Chiplun Nagar Parishad election Results 2025 : चिपळूणमध्ये भाजप उमेदवार फक्त 1 मताने जिंकला, भाजपच्या माजी आमदाराचा मुलगा 1 मताने हरला

Chiplun Nagar Parishad election Results 2025 : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. एका ठिकाणी उमेदवार फक्त एक मताने निवडणूक जिंकलाय, तर काही भागात दिग्गज नेत्यांना धक्के बसले आहेत. जाणून घ्या.

Chiplun Nagar Parishad election Results 2025 : चिपळूणमध्ये भाजप उमेदवार फक्त 1 मताने जिंकला, भाजपच्या माजी आमदाराचा मुलगा 1 मताने हरला
Chiplun Nagar Parishad election Results 2025
Image Credit source: Representative Image
| Updated on: Dec 21, 2025 | 12:08 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधला फरक खूप छोटा असतो. काही हजार मतांनी निवडून येणारे उमेदवार अपवादा‍त्मक असतात. पण बऱ्याच उमेदवारांचा विजय काहीशे मतांनी होतो, तर काही उमेदवार अवघ्या एक-दोन मतांनीही जिंकतात. कोकणात चिपळूणमध्ये असच घडलं आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार होते. 110 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदाचे तीन तर नगरसेवक पदाचे 10 अर्ज बाद झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपरिषदेत एकूण 26 प्रभाग आहेत. यात एका प्रभागातून शुभम पिसे हे अवघ्या 1 मताने विजयी झाले आहेत.

तळेगाव नगरपरिषदच्या नगराध्यक्ष पदी भाजपच्या संतोष दाभाडे विजयी झाले आहेत. दाभाडे हे अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार होते.या विजयात आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणेंचा वाटा असल्याचा दावा दाभाडे यांनी केला. मंत्री जयकुमार रावळ यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या रंजनी वानखेडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराने केला पराभव. कलावती माळी यांनी केला भाजपच्या रंजनी वानखेडे यांचा पराभव.

भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाचा 1 मताने पराभव

वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक निकालात भाजपचे माजी आमदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांचा नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 2 मधून अवघ्या 1 मताने पराभव. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार करुणा कल्ले या झाल्या विजयी. फक्त एका मताने निकाल फिरल्याने प्रभाग क्रमांक 2 चा हा निकाल सध्या वाशिम शहरात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

प्रवरा नगरपालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता

देवळाली प्रवरा नगरपालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. भाजपचे सत्यजित कदम बहुमताने विजयी झाले. भाजपचे 14 नगरसेवकही विजयी झाले.काँग्रेसचे 4 नगरसेवक विजयी झाले. वंचितचा एक उमेदवार विजयी. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी गड राखला आहे.

सुवर्णा खताळ पिछाडीवर

संगमनेर सेवा समितीच्या (थोरात-तांबे गट) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथीली तांबेची 5200 मतांची निर्णायक आघाडी. शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ पिछाडीवर आहेत. संगमनेर सेवा समितीचे 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. महायुतीला अद्याप खाते उघडता आलेले नाही. अजूनही उर्वरित 16 जागांची मतमोजणी सुरू आहे.

सासवडचा कायापालट करायचाय

“विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. जनतेने आम्हाला स्वीकारलं. आता आम्हाला सासवडचा कायापालट करायचा आहे. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. या विजयाचं श्रेय जनतेला आहे” अशी भावना नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार आनंदी जगताप यांनी व्यक्त केली