District Bank Election Result 2026 LIVE : विजयानंतर गोपीचंद पडळकर यांच्या भावाची मोठी प्रतिक्रिया, अनेकांनी..
Maharashtra District Bank Election Result 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. त्यातच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एका मताने उमेदवाराचा पराभव झाला.

LIVE NEWS & UPDATES
-
पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची प्रतिक्रिया समोर
गोपीचंद पडळकर यांना अनेकांनी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीचंद पडळकर यांनीच विरोधकांना खिंडीत गाठले. गोपीचंद पडळकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.
-
महिला पायलट असल्यानं पिंक लाईन विशेष – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिला पायलट असल्यानं पिंक लाईन विशेष असणार आहे. मेट्रोमुळे हिंजवडी IT पार्क, बालेवडीतलं ट्रॅफिक कमी होणार आहे.. यामुळे रोज 2.5 लाख प्रवाशांना मेट्रोचा लाभ होणार आहे… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
-
-
माजी मंत्र्यांच्या लेकाची निवडणुकीत बाजी, उदयसिंह पाटलांचा विजय..
कराड सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री विलास काका उंडाळकर पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला.
-
सुनील माने आणि सुनील खत्री या दोन्ही दिग्गजांना प्रत्येकी 44-44 मते
कोरेगाव सोसायटी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने आणि भारतीय जनता पक्षाचे सुनील खत्री यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते पाहता सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सुनील माने आणि सुनील खत्री या दोन्ही दिग्गजांना प्रत्येकी 44-44 मते मिळाली.
-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला- गोपीचंद पडळकर
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये जतच्या जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला,अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील केली आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांचा एकतर्फी विजय झालेला आहे. 54 मतांनी पडळकर विजय झाले आहेत, सर्वपक्षीय निवडणूक होताना गोपीचंद पडळकर यांच्यासह सहा जागांवर निवडणूक झाली होती त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचा राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं.अखेर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विनोद पवार यांचा दारुण पराभव करत जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे,.
-
-
संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी शिंदे गट शिवसेना
फलटण मध्ये भाजपला मोठा धक्का
संजीवराजे नाईक निंबाळकर ( शिवसेना ) ७१
समशेरशिंग नाईक निंबाळकर ( भाजपा) ६०
मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
-
गोपीचंद पडळकर यांच्या विजयानंतर पडळकर यांना मुख्यमंत्र्यांचा फोन
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना फोन करीत शुभेच्छा दिल्या. गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची जोरदार चर्चा होत आहे.
-
जळगाव जिल्हा बँक निवडणूक अपडेट, शिंदे गटाच्या आमदाराचा मुलाचा अर्ज बाद
जळगाव जिल्हा बँकेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला. अर्ज बाद झाल्यानंतर सुमित पाटील यांनी प्रचंड संताप आणि रोष व्यक्त केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनाच्या दरवाजाला लाथांनी तसेच हातांनी ठोकून सुमित पाटलांनी नाराजी व्यक्त केली.
-
शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळणार
शरद पवार यांच्या संदर्भात डॉक्टरांनी मोठी अपडेट दिली आहे. शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याची डॉ.पूर्वेज ग्रँड यांची माहिती हाती आली आहे. एक दोन दिवसाच्या आरामानंतर शरद पवार पुन्हा दौरा करू शकतात, असं डॉ.पूर्वेज ग्रँड यांनी सांगितलं.
-
Pune : उद्घाटनापूर्वीच मेट्रोविरोधात बाणेर-बालेवाडीत संताप! आज सर्वपक्षीय आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने माण, हिंजवडी, बाणेर-बालेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवेचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र, बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानकांचे काम अपूर्ण असताना उद्घाटनाची घाई कशासाठी? असा नागरिकांनी सवाल केला. बाणेर-बालेवाडीतील मेट्रोची स्थानके अद्याप बंद असून एकही स्थानक प्रवाशांसाठी सुरू नसल्याचा आरोप केला आहे.
-
सिंधुदुर्गातील ओंकार हत्तीवर मशालीनंतर ‘रॉकेट हल्ला’
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात ओंकार हत्ती राजरोस वाडी वस्त्यांमध्ये फिरत असून त्याच्याकडून शेतीचे नुकसान होतंय. ओंकार हत्तीला लांब घालविण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीवर पेटत्या मशाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेचा नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आज असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ओंकार हत्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
-
भाजपचे समशेरसिंह निबाळकरांचा मोठा पराभव
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. त्यातच भाजपाल धक्का बसला. भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.
-
मला रॅम्पवॉक करायची हौस नाही – पंकजा मुंडे
रॅम्पवॉकवरून झालेल्या टीकेवर पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, मला रॅम्पवॉक करायची हौस नाही’. मुंबईत जालन्यातील महिलांचा साड्यांचा स्टॉल लागला होता. माझ्या जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्पवॉक करेन’.
-
सातारा जिल्हा बँकेत निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपाचा मोठा पराभव..
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचे निकाल पुढे येत आहेत. या निकालात भाजपाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. यातच फलटण तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये महायुतीला मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.
-
सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विजयानंतर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
शंभूराज देसाई यांच्या विजयाच्या दिल्या घोषणा. पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी. पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा केला पराभव
-
उजनीचे पाणी भीमेत दाखल; पंढरपूरसह चार शहरांची तहान भागणार
उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी पंढरपुरात दाखल झाले आहे. यामुळे पंढरपूर, सोलापूर, सांगोला आणि मंगळवेढा शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. भीमा नदीपात्रात पाणी आल्याने विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांनाही आता चंद्रभागेत मुबलक पाण्यात स्नान करता येणार आहे. उजनीच्या पाण्यामुळे नदीपात्रातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असून, नागरिक आणि भाविकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
-
शिवसेनेचे शेखर गोरे यांच्या मतामुळे खळबळ
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकाबी बँकेच्या निकालाने अनेकांना धक्का दिला. मान मतदारसंघात जयकुमार गोरे यांनी मुसंडी मराली. तर या निवडणुकीत शिवसेनेचे शेखर गोरे यांना अवघी ७ मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना १४ मतं मिळाली. तर जयकुमार गोरे यांना ५३ मतं मिळाली.
-
फलटणमध्ये भाजपला मोठा धक्का
सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल अपडेट
संजीवराजे नाईक निंबाळकर ( शिवसेना ) 71
समशेरशिंग नाईक निंबाळकर ( भाजपा) 60
-
पाटणमध्ये ४२ वर्षांनी देसाई गटाचा झेंडा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा विजय खेचून आणला. ४२ वर्षांनी देसाई गटाचा झेंडा पाटणमध्ये फडकला. पाटण सोसायटीमध्ये विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाला. जिल्हा बँकेत देसाई गटाचे वर्चस्व दिसून आले.
-
शंभूराज देसाई यांचा मोठा विजय, 11 जागांच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा…
सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी नऊ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित 12 जागांसाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पहिल्या निकालात शंभूराज देसाई यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
-
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय. गोपीचंद पडळकर यांना पडली 54 मते. महाविकास आघाडीची विनोद पवार यांना पडली 34 मते. जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजयी
-
तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक. तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय. अटीतटीच्या निवडणुकीत १ मताने संजय काका पाटलांचा विजय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा झाला पराभव. माजी संजयकाका पाटलांनी पडली 39 मते. माजी आमदार सुमनताई पाटील यांना पडली 38 मते
-
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
पारनेर सेवा सहकारी संस्था मतदार संघ…खासदार निलेश लंके विजयी. लंके यांना 104 पैकी 63 मते मिळाली
-
पारनेरमध्ये निलेश लंके यांचा दणदणीत विजय
अहिल्यानगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेरच्या प्रतिष्ठेच्या लढतीत खासदार निलेश लंके यांनी विजय मिळवला. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मतदारसंघातून लंके याँनी एकूण १०४ पैकी ६४ मते मिळवली. भाजपचे राहुल शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
-
कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक. कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे टी व्ही पाटील यांचा केला पराभव. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना पडली 37 मते. टीव्ही पाटील यांना पडली 33 मते. 4 मतांनी माजी मंत्री अजित घोरपडे यांचा विजय तर मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे विजयी आणि भाजप आमदार सुरेश खाडे याचे समर्थक भाजपाच्या अनिल शेगुनशे यांचा केला पराभव
-
भाजप गोपीचंद पडळकर विजय झाल्यानंतर पडळकर समर्थकाराकडून जल्लोष
भाजप गोपीचंद पडळकर विजय झाल्यानंतर पडळकर समर्थकाराकडून जल्लोष करण्यात येत आहे. यावेळी जल्लोषादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना घोड्यावर बसून जल्लोष करण्यात आला.
-
कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने ट्विस्ट..
सुनील माने 44 मते (राष्ट्रवादी) आणि सुनील खत्री (भाजप) 44मते यांच्यात टाय..
फाटलेली 1 चिठ्ठी बाजूला ठेवल्याने ट्विस्टएक मतपत्रिका बाद झाल्याने दोघांचे भवितव्य आता ईश्वर चिट्टीवर ठरणार..
-
सातारा जिल्हा बँक निवडणूक अपडेट, वाचा निकाल..
कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने ट्विस्ट..
सुनील माने ४४ मते (राष्ट्रवादी) आणि सुनील खत्री (भाजप) ४४ मते यांच्यात टाय..
फाटलेली १ चिठ्ठी बाजूला ठेवल्याने ट्विस्टएक मतपत्रिका बाद झाल्याने दोघांचे भवितव्य आता ईश्वर चिट्टीवर ठरणार..
………जावळी सोसायटी मतदारसंघ
१) विठ्ठल गोळे ८ मते राष्ट्रवादी
२) ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते विजयी भाजप
……..
खंडाळा सोसायटी मतदारसंघ
१) अजय भोसले राष्ट्रवादी २८ मते
२) संजीव गाढवे भाजप २१ मते
३) शामराव गाढवे अपक्ष शून्य मते
……..
महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ
१) रुपाली राजपुरे राष्ट्रवादी ८ मते विजयी
२) संजय मोरे शिवसेना ४ मते
.. …….
पाटण सोसायटी मतदारसंघ
१)शंभूराज देसाई शिवसेना ५८ मते विजयी
२) सत्यजीत पाटणकर भाजप ४६ मते
…….
मान सोसायटी मतदारसंघ
१) जयकुमार गोरे भाजप ५३ मते
२) मनोज पोळ राष्ट्रवादी १४ मते
३) शेखर गोरे शिवसेना ७ मते
राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला. त्यातच आज सांगली, अहिल्यानगर आणि सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही निकाल हाती येत आहेत. अनेकांना मोठा धक्का बसला. सांगली जिल्हा बँकांच्या निवडणुकीत वारे पलटले आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय झाला. अनेक प्रस्तापित लोकांना धक्का बसला. अहिल्यानगर सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषही साजरा केला. गोपीचंद पडळकर यांना मोठा विजय मिळाला. सांगली जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक वाटाघाटीची होताना दिसत आहे. थेट 1 मताने उमदेवाराचा पराभव झाला. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी tv9 मराठीला फॉलो करा.