
“राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. 12 ते 14 लाख एकर जमीन त्यावरची पीक बाधित झालेली आहेत. काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे. विशेषत: नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती आली. आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे. वाईट घटना आहे. ओव्हरऑल परिस्थिती आता नियंत्रणात आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मुंबईत अतिवृष्टी झाली. काही भागात 300 एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला. रेकॉर्ड पाऊस पडला. काही ठिकणी पाणी साचलं, आता पाणी ओसरुन वाहतूक चालू झालीय. मुंबई उपनगरीय लोकलची प्रवासी वाहतूक मंदगतीने बहुतांश ठिकाणी सुरु आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मिठी नदी धोका पातळीवर गेल्यामुळे 400 ते 500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. पण आता पाण्याची पातळी कमी होत आहे. पुढच्या काही काळासाठी पावसाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. ते स्वत: मिठी नदीच्या ठिकाणी गेले. स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुट्टी देखील दिली आहे, जेणेकरुन लोकांवर जाण्याचा ताण पडू नये. शक्य आहे तिथे वर्कफ्रॉम होम देण्याचे निर्देश दिले आहेत. याक्षणी परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘तिथे धोका आहे, तिथे लक्ष ठेऊन आहोत’
“एनडीआरएफ, एसडीआरएफ अलर्टवर आहेत. बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत. बाजूच्या राज्यांसोबत नीट संपर्क आहे. त्यामुळे जो काही पाण्याचा विसर्ग आहे, त्याचं मॅनजेमेंट करतोय. बाजूची राज्य मदत करतायत. तेलंगण सोबत ही योग्य प्रकारे संपर्क आहे. काही कॅचमेट असे आहेत, जे कंट्रोलमध्ये नाहीयत, अनकंट्रोल आहेत तिथे धोका आहे. तिथे लक्ष ठेऊन आहोत” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
मिठी नदीच्या धोका पातळीबद्दल काय म्हणाले?
मुंबईत मिठी नदीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईत दोन गोष्टी आहेत, 300 मिमी मोठा पाऊस मानला जातो. नियमित पावसापेक्षा जास्त पाऊस मानला जातो. मागच्या काळात मिठी नदीच काय झालं माहित आहे, त्याच्या सूरस, चमत्कारिक कथा समोर येत आहेत” “मिठी नदीतून गाळ काढण्याच्या नावाखाली जे काही केलं, ते समोर आलय. नव्याने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने महापालिकेला निर्देश दिले आहेत. महापालिका नव्याने काम करतेय” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शेतीच्या नुकसानीबद्दल काय निर्णय?
शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालय, पंचनाम्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं. त्यावर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस बोलले. “दोन गोष्टी केल्या आहेत. जिथे जनावराचं, घराच नुकसान आहे, दुर्देवाने डेथ झालेली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमानुसार जिल्हाधिकारी मदत करु शकतात तसच पंचनाम्याचे निर्देश दिलेत” असं मुख्यमंत्री म्हणाले.