Maharashtra News LIVE Update | नारायण राणेंचं नाशिक पोलिसांना पत्र, 25 सप्टेंबरला ऑनलाईन जबाब नोंदवणार

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नारायण राणेंचं नाशिक पोलिसांना पत्र, 25 सप्टेंबरला ऑनलाईन जबाब नोंदवणार
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 14 Sep 2021 21:51 PM (IST)

  नारायण राणेंचं नाशिक पोलिसांना पत्र, 25 सप्टेंबरला ऑनलाईन जबाब नोंदवणार

  नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं नाशिक पोलिसांना पत्र

  – 25 सप्टेंबरला ऑनलाईन प्रणालीद्वारे जबाब नोंदवणार

  – 25 सप्टेंबरला ऑनलाईन प्रणालीद्वारे राणे हजर राहणार, पोलीस आयुक्तांना दिले पत्र

  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात राणेंविरोधात गुन्हा

 • 14 Sep 2021 19:09 PM (IST)

  ओबीसी आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न, उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करु

  मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री मोहोदय, विजय वडेट्टीवार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काही मार्ग काढता येतो का याविषयी आमची चर्चा झाली. उद्याच्या मंत्रिमंडळासमोर आम्ही यातील काही मुद्दे मांडू आणि नंतर मार्ग काढू. जिल्हापरिषदांच्या निवडणुकांसर्भात काही मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पन्नास टक्क्यांच्या मर्यादेसमोर जाता येणार नाही, हे शंभर टक्के खरं आहे. त्यामुळे आता काय मार्ग काढता येईल हे उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरेल, असे छगन भुजबळ म्हणाले.

 • 14 Sep 2021 18:09 PM (IST)

  दोरीच्या साहाय्याने गळफास लावून यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

  यवतमाळ – शेतकऱ्याने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून केली आत्महत्या.

  आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील 45 वर्षीय युवा शेतकरी दत्ता सिताराम राठोड यांनी संपविली जीवनयात्रा.

  आज दुपारी स्वतःच्या शेतात जाऊन बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून केली आत्महत्या.

  दत्ता राठोड या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती असून शेतीवर सोसायटीचे एक लक्ष रुपये कर्ज आहे.

  कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

  दत्ता राठोड यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे

 • 14 Sep 2021 18:07 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 178 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 194 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 178 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 194 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2

  – 191 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 498468

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1887

  – एकूण मृत्यू -8983

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 487598

  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6050

 • 14 Sep 2021 18:05 PM (IST)

  अमरावतीच्या झुंज येथे नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले, 8 जण अद्याप बेपत्ता

  अमरावती : जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथे वर्धा नदी पात्रात बोट बुडाली होती. यात 11 जण बुडाले आहेत. सकाळी 10 वाजताची ही घटना असून आतापर्यंत केवळ 3 मृतदेह सापडले असून 8 जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलीस अधीक्षक हरीबालाजी यांनी भेट दिली.  तर आता एनडीआरएफ टीम मृतदेह शोधण्यासाठी येणार आहे, एकाच कुटुंबातील हे सर्व जण होते. कुटुंबातील एका व्यक्तीची दशक्रीया करण्यासाठी हे लोक आले होते.

 • 14 Sep 2021 18:03 PM (IST)

  बोलताना भान ठेवलं पाहिजे एवढं तरी शिका, अभिनेत्री प्रिया बेर्डेंची प्रवीण दरेकरांवर टीका 

  मुंबई : अभिनेत्री प्रिया बेर्डेंची प्रवीण दरेकरांवर टीका

  प्रवीण दरेकरांनी माफी मागावी

  भाजपनं कलाकारांसाठी काय केलं ? प्रिया बेर्डेंचा सवाल

  कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही एवढ्या खालच्या पातळीचा

  आम्ही हे सहन करणार नाही .

  देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील एवढे चांगले वक्ते आहेत,आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे एवढं तरी शिका,

 • 14 Sep 2021 16:52 PM (IST)

  दरेकरांनी माफी मागितली नाही तोंडाळा काळे फासणार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा इशारा

  उस्मानाबाद : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 24 तासात माफी मागितली नाही तर त्यांच्या तोंडाला काळे फासणार

  24 तासात माफी मागा नाहीतर परिणामाला सामोरे जा

  दरेकर यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचे खुले आव्हान

  राष्ट्रवादी पक्ष हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे या प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा सलगर यांनी केला निषेध

  भाजप हा महिलांच्या बाबतीत हीन मनोवृत्ती दर्शवणारा पक्ष, दरेकर यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे

  फडणवीस साहेब तुमच्या वाचाळ वीरांना आवरा, राम कदम, परिचारक व आता दरेकर यांना आवरा

  आगामी काळात राष्ट्रवादी युवती व भाजप वाद पेटणार

 • 14 Sep 2021 16:50 PM (IST)

  प्रविण दरेकरांविरोधात पुण्यात जोडे मारो आंदोलन, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

  पुणे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जोडे मारो आंदोलन

  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे आंदोलन

  पुण्यातील बालगंधर्व चौकात सुरु आहे आंदोलन

 • 14 Sep 2021 15:16 PM (IST)

  सचिन वाझे यांच्यावरील हृदयाची बायपास सर्जरी यशस्वी

  मुंबई : माजी एपीआय सचिन वझे यांच्यावर हृदयाची बायपास सर्जरी करण्यात आली आहे

  मुम्बई सेंट्रल स्थित wokhardt रुग्नलयात करण्यात आली शस्त्रक्रिया

  सचिन वाझे यांची प्रकृति स्थिर आहे, योग्य रित्या शस्त्रक्रिया करण्यात आली

  कार्डियाक सर्जन डॉ. कमलेश जैन आणि कार्डियोलॉजिस्ट डॉ. अंकुर आणि डॉ. केदार यांच्या टीमने केली  शस्त्रक्रिया

  सदर रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

 • 14 Sep 2021 14:33 PM (IST)

  केज तालुक्यातील विडा गावचा पाझर तलाव फुटला, शेकडो एकर शेतीचे नुकसान

  बीड –

  केज तालुक्यातील विडा गावचा पाझर तलाव फुटला

  तलाव फुटून शेकडो एकर शेतीचे नुकसान

  चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने तलाव 100 टक्के भरले होते

  अनेक शेतातील विहिरी भुईसपाट

  घटनास्थळी तहसील प्रशासन पोहचले

  आतापर्यंत जिल्ह्यात 7 तलाव फुटले

 • 14 Sep 2021 14:31 PM (IST)

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात

  औरंगाबाद :

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात

  17 तारखेला इम्तियाज जलील करणार उपरोधिक आंदोलन

  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान करणार उपरोधिक धन्यवाद आंदोलन

  एअरपोर्ट पासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएम कार्यकर्ते दाखवणार धन्यवादाचे उपरोधिक बॅनर

  आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर इम्तियाज जलील यांनी लढवली नवी शक्कल

  शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद देत करणार उपरोधिक आंदोलन

 • 14 Sep 2021 14:29 PM (IST)

  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक

  औरंगाबाद :

  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक

  17 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा रोखणार मुख्यमंत्र्यांची गाडी

  गाडी रोखून क्रांती मोर्चा करणार आरक्षणाशी संबंधित जीआरची होळी

  पत्रकार परिषदेत दिली मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी माहिती

 • 14 Sep 2021 14:28 PM (IST)

  सोलापूरमध्ये बेघर वृद्धाचा खून करणाऱ्या आरोपीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी घातल्या बेड्या

  सोलापूरमध्ये बेघर वृद्धाचा खून करणाऱ्या आरोपीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी घातल्या बेड्या

  युसुफ पिरजादे असे आरोपीचे नाव

  सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉक मधील  सलाईनच्या रॉडने मारहाण करून केला आहे खून

  उपचारासाठी युसूफ पीरजादे झाला होता सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल

  किरकोळ वादातून युसूफने केला आहे बेघर वृद्धाचा खून

 • 14 Sep 2021 12:12 PM (IST)

  ओबीसी आरक्षण मिळालं नाही, यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भुमिका संशयास्पद – बावनकुळे

  – ओबीसी आरक्षण मिळालं नाही, यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भुमिका संशयास्पद

  – आरक्षण मिळू न देण्यात सरकारमधले झारीतले शिक्राचार्च जबाबदार

  – नाना पटोले यांनी सांगीतलं विधी न न्याय विभागाने योग्य बाजू न मांडल्याने आरक्षण गेलं

  – राज्य सरकार विरोधात उद्या भाजप राज्यभर आंदोलन करणार

  – राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार

  – फडणवीस, चंद्रकांत दादा, बावनकुळे आंदोलनात सहभागी होणार

  – ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होत असल्याने भाजप संतप्त

 • 14 Sep 2021 12:10 PM (IST)

  सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने दुसऱ्या रुग्णाचा केला खून

  सोलापूर – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने दुसऱ्या रुग्णाचा केला खून

  बेघर असलेल्या रुग्णाला सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होते उपचारासाठी दाखल

  सलाईनच्या रॉडने केली मारहाण

  बेघर रुग्णाचा जागेवरच मृत्यू

  युसूफ पीरजादे नामक रुग्णाने खून केल्याची माहिती

 • 14 Sep 2021 12:09 PM (IST)

  नाशकात लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने छापल्या बनावट नोटा

  नाशिक – लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने छापल्या बनावट नोटा

  सुरगाणा तालुक्यातील धक्कादायक प्रकार

  बनावट नोटा छापणा-या रॅकेट चा प्रदाफॅश..

  नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई..

  सुरगाणा मधून 7 जणांना पोलिसानी केली अटक

  आरोपी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात राहणारे

  पावणे सात लाखांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त

  नाशिकच्या विंचूर येथे छापल्या जात होत्या नोटा..

  कलर प्रिंटरचे दुकान बंद असल्याने छापल्या बनावट नोटा..

  नोटांचा आणखी वापर कुठे झाला याचा तपास सुरू

 • 14 Sep 2021 08:57 AM (IST)

  कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

  कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

  धरावी परिसरातली धक्कादायक घटना

  शुक्रवारी सकाळी झोपेतून उठताच कोलगेट समजून या मुलीने घरातच असणार उंदीर मारण्याच औषध नजरचुकीने घेतलं आणि त्याने ब्रश केला

  चव वेगळी लागताच तिच्या लक्षात आलं मात्र तोवर उशीर झाला होता

  मुलीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र रविवारी तिचा मृत्यू झाला

  धारावी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केलीय

 • 14 Sep 2021 08:54 AM (IST)

  दारूसाठी मित्राने पैसे न आणल्याने मित्राचा खून

  दारूसाठी मित्राने पैसे न आणल्याने मित्राचा खून

  विकास राहटवड आणि संदीप मुळेकर या दोन आरोपींनी केला मित्र महेश काकडे याचा दारूसाठी खून..

  मित्राचा खून केल्यानंतर मृत मित्राच्या खिशातून पाचशे रुपयेची आणली दारू..

  आज दो लोगोको टपका डाला असे म्हणत फिरत होते गावभर..

  नक्षत्रवाडी येथील खुनाचे गुन्हा शाखेने केले काही वेळेतच आरोपी अटक..

 • 14 Sep 2021 08:08 AM (IST)

  धर्मवीर संभाजी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याचे करण्यात येणार शुद्धीकरण

  सोलापूर – धर्मवीर संभाजी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याचे करण्यात येणार शुद्धीकरण

  सुवेज ट्रीटमेंट प्लांट करण्यासाठीचे काढण्यात आली टेंडर

  पाण्याचे झालेले प्रदूषण  पावसाचे पाणी तलावात आल्याने गेल्या आठवड्यात झाला होता तलावातील हजारो माशांचा मृत्यू

  एसटीपी  पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास तलावातील प्रदूषण टाळता येणार
  तलावात जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण झाल्यास मासे ,जलचर, पक्षी यांना असणारा धोका होणार कमी

 • 14 Sep 2021 08:07 AM (IST)

  पुण्यात अद्याप 20 लाख नागरिक लसीकरणापासून वंचित

  – पुण्यात अद्याप 20 लाख नागरिक लसीकरणापासून वंचित

  – पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० लाख ३३ हजार ३९५ नागरिकांना अद्याप कोरोनाचा पहिला डोससुद्धा मिळू शकला नाही,

  – तर ३९ लाख ३१ हजार ६५२ नागरिकांना दुसरा डोस मिळणे बाकी…

  – आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यत लसीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी ७९ लाख ९८ हजार ४४२ लागणार डोस…

  – जिल्ह्यात जवळपास ८५ लाख ३९ हजार नागरिक लसीकरणास पात्र…

  – आतापर्यंत ६५ लाख ०६ हजार ३११ जणांनी कोरोना लसीकरणात पहिला डोस घेतला…

  – पहिला डोस घेतलेल्यांपैकी २५ लाख ७४ हजार ६५९ जणांनी घेतले दोन्ही डोस..

  – संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण ९० लाख ८० हजार ९७० दिले डोस

 • 14 Sep 2021 07:53 AM (IST)

  नाशकात पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

  नाशकात पोलिसानेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

  नाशिकच्या पंचवटी परिसरातील घटना

  फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या पोलिसाला अटक

  संशयित पोलीस दीपक जठार हा उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत

  संशयिता विरोधात पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता

  संशयित पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत केलं अपहरण

 • 14 Sep 2021 07:51 AM (IST)

  शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार

  पुणे –

  – शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार,

  – १६ तारखेला मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश,

  – सुरेखा पुणेकरसह संजय लोंढे आणि कलाकार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

 • 14 Sep 2021 07:51 AM (IST)

  पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बद्दली नंतरही अडचणीत वाढ

  अहमदनगर –

  पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बद्दली नंतरही अडचणीत वाढ

  देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात येणार

  आज 11 वाजता जेष्ठ विधिज्ञ असीम सरोदे तक्रार दाखल करणार

  देवरे यंची जळगाव येथे झाली बद्दली,

  तर देवरे यांची काही दिवसांपूर्वी सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती

 • 14 Sep 2021 07:50 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार

  कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार

  पहिल्या टप्प्यात 624 संस्थांची होणार निवडणूक प्रक्रिया

  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

  कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून रखडल्या आहेत सहकारी संस्थांच्या निवडणुका

  कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक सहकारी संस्थांचा समावेश

  पहिल्या टप्प्यात गव्हर्मेंट सर्व्हन्ट बँकेसह शरद आणि डी वाय पाटील कारखान्यांच्या निवडणुकीचा समावेश

 • 14 Sep 2021 06:55 AM (IST)

  कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले

  कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले

  कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुट 3 इंचावर

  कोयना धरणातून 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

 • 14 Sep 2021 06:51 AM (IST)

  कोल्हापुरात चालत्या एसटी बसला लागली आग

  कोल्हापूर :

  चालत्या एसटी बसला लागली आग

  रविवारी पहाटे घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  आगीत बस जाळून खाक

  तावडे हॉटेल परिसरातील घटना

  शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

  सुदैवाने जीवितहानी नाही

 • 14 Sep 2021 06:37 AM (IST)

  परेलच्या  सारथी बार बाहेरचा तुंबड हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

  मुंबई –

  परेलच्या  सारथी बार बाहेरचा तुंबड हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

  सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरलं

  बार स्टाफ आणि ग्राहकामध्ये राडा झाल्याचा व्हिडीओत दावा

  पोलिस घेताहेत व्हिडीओची माहिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI