AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे शिवसेना आमदाराच्या मुलाचा प्रताप, अर्ज बाद झाला म्हणून थेट निवडणूक अधिकार्‍याच्या दालनावर घातल्या लाथा

MLA Kishor Patil Son Sumit Patil: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अर्ज बाद झाला म्हणून शिंदे शिवसेनेच्या आमदाराच्या मुलाने थेट निवडणूक अधिकार्‍याच्या दालनावर लाथा घातल्याने खळबळ उडाली आहे.

शिंदे शिवसेना आमदाराच्या मुलाचा प्रताप, अर्ज बाद झाला म्हणून थेट निवडणूक अधिकार्‍याच्या दालनावर घातल्या लाथा
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, अर्ज बाद झाला म्हणून थेट निवडणूक अधिकार्‍याच्या दालनावर घातल्या लाथा
| Updated on: Nov 03, 2026 | 12:45 PM
Share

Jalgaon District Cooperative Bank Election: जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्ज बाद झाल्यानंतर सुमित पाटील यांनी प्रचंड संताप आणि रोष व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनाच्या दरवाजाला लाथांनी तसेच हातांनी ठोकून सुमित पाटलांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय दबावातून तसेच अदृश्य शक्तींच्या माध्यमातून माझा अर्ज बाद केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे सुमित पाटील यांनी केला. तर याप्रकरणात जळगाव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे.

शिवसेना स्टाईलने उत्तर देणार

जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज मोठा धक्कादायक प्रकार घडला. आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. सकाळी नऊ वाजेपासून या ठिकाणी उपस्थित असून निकालाची प्रत देण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला. अर्ज बाद केल्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी सुमित पाटील यांनी केली.

संबंधित प्रकाराला शिवसेना स्टाइल उत्तर देणार असण्याचा सुमित पाटील यांचा इशारा दिल्याने आता वातावरण तापले आहे. अर्जावर हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर थेट अर्जच बाद झाल्याने आता सुमित पाटील यांनी खळबजनक आरोप केल आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेना भाजप मध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे

नियमानुसारच अर्ज बाद

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटलांचा जिल्हा बँक निवडणुकीतील अर्ज बाद झाला. सुमित पाटील यांच्या अर्जावर निवडणुकीच्या नियमानुसार कारवाई करण्यात आल्याची सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिली. भाजपचे सतीश शिंदे यांचा सुमित पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. लेखापरीक्षण, संचालक पदाचा कार्यकाळ यासह वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर अर्ज बाद केल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. राजकीय दबावातून आपला अर्ज बाद केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे सुमित पाटील यांनी केला आहे. निवडणुकीच्या निकष व नियमानुसारच अर्ज बाद केला असल्याचं सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल ठाकुर यांनी स्पष्टीकरण दिले.

Follow Us
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष