महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: आजीची माया, देवाघरी जातानाही नातवावर विजयाची छाया

मुळशी तालुक्यातील वाळेण येथील वॉर्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. | gram panchyat election results 2021

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: आजीची माया, देवाघरी जातानाही नातवावर विजयाची छाया
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 8:56 AM

पुणे: ग्रामीण भागातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchyat Election Results) निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये पुण्याच्या मुळशी येथील एका प्रसंगाची प्रचंड चर्चा रंगली आहे. याठिकाणी एका आजीने आपल्या नातवाच्या विजयासाठी साक्षात मृत्यूलाही अडवून ठेवले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Mulshi Taluka gram panchyat election results 2021)

मुळशी तालुक्यातील वाळेण येथील वॉर्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. साठे यांच्या 113 वर्षांच्या आजी सरुबाई साठे यांच एक मत त्यांच्या या विजयासाठी निर्णायक ठरलं असं म्हणावं लागेल. मतदानाच्या दिवशी नातवाला मतरुपी आशीर्वाद देत आजींनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे विजय साठे यांना मिळालेले मोलाचे एक अविस्मरणीय असचं आहे.

विजयी उमेदवार विजय साठे यांच्या आजी सरुबाई शंकर साठे या ११३ वर्षाच्या होत्या. मतदानाच्या दिवशी आपल्या नातवाला मतदान रुपी आशीर्वाद देऊन रात्री शेवटचा श्वास घेतला. अखेर आजीचे हे मतच त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले.

त्यामुळे निकालाच्या दिवशी विजय मुगुट साठे यांच्या एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू होते. सरुबाई शंकर साठे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्या प्रचंड थकल्या होत्या. पंधरा दिवसांत कधी शेवटचा श्वास घेतील याची शाश्वती नव्हती. परंतु निवडणुकीत मतदान केल्यावर त्याच दिवशी रात्री दहा वाजता सरुबाई यांचे निधन झाले.

जेव्हा माजी राष्ट्रपतींच्या भाचेसूनेचा ग्रामपंचायतीत ‘ईश्वर’ पराभव करतो

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. बोदवड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निकालात प्रस्थापितांना हादरे बसले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसूनेला पराभवाचा धक्का बसला. विशेष म्हणजे ईश्वर चिठ्ठीने निकाल काढल्यानंतर त्या पराभूत झाल्या. तर बोदवड तालुक्यातील मनुर बुद्रुक येथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून पुतण्याचाही पराभव झाला.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : प्रतिभाताई पाटलांच्या भाचेसूनेचा ईश्वर चिठ्ठीने पराभव

…ग्रामपंचायतीचा कौल मान्य करा नाही तर…, संजय राऊतांचा अग्रलेखातून भाजपला इशारा

जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी

(Mulshi Taluka gram panchyat election results 2021)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.