Gokul President Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का, राज्य सरकारने तो निर्णय घेतलाच

Gokul President Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का बसेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारकडून असा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा होती.

Gokul President Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का, राज्य सरकारने तो निर्णय घेतलाच
Satej Patil
| Updated on: Nov 04, 2026 | 2:39 PM

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. गोकुळ बाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गोकुळवर चार शासन नियुक्त संचालक नेमण्यात येणार आहेत. कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार आहे. पण सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळूनही सत्तेपासून वंचित रहावं लागेल. महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या आहेत.शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. महायुतीच्या पॅनलचा संचालक निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल. अशावेळी सत्तेचा कौल असून सतेज पाटील यांची आघाडी सत्तेबाहेर राहू शकते.

प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या, तर महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या आहेत. दोघांमध्ये फक्त एका जागेचं अंतर आहे. आता दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी 14 जणांच्या उपस्थितीचा कोरम महत्वाचा मानला जातो. परंतु कोरम न झाल्याने गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Loading...

पाच पैकी किती संचालक राजकीय

500 कोटीची उलाढाल असलेल्या गोकुळच्या संस्थांवर पाच संचालक नेमले जाणार आहेत. राज्यमंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आलीय. पाच संचालक नेमले जाणार आहेत. यात चार राजकीय आणि एक शासकीय संचालक असणार आहेत. या संचालकांना मतदानाचा अधिकार असणार आहे. जिल्हा बँका वगळून बाकी संस्थांवर आता संचालक नेमता येणार आहेत.  गोकुळवर संचालक नेमण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं.  त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता.

सतेज पाटील काय म्हणाले?

“लोकशाहीचा कौल बाजूला ठेवणार मग कोण गप्प बसणार?. 2029 मध्ये देखील सत्ता बदलणार आहे, त्यावेळी आम्ही देखील या गोष्टी लक्षात ठेऊ. मी म्हटलेलं निवडून आल्यावर गोकुळमध्ये एकत्र कारभार करु” असं सतेज पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us