Maharashtra News LIVE Update | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या 16 जणांवर गुन्हे दाखल

| Updated on: Sep 02, 2021 | 12:51 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या 16 जणांवर गुन्हे दाखल
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Sep 2021 09:41 PM (IST)

    शिर्डी साईबाबा संस्थाननचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भाग्यश्री बानायत-धिवर यांची वर्णी

    शिर्डी साईबाबा संस्थाननचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भाग्यश्री बानायत-धिवर यांची वर्णी

    IAS भाग्यश्री बानायत नागपूर रेशीम उद्योग विभागाच्या संचालिका

    कान्हूराज बगाटे यांच्या जागी भाग्यश्री बानायत यांची वर्णी

    कान्हूराज बगाटे यांची कारकिर्द ठरली वादग्रस्त

    औरंगाबाद उच्च न्यायालयानेही बगाटे यांची नियुक्ती ठरवली होती नियमबाह्य

    बगाटे अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत

  • 01 Sep 2021 09:15 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या 16 जणांवर गुन्हे दाखल

    पुणे : – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या १६ जणांवर गुन्हे दाखल,

    – कसबा गणपती मंदिरात प्रवेश करून आरती केल्याप्रकरणी आणि मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल,

    – फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांविरोधात गुन्हे दाखल,

    – कोरोना प्रतिबंधक नियंत्रण कायद्याचं उलघ्नन केल्याचा ठपका.

  • 01 Sep 2021 08:32 PM (IST)

    राज्यपालांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

    "मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांना भेटलं जातं. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं जी काही स्थिती झालीय, धरणाची स्थिती याबाबत चर्चा केली. बारा आमदारांच्या नियुक्तीचा ठराव घेतला होता. त्याची विनंती आज पुन्हा राज्यपालांना करण्यात आली. त्याचा तातडीनं निर्णय घ्यावा अशी विनंती केली", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

  • 01 Sep 2021 08:26 PM (IST)

    अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, देशमुख कुटुंबिय वरळी पोलीस ठाण्यात दाखल, जावयाचं अपहरण केल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप

  • 01 Sep 2021 07:35 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा ताफा राज भवनाकडे रवाना, विधान परिषदेच्या 12 आमदारांचा तिढा सुटणार?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनाच्या दिशेला, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता, राज्यपालांचा आक्षेप असेल तर आज बैठकीत समजण्याची शक्यता

  • 01 Sep 2021 06:23 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 102 नवे कोरोनाबाधित

    नाशिक :

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 70

    आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 102

    नाशिक मनपा- 59 नाशिक ग्रामीण- 36 मालेगाव मनपा- 00 जिल्हा बाह्य- 07

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 8583

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03 नाशिक मनपा- 01 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 02 जिल्हा बाह्य- 00

  • 01 Sep 2021 06:22 PM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    पुणे :

    - ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    - ओबीसी आरक्षणाचा केंद्र आणि राज्य सरकारकडून खून, संभाजी ब्रिगेडची टीका

    - राज्यात ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे, संभाजी ब्रिगेडची मागणी

  • 01 Sep 2021 06:21 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 292 नवे कोरोनाबाधित, 189 जणांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात २९२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १८९ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४ - २०५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९५८७८. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३६३. - एकूण मृत्यू -८९३१. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८४५८४. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १०१५६.

  • 01 Sep 2021 04:03 PM (IST)

    कॅबिनेटमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता : मंत्री अमित देशमुख

    मुंबई :

    सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची प्रतिक्रिया :

    कॅबिनेटमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता दिली. येणाऱ्या काळात बदल होतील.

    राज्यात 18 जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत

    8 ठिकाणी महाविद्यालय आणि रुग्णालय प्रगतीलथावत आहात

    जेथे सुरू झालेला नाही तेथे फायदा होईल

    खासगी संस्था आणि विद्यालय चालवणाऱ्याना सोबत घेऊ

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी गरज निर्माण झाली आहे ती पूर्ण होईल

    वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरत येतील

    शहरीकरणं आणि मोडीलायजेशन करणे शक्य होईल

    महाविद्यालय सुरू करणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होईल, असा सरकारचा मानस आहे

    राज्य शासनाचे सर्व प्रकल्प असतील.

    शिक्षणाचा दर्जा, वैद्यकीय सेवा जलदगतीने लोकांपर्यंत पोहचावी हा मुख्य हेतू असेल

    वैद्यकीय सुविधा जेथे कार्यान्वित आहेत, तेथे गरज नाही.

    सुपरस्पेशालिटी उपलब्ध करायला असेल तर करू

    आरोय सुविधा जिल्हा जिल्ह्यात तातडीने खासगी भागीदार तत्वावर उपलब्ध करणार आहोत.

    शुल्कामध्ये फरक पडणार नाही

  • 01 Sep 2021 04:01 PM (IST)

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची मागणी

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची मागणी

    शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी उद्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन काढणार मोर्चा,

    बेलदरी गावातील धरणाकडे शासनाचं दुर्लक्ष आतापर्यंत शासनाचा निधी मिळाला नाही,

    जर आता सरकारने मदत केली तर निवडणुकीत आम्ही त्यांना मदत करू दिली ऑफर,

    शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार,

    उद्या तहसील कार्यालयावर मोर्चाचं नियोजन

  • 01 Sep 2021 04:00 PM (IST)

    नाशिकमध्ये दहीहंडी केल्याप्रकरणी मनसेच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

    नाशिक : दहीहंडी केल्याप्रकरणी मनसेच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

    मनसे कार्यालयाबाहेर दहीहंडी करून केला होता सरकारच्या निर्णयाचा विरोध

    मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

  • 01 Sep 2021 03:55 PM (IST)

    मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय

    आज १ सप्टेंबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

    • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण निश्चित

    (वैद्यकीय शिक्षण विभाग)

    • भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय

    (शालेय शिक्षण विभाग)

    • आदर्श शाळा बांधकामाबाबत निर्णय

    (शालेय शिक्षण विभाग)

    • भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा निर्णय

    (सांस्कृतिक कार्य विभाग)

    • आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण

    (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग)

  • 01 Sep 2021 03:30 PM (IST)

    राज्यात खासगी आणि सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

    - राज्यात खासगी आणि सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

    - खाजगी - सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचं धोरण वैद्यकीय शिक्षण विभागाने आखलं आहे

    - त्या धोरणाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली

  • 01 Sep 2021 11:07 AM (IST)

    धारुर येथील भाजप नागराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

    बीड - धारुर येथील भाजप नागराध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

    डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

    हजारी हे पेशाने स्त्री रोग तज्ञ आहेत

    19 वर्षीय महिलेशी रुगणालयात अश्लील चाळे केल्याचा आरोप

    डॉक्टरवरील गुन्हा मागे घ्यावा यासाठी डॉक्टर असोसिएशन आक्रमक

    धारूर शहर कडकडीत बंद

    आरोपी डॉक्टरच्या समर्थनात नागरिक रस्त्यावर

  • 01 Sep 2021 11:06 AM (IST)

    किरीट सोमैय्या नाशकातील भाजप कार्यालयात दाखल

    नाशिक - किरीट सोमैय्या भाजप कार्यालयात दाखल

    थोड्याच वेळात शिलापूरच्या आर्मस्ट्राँग कंपनीला देणार भेट

  • 01 Sep 2021 10:59 AM (IST)

    कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेणार, त्यामुळे तयारीत रहा

    पुणे -

    - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कधीही बेड ताब्यात घेणार, त्यामुळे तयारीत रहा

    - महापालिकेच्या आरोग्य विभागाचे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र

    - महापालिकेने करोनाच्या दोन लाटांमध्ये सुमारे 80 टक्के बेड खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेतले होते,

    - शिवाय रुग्णालयांनीही कोविड नियंत्रणाची तयारी सुरू करावी, पत्राद्वारे सूचित करण्यात आले.

  • 01 Sep 2021 10:59 AM (IST)

    कुरनुर धरणाचे तीन दरवाजे उघडले

    सोलापूर - कुरनुर धरणाचे तीन दरवाजे उघडले

    बोरी आणि हरणा दोन्ही नद्या द्वारे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कायम असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला

    धरणातून 450 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग

  • 01 Sep 2021 10:58 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात ढगफुटी, कन्नड-धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

    औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीनं कन्नड धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली,

    कन्नड धुळे महामार्ग अजूनही वाहतूकीसाठी बंद

    अनेक वाहनं घाटातचं पडली अडकून,

    मध्य प्रदेशमधून औरंगाबादकडे म्हशी घेऊन निघालेला टेम्पो दरीत कोसळला,

    वाहनचालकाचा जागीच मृत्यू तर 7 म्हशीपैकी 6 म्हशी टेम्पोतचं मृत

    एक जिवंत म्हैस अजूनही टेम्पोतचं

    तिला वाचवण्यासाठी धुळ्यावरून एस डी आर एफची टीम तैनात,

    कन्नड घाटातील रस्त्याची झाली चाळण,

    कन्नड घाटातील दृश्य बघून काळजाचा ठोका चुकेल,

  • 01 Sep 2021 10:57 AM (IST)

    अभिनेत्री पायल रोहतगीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    - अभिनेत्री पायल रोहतगीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल,

    - महात्मा गांधी आणि काँग्रेसची बदनामी केल्याचा ठपका,

    - जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संगीता तिवारी यांनी दाखल केली होती तक्रार

  • 01 Sep 2021 07:19 AM (IST)

    अकरावीच्या प्रवेश शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णय

    पुणे -

    - अकरावीच्या प्रवेश शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णय

    - यंदा शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर

    - या निर्णयानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात १५ टक्के कपात

    - प्रवेश शुल्कातील कपातीमुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा

    - ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांमध्ये राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी कपात केलेल्या शुल्कानुसार शुल्क घ्यायचे आहे

  • 01 Sep 2021 07:18 AM (IST)

    ज्यादा बिलं लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करणार

    पुणे

    - ज्यादा बिलं लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करणार

    - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा ईशारा

    - प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत 22 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिट करून तब्बल 17 कोटी 34 लाख रुपये कमी केले आहेत

    - जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा.

  • 01 Sep 2021 07:17 AM (IST)

    वसई विरारमध्ये रात्री पासून रिमझिम पाऊस सुरु

    वसई विरार

    वसई विरारमध्ये रात्री पासून रिमझिम पाऊस सुरु आहे

    रिमझिम सह सकाळी अधून मधून जोरदार पाऊस पडले आहे..

    सकाळ च्या वेळेत तरी शहरातील सकल भागात कुठेही पाणी साचले नसल्याचे चित्र आहे..

    शहरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे..

    विरार पूर्व मनवेलपाडा तलाव समोरील कारगिल नगर रस्त्यावरील सकाळी 6.50 ची ही दृश्य

    वसई विरार नालासोपारा शहरात आभाळ पूर्णपणे भरलेले असून, पाऊस मोठा पडण्याची शक्यता आहे..

  • 01 Sep 2021 07:16 AM (IST)

    भाजप नेते किरीट सोमैय्या आज नाशिक दौऱ्यावर

    नाशिक - भाजप नेते किरीट सोमैय्या आज नाशिक दौऱ्यावर

    छगन भुजबळ यांच्या काही मालमत्ता असलेल्या ठिकाणांना देणार भेट

    दुपारी पत्रकार प्रोषदेत करणार खुलासा

    किरीट सोमैय्या विरुद्ध भुजबळ वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता

  • 01 Sep 2021 07:14 AM (IST)

    नागपूर शहरात शिवसेनेला गळती?

    - नागपूर शहरात शिवसेनेला गळती?

    - शेखर सावरबांधे पाठोपाठ युवा सेना पदाधिकाऱ्याचा राजीनामा

    - नागपूरातील युवा सेनेच्या शहर समन्वयकाचा राजीनामा

    - तुषार कोल्हे यांनी दिला शहर समन्वयक पदाचा राजीनामा

    - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवला राजीनामा

    - नागपूरातील सेनेत हिंदी भाषीकांच्या कब्जात गेल्याचा आरोप

    - महानगरपालिका निवडणूकीपूर्वी नागपूरात सेनेला धक्का

  • 01 Sep 2021 06:50 AM (IST)

    बीड जिल्ह्यात मुसळधार; पालकमंत्री मुंडेंकडून 24 तास सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

  • 01 Sep 2021 06:48 AM (IST)

    पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने चाळीसगावमधील परिस्थिती पूर्वपदावर

    चाळीसगाव -

    - पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने चाळीसगावमधील परिस्थिती पूर्वपदावर

    - तीतूर नदीवरील घाटरोड पूल वाहतुकीसाठी खुला

    - रात्रीपर्यंत हा पूल होता पाण्याखाली

    - चाळीसगाव शहराच्या मध्यभागी असणारा हा शहराला जोडणारा पूल

    - आता नदीचं पाणी ओसरल्याने घाण कचरा मोठ्या प्रमाणात परिसरात साचलाय

  • 01 Sep 2021 06:47 AM (IST)

    गोंदिया जिल्हात 3671 बालके कुपोषित

    गोंदिया जिल्हात 3671 बालके कुपोषित

    544 बालकात कुपोषणाचे प्रमाण तीव्र

    तीव्र कुपोषणात देवरी तालुका अग्रस्थिनी

Published On - Sep 01,2021 6:40 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.