Corona Virus : दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

| Updated on: Dec 30, 2021 | 7:46 PM

आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.

Corona Virus : दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज साडे पाच हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत आडे तीन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध (Corona Guidelines) लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची (Task Force) बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.

‘कठोर निर्बंधांबाबत आज, उद्यामध्येच निर्णय’

राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय आज उद्यामध्येच घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली आहे. ‘हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे. त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरलं जावं, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्यण

लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्यानं करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लर न घेतलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आवाहन

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहनही टोपे यांनी यावेळी केलं आहे.

इतर बातम्या :

Breaking : आमदार नितेश राणेंना दिलासा नाहीच, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, पुढे काय?

‘आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ’, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट!