2021 11:56 AM (IST)

    रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, पवारांच्या दिल्ली बैठकीची आ. पडळकर यांनी उडवली खिल्ली

    आमदार पडळकर

    - शरद पवार हे मी लहान असल्यापासून भावी प्रधानमंत्री आहेत त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा

    - रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा

  • 30 Jun 2021 09:56 AM (IST)

    आळंदी देवस्थानच्या प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरु

    आळंदी

    आळंदी देवस्थानच्या प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरु

    2 तारखेला होणार प्रस्थान सोहळा,

    सोहळ्यासाठी मंदिराला 5 हजार किलो फुलांची केली जाणार सजावट,

    5 हजार किलो फुलांची सजावट बनवायला सुरुवात,

    मंदिरातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पुर्ण,

    100 मानाच्या वारकऱ्यांची आज केली जाणार चाचणी,

    मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त,

    आळंदीत संचारबंदी लागू

  • 30 Jun 2021 09:52 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे 2 जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

    मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर,

    2 तारखेपासून 3 जिल्ह्यात छत्रपती संभाजीराजेंचा जनसंवाद दौरा,

    पुणे, नगर, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्याचा करणार दौरा,

    मराठा समाजातील लोकांची मतं घेणार जाणून,

    खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या दौऱ्याची ठिकठिकाणी तयारी सुरू,

    संभाजीराजे पुन्हा एकदा करणार जनसंवाद दौऱ्याला सुरुवात

  • 30 Jun 2021 09:50 AM (IST)

    आज नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा

    नागपूर -

    आज नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा

    कोविड मुळे ऑनलाइन पद्धतीने होणार ही सभा

    आजच्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा

  • 30 Jun 2021 09:49 AM (IST)

    सांगलीच्या आष्टामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याने एकच खळबळ

    सांगली -

    सांगलीच्या आष्टामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याने एकच खळबळ.

    रात्री उशिरा पोलिसांनी आणि शहरात दवंडी देत पोलिसांनी आणि वन विभागाने नागरिकांना बाहेर न पडण्याचे केले आव्हान

  • 30 Jun 2021 08:35 AM (IST)

    उद्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं होणार प्रस्थान

    उद्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं होणार प्रस्थान ,

    मानाच्या 100 वारकऱ्यांनाच प्रस्थानासाठी परवानगी,

    100 वारकऱ्यांची झाली आरटीपीसीआर चाचणी,

    सगळ्या वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह,

    देहू संस्थान प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज,

    प्रस्थान सोहळ्याला खासदार छत्रपती संभाजीराजे सपत्नीक उपस्थित राहण्याची शक्यता

  • 30 Jun 2021 08:13 AM (IST)

    पुण्यात बालभारतीच्या ई-साहित्यासाठी आता मोजावे लागणार पैसे

    पुणे :

    बालभारतीच्या ई- साहित्यासाठी आता मोजावे लागणार पैसे

    बालभारतीकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे ई-साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून, पाठ्यपुस्तकांची पीडीएफ, 'दिक्षा ॲप'द्वारे व्हिडिओ असे साहित्य उपलब्ध करून दिले जाते

    अशात आता अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल, तर विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने 'ई-बालभारती' ॲप केलं विकसित

    मात्र, हे ॲप वापरण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागणार असल्याने शाळा, शिक्षक, विद्यार्थी-पालक यांनी केली नाराजी व्यक्त

    मात्र, ॲप वापरणे सक्तीचे नसल्याचं बालभारतीचे म्हणणं

    नोंदणी शुल्क पन्नास रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे 'बालभारती'ने केलं जाहीर

    या ॲपवर सध्या इयत्ता पहिले ते पाचवी आणि इयत्ता दहावी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे ई-साहित्य उपलब्ध

    लवकरच उर्वरित इयत्तांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार

  • 30 Jun 2021 08:12 AM (IST)

    जून महिना संपला तरी नाशिक जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ

    - जून महिना संपला तरी नाशिक जिल्ह्याकडे पावसाने फिरवली पाठ

    - बळीराजा ही पावसाच्या प्रतीक्षेत

    - ग्रामीण भागात शेतीची काम ही मंदावली

    - नाशिक मधील धरणांमध्ये अवघा 27 टक्के पाणीसाठा शिल्लक

    - नाशिक शहरात पाणी कपात होण्याची शक्यता

    - जिल्ह्यावर दुष्काळाच सावट

  • 30 Jun 2021 08:11 AM (IST)

    रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात

    पुणे -

    - रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात

    - ५० रुपयांएवजी हे तिकिट १ जुलैपासून १० रुपयांना प्रवाशांना उपलब्ध होणार,

    - लॉकडॉऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये केली होती,

    - तसेच हे तिकिट सरसकट न देता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना सोडण्यास नागरिकांनाच देण्यात येईल, असे जाहीर केले होते,

    - रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रुपये करण्यात येणार,

    - येत्या १ जुलैपासून या बदलाची अंमलबजावणी होईल, जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांची माहिती.

  • 30 Jun 2021 07:08 AM (IST)

    नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील चोरी प्रकरणी दोन जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    - नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील चोरी प्रकरणी दोन जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    - उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत चोरट्यानी मारला होता डल्ला

    - पाच लाख रुपये रोख रकमेसह तिजोरी केली होती गायब सीसीटीव्ही डिव्हीआर,हार्ड डिस्क ही केली होती पसार

    - सातपूर पोलिसांनी छडा लावत आरोपींना केल जेरबंद

  • 30 Jun 2021 07:08 AM (IST)

    नागपुरात एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

    - एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

    - नागपूर जिल्ह्यातील नरखेड परसोडीतील येथील घटना

    - आंब्याचा रस आणि पुरणपोळीच्या पाहुणचारानंतर झाली विषबाधा

    - रुग्णांमध्ये चार लहान मुलांचा समावेश

    - रुग्णांवर नागपूरातील मेडीकलमध्ये उपचार सुरु

    - अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती

  • 30 Jun 2021 06:53 AM (IST)

    डहाणू, तलासरी 11.47 मिनिटाने बसले भूकंपाचे दोन सौम्य धक्के

    पालघर -

    डहाणू, तलासरी 11.47 मिनिटाने बसले भूकंपाचे दोन सौम्य धक्के

    डहाणू, दापचरी, तलासरी, उधवा, कवाडा, वसा, कुर्झे, इत्यादी परिसरात धक्के जाणवल्याची नागरिकांची माहिती

    मागील आठवड्यात 24 तारखेला 3.7 मॅग्नेट्यूडचा धक्का बसला होता तर दिवसभरात लागले होते 8 धक्के

    भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भीतीच्या छायेखाली

  • 30 Jun 2021 06:51 AM (IST)

    महापौर पदाच्या निवडीवरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा, शिवसेना नगरसेवकांनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास राडा

    अहमदनगर -

    महापौर पदाच्या निवडीवरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा

    शिवसेना नगरसेवकांनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास राडा

    सेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण

    नगरसेवक अनिल शिंदे आणि निलेश भाकरे यांच्यात झाले वाद

    सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही धक्काबुक्की झाल्याची चर्चा

    मात्र मला कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याच कोरेगावकर यांचा खुलासा

    या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

    महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला राढा

Published On - Jun 30,2021 6:39 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.