
Maharashtra Corona Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार पाहायला मिळतोय. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळथ आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. कारण गेल्या 24 तासांत एकूण 43 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढ आहे. 24 तासांत महाराष्ट्रात एकूण 43 रुग्ण आढळले आहेत. या सर्वच रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण केरळ (189) राज्यात सापडले आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या रुग्णांची संख्या 89 आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 467 सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत.
वसईच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. विनीत विजय किणी ( वय 43) असे मृत कोरोनाग्रस्ताचे नाव आहे. ते वसई खोचिवडेमधील भंडारआळी येथील राहणारे होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना काल रात्री 6.58 मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. आज सकाळी 7.12 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कोव्हिडंची लक्षण जाणवली तर नागरिकांनी ती अंगावर काढू नये. तसेच तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अहवान वसई तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. अशा काळात सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. या आजारांची लक्षणं तसेच कोरोनाची लक्षणं जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे कोणताही आजार अंगावर काढू नये, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही सांगितले जात आहे. तुम्हाला कोरोना विष्णूची लागण झाल्यासाराखी लक्षणं जाणवलीच तर त्वरीत जवळच्या रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी. तसेच उपचार करण्यास दिरंगाई करू नये, असे आवाहन या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे.