Break the chain : लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

| Updated on: May 31, 2021 | 1:18 PM

Break the chain Lockdown guidelines : ३० मे २०२१ रोजी जाहीर ब्रेक दि चेन आदेशासंबंधी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

Break the chain : लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

 मुंबई : कोरोनाची सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील वाढते आकडे पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही नियम शिथील केले असले, तरी जिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे मात्र काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी 30 मे रोजी राज्याला संबोधित केलं.  ब्रेक दि चेनचे (Break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.

प्रश्न १: कोविड निर्बंधांसाठी प्रशासकीय घटक (महानगरपालिका किंवा जिल्ह्याचा इतर भाग) क, ड किंवा ई यापैकी कोणत्या श्रेणीत असावे हे कोण ठरवते?

उत्तर:- हे निर्णय जिल्हा व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) घेते आणि तात्काळ त्याची घोषणा करते. यानंतर वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांसाठी तिथल्या आवश्यकतेनुसार सदर मापदंड ठरवले जातील.

प्रश्न २- जर एखाद्या महानगरपालिका पालिका क्षेत्र किंवा (जिल्ह्यातील इतर भाग) येथील पॉझिटिव्हिटी दर किंवा भरलेले ऑक्सिजन बेडची संख्या याच्यात बदल होत असेल तर?

उत्तर:- सदर मार्गदर्शक तत्वे २९ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशांसाठी लागू असेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे भरलेले ऑक्सिडेशन बेड आणि पॉझिटिव्हिटी दर याचा साप्ताहिक आढावा घेतील, बहुदा शुक्रवारी, जेणेकरून येणाऱ्या सोमवार पासून आवश्यक बदल करून त्यांची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल.

पॉझिटिव्हिटी दर बदलून जिथे निर्बंधांना शिथील करावे लागणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सदर तरतूद ३० मे २०२१ रोजी दिलेल्या ‘ब्रेक द चेन आदेशाच्या अधीन राहून लागू करू शकते परंतु त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) कडून परवानगी घ्यावी लागेल.

जर पॉझिटिव्हिटी दर आणि भरलेले ऑक्सीजन बेडची टक्केवारी अशाप्रकारे बदलत असेल की, तिथे निर्बंध जास्त कडक करण्याची आवश्यकता भासत असेल, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एसडीएमएला या संबंधी माहिती देऊन निर्बंध आणखी कठोर करू शकते.

प्रश्न ३:- ऑक्सीजन बेडची टक्केवारी काढताना व्हेंटिलेटर बेड/आय सी यु बेड यांची संख्या ही त्यात अंतर्भूत असेल का?

उत्तर:- हॉस्पिटल किंवा वैद्यकीय सुविधा असलेल्या ठिकाणी कोणतेही बेड की ज्याच्याशी ऑक्सिजन पुरवठा संलग्न असेल किंवा त्याची तरतूद असेल, त्यांना ऑक्सिजन बेड म्हणूनच गणले जाईल.

प्रश्न ४:- ३० मे २०२१रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात समाविष्ट नसलेल्या सलून/ स्पा / जिम व इतर गैर -आवश्यक आस्थापनांबाबत काय?

उत्तर:- १२ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या ‘ब्रेक दि चेन ’ आदेश अशा ठिकाणी अंमलात असेल.

प्रश्न ५:- जिल्ह्याबाहेरील किंवा राज्यबाहेरील लोक जर एखाद्या जिल्ह्यातील ऑक्सीजन बेड वरती असतील तर त्या ऑक्सिजन बेडला ‘भरलेला’ म्हणून गृहीत धरावे का?

उत्तर:- सर्व ऑक्सिजन बेड मग ते कोणत्याही व्यक्ती त्यावर असो, त्यांना ‘भरलेले ऑक्सीजन बेड म्हणूनच गणले जाईल.

प्रश्न ६:- जीआरई, जीएमएटी, टीओईएफएल, आयईएलटीएस परीक्षांबद्दल काय?

उत्तर:- कोणत्याही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ये-जा करताना त्यांच्यासोबत एका सज्ञान व्यक्तीस परवानगी असेल. हॉल तिकीट किंवा इतर कोणतेही दस्तावेज यांना प्रवासासाठी वैद्य गृहीत धरण्यात येईल.

प्रश्न ७:- नागरिकांच्या जिल्हाअंतर्गत प्रवासाबद्दल काय?

उत्तर:- जर सदर प्रवास एखाद्या अशा प्रशासकीय घटकासाठी किंवा घटकातून होत असेल की, जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दर आहे आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, तेथे प्रवास करण्यासाठी परवानगी मिळणार नाही. फक्त कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक आणीबाणीच्या प्रसंगी सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

उपरोक्त प्रशासकीय घटकांत व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांसाठी 12 मे 20 21 ला जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे निर्बंध /परवानगी च्या अटी-शर्ती लागू असतील. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

ब्रेक द चेनअंतर्गत नवे नियम पुढीलप्रमाणे

> सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवता येतील.

> सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.

> आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

> दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असतील. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरू राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

>कृषीविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरू राहू शकतील. येणारा पावसाळा आणि पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरू ठेवण्यास परवानगी देऊ शकते.

>जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

>तसेच 12 मेच्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

> कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

> यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

> मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

> स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

> दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.ट>> कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

> स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

संबंधित बातम्या 

Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार