महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021 : मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नाव गायब, मतदान केंद्रावर गोंधळ

| Updated on: Jan 15, 2021 | 9:25 AM

Maharashtra Gram Panchayat Elections 2021: मनमाडमधील पानेवाडी (Panevadi) येथे मतदान यंत्रावरून एका उमेदवाराचे नावच गायब झाल्याचा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021 : मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नाव गायब, मतदान केंद्रावर गोंधळ
Follow us on

नाशिक : राज्यात अनेक ठिकाणी आज (15 जानेवारी) ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Elections 2021) होत आहेत. राज्यभरात एकाच टप्प्यात या निवडणुका होत आहे. मात्र, मनमाडमधील पानेवाडी (Panevadi) येथे मतदान यंत्रावरून एका उमेदवाराचे नावच गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. या सर्व गोंधळामुळे येथील निवडणूक प्रक्रिया खोळंबली असून प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून मतदान यंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत. विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मागील काही दिवसांपासून उमेदवारांनी जीवाचं रान करुन प्रचार केला आहे. विविध आश्वसनं, जाहीरनामे यांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनमाडमधील पानेवाडी येथे ऐन मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रावरुन उमेदवाराचे नावच गायब झाल्यामुळे येथे गोंधळ उडाला आहे. उमेदवाराने मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्यामुळे येथे गदारोळ झाला आहे. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

हा प्रकार समोर येताच निवडणूक अधिकारी पानेवाडी गावात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मतदान यंत्राची दुरुस्ती सुरु असून लवकरच मदतान प्रक्रिया सुरळीत होईल असे सांगितले जात आहे. मात्र, रात्र आणि दिवस एक करुन प्रचार केल्यानंतर ऐन मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रावर नावच नसल्यामुळे उमेदाराकडून संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान, राज्यात सध्या 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. उरलेल्या ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मदतान करता येईल. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

बीडमध्ये मतदान यंत्रात बिघाड 

धुळे जिल्ह्यातील कावठी येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाली आहे. अचानकपणे मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे येथील मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. मतदान प्रक्रिया थांबल्यामुळे येथे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या :

धुळ्यात जाऊबाई जोरात, ग्रामपंचायत निवडणुकीत सख्ख्या जावांमध्ये सामना

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

Gram Panchayat Elections | मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? वाचा संपूर्ण माहिती