Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Big breaking
Image Credit source: tv9
मुंबई : पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचल्याने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. याचा मोठा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. 24 ऑक्टोबनंतर कोकणातून पावसाची एक्झिट होणार आहे. मात्र त्यापूर्वी पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगाच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस पासवाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Follow Us