Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE: आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान, उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद

Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE News Updates in Marathi: आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. 182 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर(मराठवाडा), पुणे या पाच मतदारसंघासाठी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होईल.

Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE: आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान, उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद
आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान
| Updated on: Oct 23, 2026 | 8:28 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Oct 2026 08:25 AM (IST)

    उमेदवार सचिन सानप यांचे आईकडून औक्षण

    शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन सानप यांनी आईचा आशीर्वाद घेऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. उमेदवार सचिन सानप यांचे आईकडून औक्षण करण्यात आले. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. सर्व शिक्षकांच्या पाठिंबावर व शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहे. संस्था चालक विरोधात सामान्य शिक्षक अशी ही लढाई आहे. काहींच्या माध्यमातून पैसे वाटप केले जात आहेत पण शिक्षक याला बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे. संस्था चालकाला पाठींबा काही पक्षाने दिली आहे.. शिक्षक आपलं मतदान शिक्षकाला करतील, असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला.

     

  • 23 Oct 2026 08:20 AM (IST)

    पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान

    पुण्यात सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख तर महायुतीकडून स्मिता जाधव निवडणूक रिंगणात आहे. शिक्षक मतदार संघासाठी महायुतीचे कौस्तुभ गावडे, शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप, महाविकास आघाडीचे बाळासाहेब आजगावकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे दत्ता सावंत उमेदवार रिंगणात आहेत.


  • 23 Oct 2026 08:15 AM (IST)

    सकाळीच मतदानासाठी बाहेर पडा- हर्षदा देशमुख जाधव

    मला विजयाची अपेक्षा आहे. निवडणुकीचे केंद्रबिंदू पदवीधर आहोत. या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला संधी मिळाली आहे. पदवीधर मतदार सुजान आहेत. दैनंदिन महागाई वाढली आहे मतदार नक्की योग्य निर्णय घेईल. पवार साहेबांचा आशीर्वाद मी सुरवातीलाच घेतला होता. कोल्हापूर मध्ये जसा गुलाल उधळला तोच २७ तारखेला पुन्हा उधळला आहे. सर्वांनी शक्यतो सकाळीच मतदान करावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी केले आहे.

  • 23 Oct 2026 08:10 AM (IST)

    पुण्यात मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

    पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी १६० मतदार केंद्रे तर शिक्षक मतदारसंघासाठी ७२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली. पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ८८ हजार २०२, तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ हजार ८८२ नोंदणीकृत मतदार आहेत. मतदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित होण्यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय तयारीवर भर देण्यात आला आहे.

  • 23 Oct 2026 08:05 AM (IST)

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 41 मतदान केंद्र सज्ज

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 41 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्ह्यात 21 हजार 742 पदवीधर मतदार आहेत. त्यात 13 हजार 99 पुरुष मतदार, 8 हजार 643 महिला मतदार असे एकुण 21 हजार 742 मतदार संख्या आहे. सकाळी 8 ते 4 वेळेत मतदान होईल. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी, मायक्रो ऑब्झर्व्हर अशा 250 च्यावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने यंत्रणा सज्ज झाली आहे.


  • 23 Oct 2026 08:00 AM (IST)

    विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर पाच मतदारसंघासाठी मतदान

    विधान परिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये आज शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. 182 उमेदवारांसाठी दहा लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत त्यांचा हक्क बजावतील. 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

  • 23 Oct 2026 07:55 AM (IST)

    मराठवाड्यात 3 लाख 26 हजार 701 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 3 लाख 26 हजार 701 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 2 लाख 48 हजार 971 पुरुष, 77 हजार 717 महिला आणि 13 इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 842 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून 41 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

  • 23 Oct 2026 07:50 AM (IST)

    सुधाकर कोहळे आणि कॅाग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत

    नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि कॅाग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत होणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात मतदान होईल. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात, काँग्रेस आणि भाजप मध्ये चुरशीची लढत होत आहे. भाजपचे सुधाकर कोहळे काँग्रेसचे अभिजित वंजारी सह एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत.

  • 23 Oct 2026 07:45 AM (IST)

    नागपूरमध्ये उमेदवार सुधाकर कोहळे यांचं औक्षण

    नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाला जाण्यापूर्वी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचं औक्षण करण्यात आले. विधीवत पुजा औक्षण झाले. नात दर्शिता आणि कुटुंबियांनी औक्षण केले. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत आज पार पडणार मतदान होईल. या निवडणुकीसाठी नागपूरमध्ये मोठी चुरस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 23 Oct 2026 07:37 AM (IST)

    बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहून मतदान

    या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने चुरस वाढलेली आहे. अमरावती विभागात काँग्रेसच्या अदिती पोहरे, महायुतीचे किरण सरनाईक शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने ही रिंगणात आहेत तर महायुतीच्या उमेदवारास विरोधात भारतीय जनता पक्षाचे संगीता शिंदे, शेखर भोयर, सुमित पवार हे तीन बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी देखील रिंगणात आहेत. ही निवडणूक पसंती क्रमांकाची असून बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहून मतदान करावं लागणार आहे…

  • 23 Oct 2026 07:32 AM (IST)

    औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

    सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत आज पार पडणार मतदान होईल. नांदेड जिल्ह्यात 120 मतदान केंद्र आहेत. 36 हजार 687 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी 120 केंद्राध्यक्ष, 630 मतदान अधिकारी आणि 55 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पात्र पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्याच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहेत.

  • 23 Oct 2026 07:25 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 25 मतदान केंद्र

    अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 25 मतदान केंद्र असणार आहे. अमरावती शहरात 11 तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी 14 असे एकूण 25 मतदार केंद्रावर शिक्षक मतदार करणार आहे. या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने चुरस वाढलेली आहे.अमरावती शहरात 11 तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी 14 असे एकूण 25 मतदार केंद्रावर शिक्षक मतदार करणार आहे.

  • 23 Oct 2026 07:17 AM (IST)

    अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक आज सकाळी आठ वाजता पासून मतदानाला होणार सुरुवात

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकी करिता अमरावती ,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील 35 हजार 810 शिक्षक मतदार या मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण 26 उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३७७ अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. सर्व पाचही जिल्ह्यात 81 मतदान केंद्र आहेत .. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे.

  • 23 Oct 2026 07:12 AM (IST)

    अठरा वर्षांचा हिशोब द्या, मगच मतदान मागायला या- उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील

    पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. अठरा वर्षांचा हिशोब द्या, मगच मतदान मागायला या,” अशी भूमिका काही मतदारांनी मांडल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मतदारसंघ मोठा असून पदवीधरांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉक्टरी पेशा आणि शैक्षणिक संस्थांशी कुटुंबाचा संबंध असल्याने जनसंपर्कासाठी फायदा झाला. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे उमेदवार डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

  • 23 Oct 2026 07:09 AM (IST)

    पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान

    पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात एकूण 72 मतदान केंद्र उभारण्यात आलेत. शिक्षक निवडणुकीसाठी एकूण 61 हजार 940 मतदार आहेत. तर पदवीधरसाठी 3 लाख 88 हजार 19 मतदार आहेत. सोलापुरातील नुमवी शाळेमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आलेय.

     

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. आज शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. 182 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. दहा लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत त्यांचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघांत सर्वाधिक 3 लाख 88 हजार मतदार आहेत. सर्वात कमी 35 हजार मतदार हे अमरावती शिक्षक मतदारसंघात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघात 2,419 मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींप्रकरणातील ऑडिओ बॉम्बने एकच खळबळ उडाली आहे. काल त्यांनी हा बॉम्ब टाकताच राजकारण ढवळून निघाले. महायुतीतील बेबनाव त्यातून समोर आलाच. पण राजकीय इभ्रतही टांगणीला लागली. या ऑडियो क्लिपची फॉरेन्सिक सत्यता तपासण्याची आणि आरोपांच्या चौकशीची मागणी आता शिंदे सेनेने केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच हा प्रकार करण्यात येत असल्याचा शिंदे सेनेचा आरोप आहे. काल शिंदे सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयीचा तपास आणि चौकशीची मागणी केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी या ऑडियो क्लिपमधील व्यक्ती या भाजपशीसंबंधित असल्याचे वक्तव्य केले होते. आशिष शेलार यांनी या व्यक्तींचा भाजपशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. एकूणच या ऑडिओ क्लिपने राज्यातील राजकारण गढूळ झालेच नाही तर ढवळून निघाले आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला दुष्काळाचे भीषण चटके सहन करावे लागत आहे. चारा आणि पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामीण भागात आली आहे. तर रोजगारासाठी अनेक गावं ओस पडायला सुरूवात झाली आहे. काही गावात आता केवळ वृद्ध व्यक्ती राहत आहेत. कर्ती माणसं कुटुंब कबिल्यासह रोजगारासाठी स्थलांतर करत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us