पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही शरद पवार गटाला मोठा धक्का, विधानसभा लढवलेल्या नेत्याने सोडला पक्ष; मोठा भूकंप

आगामी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना शरद पवार गटात मोठे पडसाद उमटले आहेत. अजितदादांसोबत आघाडीला विरोध करत प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राहुल कलाटेंना फोडल्याने शरद पवार गटाला दुहेरी धक्का बसला आहे. यामुळे पक्षातून आऊटगोइंग सुरू झाल्याने निवडणुकीपूर्वी चिंता वाढली आहे.

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही शरद पवार गटाला मोठा धक्का, विधानसभा लढवलेल्या नेत्याने सोडला पक्ष; मोठा भूकंप
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का
Image Credit source: social media
| Updated on: Dec 23, 2025 | 11:12 AM

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्यात सर्वच पक्षांचीकंबर कसून तयारी सुरू असून अनेत ठिकाणी युती, आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार , हे दोन्ही पक्षदेखील ही निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा सुरू असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र अजित पवार गटासोबत आघाडी करण्याचा निर्णय शरद पवार गटातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पटला नसून महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षात राजीनामा सत्र सुरू झालं आहे. अजितदादांसोबत आघाडी नकोच अशी भूमिका घेत शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला.

दादांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी नको असा सूर प्रशांत जगताप यांनी आळवला होता, आता त्यात जगताप यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. हे कमी की की काय म्हणून शरद पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्येही धक्का बसला आहे. भाजपनेच पवारांना धक्का दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये घडतंय काय ?

शरद पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने मोठा धक्का दिला आहे. विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पडणार आहे. राहुल कलाटे यांवी 2025 मध्ये शंकर जगताप यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. कलाटे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक व महापालिका गटनेते म्हणून ओळखल जायचे. मात्र त्यांनी आता शरद पवार गटाची साथ सोडली असून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक एवढी तोंडावर आलेली असताना पक्षातून आऊटगोईंग सुरू झाल्याने पक्षात भूकंप झाला आहे.

आधी प्रशांत जगपात हे नाराज होऊन पवारलगटातून बाहेर पडले. त्यांनी राजीनामा दिला असून लवकरच ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात. प्रशांत जगताप राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आता राहुल कलाटे यांनी पक्षाची साथ सोडल्याने शरद पवार गटासाठी हे दुहेरी नुकसान असून त्याचा मोठा फटका बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे.