
मालेगावात सगळेच फेल, चर्चेत नसलेल्या पक्षाची जोरदार मुसंडी बघायला मिळत आहे.
मालेगाव महापालिका विजयी उमेदवार…
भाजप – 02
शिवसेना – 18
इस्लाम – 19
सपा – 05
काँग्रेस – 01
एमआयएम – 04
इतर – 01
स्वतःच्या घरात भाजपचे ४ तिकीट घेणाऱ्या बडगुजर यांना मोठा धक्का. प्रभाग २५ चा निकाल समोर, ४ पैकी २ जागेवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी तर इतर २ जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी
सोलापूरमध्ये 54 जागांवर भाजपा आघाडीवर असून मोठे यश भाजपाला मिळाल्याचे बघायला मिळत आहे. प्रणिती शिंदे कॉंग्रेससाठी मैदानात उतरल्या आहेत.
अजित पवार आणि शरद पवार गट यांना पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोठे यश मिळताना दिसत आहेत. काकांचा हात पकडून अजित पवार भाजपाला धक्का देतांना सुरूवातीच्या कलानुसार दिसत आहे.
मुंबई महापालिकेचा निकाल हाती येत असून भाजपा आणि शिवसेना 133 जागांवर आघाडीवर आहे. एकहाती दोन्ही पक्षांची सत्ता येण्याची शक्यता आहे.
मुंबईत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून समाधान सरवणकर आणि वायकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा एक मोठा धक्का शिंदेंना म्हणावा लागेल.
मुंबईमध्ये भाजपाची विजयी वाटचाल सुरू असून भाजपाचा पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर महापाैर बसू शकतो. मुंबई महापालिकेत भाजपा 80 जागांवर आघाडीवर आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये जाणून धक्कादायक विधान विलासराव देशमुख यांच्याबद्दल केले होते. त्यानंतर आता लातूर महापालिकेचे निकाल येत असून भाजपाला मोठा धक्का बसला असून कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसतंय.
अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का ; साई नगर प्रभागात भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय पराभूत. रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे विजयी..आमदार रवी राणांनी केली होती साईनगर मधील निवडणूक प्रतिष्ठेची
महापालिका निवडणुकीचे कल हाती येत असून जवळपास महापालिकांवर भाजपाची दमदार कामगिरी बघायला मिळत आहे. लाट भाजपाची आल्याचे दिसतंय.
अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा पराभव, यासोबतच भाजपाचीही निराशजनक कामगिरी.
पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय झाला असून त्यांच्या आईचा मात्र पराभव झाला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. आता निकाल हाती येत आहेत.
भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने मुंबईत युती म्हणून निवडणुका लढल्या. आता सत्तेसाठी अगदी जवळ असल्याचे बघायला मिळत आहे. मोठी लढत मुंबई महापालिकेत बघायला मिळत आहे.
सोलापूरमध्ये भाजपाची जोरदार कामगिरी बघायला मिळत आहे. तब्बल 45 जागांवर भाजपाची सोलापूरमध्ये आघाडी बघायला मिळत आहे.
अमरावती मध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय दुसऱ्या फेरीत तबल 1530 मतानी पिछाडीवर. रवी राणांचे निकटवर्तीय युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे 1530 मतांनी आघाडीवर.
मुंबई महापालिकेचे निकाल हाती येत असून मोठी बाजी भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट मारताना दिसत आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष सुरूवातीच्या आकड्यांवरून ठरत असून शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला.
ठाण्यात भाजपा 14 शिवसेना शिंदे गट 10 वर आघाडीवर आहे. शिवसेना आणि शिंदेची येथे युती आहे. मात्र, ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे.
मुंबईमध्ये भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या शिवसेना ठाकरे गटात होत्या.
पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला असून भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून अजित पवारांच्या गटाचे उमेदवार पिछाडीवर असून हा थेट धक्काच म्हणावा लागेल.
मुंबईचा पहिला निकाल हाती आला असून आशा काळे कॉंग्रेसच्या विजयी झाल्या आहेत. हा मुंबई महापालिकेचा पहिला निकाल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र येऊन निवडणुका लढताना दिसले. भाजपाच्या विरोधात थेट निवडणुका लढताना अजित पवारांचा पक्ष दिसला. मात्र, म्हणावी तशी कामगिरी अजिबात करण्यात अजित पवार यांच्या पक्षाला जमली नाही.
जळगावात शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले असून पहिला विजय मिळाला आहे.
पुणे महापालिकेचे निकाल हाती येत असून आबा बागुल पिछाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. हा मोठा झटकाच म्हणावा लागेल.
महापालिकांचे निकाल हाती येत असून मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या मोठी टक्कर बघायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेचे सुरूवातीचे कल हाती येत असून भाजपा शिंवसेना ठाकरे गट तब्बल 73 जागांवर आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहेत.
पुण्यातून वसंत मोरे यांच्या पूत्र पिछाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत मोरे यांचा मुलगा ही निवडणूक लढत आहे.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हाती येत असून नांदेड महापालिकेत भाजपा आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.
राज्यातील 29 महापालिकांचे कल हाती येत असून मुंबई महापालिकेत भाजपा धमाल करताना दिसत आहे. 50 जागांवर आघाडीवर आहे. यासोबत शिवसेना शिंदे गटही धमाका करताना दिसत आहे.
प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने उमेदवार प्रतिनिधींची गर्दी. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम. निवडणूक निरिक्षक मतमोजणी केंद्रावर दाखल, उमेदवारांनी मांडली कैफियत.
पनवेलमध्ये भाजपने आपली विजयाची परंपरा कायम राखल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. सिडको क्षेत्रातील नागरी प्रश्नांचा प्रभाव या निकालांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 21, 22 ,23 ,24 ,29 आणि 30 प्रभाकर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतदानामध्ये डोंबिवलीत भाजप आघाडीवर. सुरुवातीला टपाल मत मोजली सुरू आहे.
लातूरमध्ये भाजपाची सत्ता होती. मात्र, आता लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा झटका बसताना दिसत असून भाजपा लातूर महापालिकेत पिछाडीवर आहे.
उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश करताना उडाला गोंधळ. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उडाला गोंधळ..पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला काढले बाहेर..प्रशासनाचा कारभार नियोजन शून्य असल्याचा भाजपच्या उमेदवाराचा आरोप
महापालिकेचे कल हाती येत असून मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट 50 जागांवर आघाडीवर आहे.
पुणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुण्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून 33 जागांवर आघाडीवर आहे.
सुरूवातीच्या कलांनुसार, ठाकरे गटाला मोठा झटका बसताना दिसत आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट आघाडीवर दिसत आहे.
अपेक्षित निकाल लागतील. यंत्रणाच्या खूप वापर झाला. पैशाच्या खूप वापर झाला. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना रान मोकळं करून दिल होतं. अशाही परिस्थितीत काँग्रेसला पोषक निकाल असेल. चंद्रपूर , अमरावती, कोल्हापूर लातूर ,जालना असे अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल. चंद्रपुरात आम्ही शंभर टक्के सत्ता स्थापन करू आणि आमचे बहुमत असेल. आणि बाकीच्या अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल किंवा काँग्रेस दुसऱ्याला घेऊन सत्तेत राहील सगळ्याला धक्का देणारे निकाल असतील.
मुंबई महापालिकांचे कल पुढे येताना दिसत असून भाजपाची आघाडी बघायला मिळत आहे. भाजवा आणि शिवसेना शिंदे यांची युती धमाल करताना दिसत आहे.
मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपाने घेतली आहे आघाडी. भाजपा आणि शिंदे 22, ठाकरे बंधू 10 याप्रमाणे..
काही सेकंदात पहिला कल हाती येईल. 29 महापालिकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतदान मोजणी केली जात आहे. काही वेळात आकडे हाती येतील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे. संभाजीनगरमध्ये मोठा राडा बघायला मिळत आहे. हेच नाही तर थेट ठिय्या आंदोलन केले जात आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका असून 9.55 मिनिटाला पोस्टल मतमोजणीला सुरूवात होईल. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल अवघ्या 15 मिनिटांनी सुरू होतील . काल मतदान झाले आणि आज मतमोजणीला सुरूवात होईल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वी मोठा राडा होताना दिसत आहेत. उमेदवाऱ्यांच्या प्रतिनिधींविरोधात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. निकाल येण्यास काही मिनिटे शिल्लक असताना चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिकेवर दावा करत म्हटले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा मुंबई महापालिकेत 130 च्या खाली येणार नाही, चंद्रकांत पाटील यांनी थेट महापालिकेचा निकालच सांगून टाकला आहे.
महापालिका निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही मिनिटे राहिली असून निकालाबद्दल बोलताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबईत आम्ही 130 च्या खाली येणार नाहीत.
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता काही वेळातच महापालिकेचे निकाल होती येतील.
राज्यातील 29 महापालिकांचा आज महानिकाल असून काही वेळात एका मागून एक महापालिकांचे निकाल हाती येताना दिसतील.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांनी भाजपाचा मोर्चा सांभाळला. यावेळी महेश लांडगे आणि अजित पवार एकमेकांवर टीका करतानाही दिसले. आता एकमतच्या एक्झिटपोलनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता येणार आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असून शकतो.
नाशिक महापालिकेवर भाजपाकडून दावा केला जात आहे. यासोबतच मनसे पुन्हा नाशिकमध्ये गड राखणार का? हे येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल.
EVM मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीच्या मागे ठाकरेंच्या सेनेकडून बाईकवरून पाठलाग. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क.. EVM मशीन स्ट्रॉंगरूम पर्यत घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवडीतील गाडयांचा केला पाठलाग
राज्यातील सर्वाधिक चर्चेत ठरलेली निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची आहे. प्रत्येकाकडून या महापालिकेवरील सत्तेवर दावा केला जात आहे. एकमतच्या एक्झिटपोलनुसार, मुंबई महापालिकेवर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल. मात्र, ठाकरेंपेक्षा कमी उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून येतील. यावरून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे की, शिंदेंचा गेम नक्की केला कोणी?
राज्यातील 29 महापालिकांचा निवडणुका झाल्या असून आज मतमोजणी आहे. नक्की कोणाच्या हातात महापालिकेची सत्ता येते याच्यावर राज्याच्या नजरा आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली. मात्र, एक्झिटपोलनुसार, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात येत नाही.
आज राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 10 वाजता निकालाला सुरूवात होईल. तब्बल 15 हजाराहून अधिक उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे.
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर एक एक करून निकाल हाती येतील. राज्यातील 29 महापालिकांची मतदान मोजणी सुरू होईल.
एक्झिटपोलनुसार, मुंबईची सत्ता ठाकरेंचा हातून जाणार असल्याचे दिसत आहे. देवा भाऊ मुंबई महापालिकेवर आपला झेंडा लावतील, असे चित्र आहे.
एक्झिटपोलनुसार मोठा धक्का ठाकरे बंधूना बसताना दिसत आहे. 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेतून जाताना दिसत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाविरोधात अजित पवार गट लढताना दिसत आहे. यासोबतच भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप करताना अजित पवार दिसले.
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल आज लागणार असून 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचा नजरा आहेत.
सोलापूर महापालिकेसाठी आज मतदान पार पडले आहे. याचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख यांच्या मुलाच्या विजयाचे बॅनर लागले आहे. ‘आम्ही भावी नाही पर्मनंट’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
मतदार यादीत नावे असूनही आणि वेळेत मतदान केंद्रावर प्रवेश करूनही तसेच अडीच तास रांगेत उभे राहूनही दोन महिलांना मतदानापासून वंचित रहावे लागले. 18 व्या क्रमांकाचे बूथ चे टोकन दिले , मात्र मतदान 15 क्रमांकाचे बूथमध्ये होतं, तिकडे गेल्यावर मतदान प्रक्रिया संपली होती.जळगाव शहरातील प्रभाग 1 मधील गेंदालाल मिल परिसरातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
प्रभाग रचना करताना आम्ही आधीच आक्षेप नोंदवले होते. मात्र प्रत्यक्षात पत्नीचे मतदान एका प्रभागात, तर पतीचे दुसऱ्या प्रभागात झाले. एकाच कुटुंबातील चार सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मतदानासाठी पाठवण्यात आले, हे गंभीर आहे. यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणूक आयोगाने असे का केले, याचा तपास झाला पाहिजे. याबाबत आम्ही अधिकृत तक्रार करणार आहोत असे किशोर शितोळे यांनी म्हटले आहे.
ठाण्यात प्रभाग क्रमांक 13 मध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद झाला आहे. उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेल्याने अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी त्यांना जाब विचारला आहे. पोलिसांना तक्रार करताच पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आले आहेत.
एक्झिटपोलनुसार, मनसेच्या पदरी निराशाच बघायला मिळत आहे. येणाऱ्या आकडेवारीनुसार, मनसेचा फार काही कामगिरी करताना आली नाहीये. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही फार काही धमाका करताना आली नाही.
एक्सिस माय इंडिया पोलनुसार, मुंबई महापालिकेत
भाजप-सेना – 131-151
ठाकरे-मनसे-पवार -58-68
काँग्रेस-वंचित -12-16
इतर – 6-12
भाजपला 42 टक्क्याहून अधिक वोट
ठाकरेंच्या आघाडीला 32 टक्के मते मिळणार
इतरांना 13 टक्के वोट मिळणार
पिंपरी-चिंचवड
भाजप – 64
शिवसेना- 09
राष्ट्रवादी – 51
शरद पवार – 02
काँग्रेस -01
मनसे – 01
एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येईल. राज्यातील 29 महापालिकेसाठी आज मतदान झाले..
एक्झिटपोल पुढे येत असून जनमत एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, मुंबई महापालिकेत पवार आणि ठाकरे बंधुंच्या मिळून जागा 58 ते 65 च्या मध्ये येण्याची शक्यता पोलनुसार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईत भाजपाची थेट सत्ता. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिली आहे.
शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मिळून मुंबईमध्ये 138 जागा येण्याचा अंदाज एकमत एक्झिटपोलनुसार, येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेवर थेट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल.
जनमतच्या एक्झिटपोलनुसार, भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने असून ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे. थेट भाजपा शिवसेनेच्या हाती सत्ता पोलनुसार दाखवण्यात आली आहे.
साडेपाच पर्यंत मतदार गेटमध्ये आल्यानंतरही केंद्रप्रमुखाने मतदानास मज्जाव केल्याचा आरोप. भाजपाचे उमेदवार प्रदीप राठोड यांनी मतदान अधिकाऱ्याला विचारला जाब. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदार केंद्रावर रांगा.
भाजप उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. भाजपानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील फोडले फटाके. आम्ही समोरच्या दिशेने येत असताना भाजपाचे काही कार्यकर्ते फटाके फोडत होते. त्यामध्ये आमचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आले मात्र किरकोळ वाद होता. भाजप नेत्यांना सत्तेचा गर्व आला आहे त्यामुळे ते असे वागत आहेत
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान मतदानानंतर बोटावरची शाई मिटली जात असल्याचा आरोप केला जात आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, सॅनिटायझरने बोटावरील शाई मिटली जाते.
मतदान केंद्राच्या बाहेर आंदोलनकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील महानगरपालिकेची अनाजी वस्ती शाळा मांजरी येथे बोगस मतदान झाल्याने संतप्त मतदारांचे मतदान केंद्राबाहेर आंदोलन..
मतदान केंद्रावरील फोटो शेअर करणे मतदाराला चांगलेच महागात पडले असून थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारो मतदार दुपारून मतदान करण्यासाठी पडला बाहेर… अवधान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मतदारांनी फुल.. सकाळी होता मतदारांमध्ये निरुत्साह..दुपारनंतर मात्र हजारो मतदारांची मतदान करण्या साठी मोठी गर्दी..
जळगावमध्ये प्रभाग 5 मधील अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप. वसंत सोनवणे असे मारहाणीत जखमी झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्याचे नाव आहे. गोंधळ सुरू असताना काय झाले हे पाहण्यासाठी गेलो असता अपक्ष उमेदवार पीयूष यांच्यासह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप..वसंत सोनवणे हे जखमी झाले आहे दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जुळे सोलापूर परिसरातील 1500 मतदारांनी बहिष्कार घातला. प्रभाग क्र. 26 मधील मतदारांनी हा बहिष्कार घातला आहे. रुबी नगर ते अमोल नगरपर्यत रस्ता केला जात नसल्याने मतदार आक्रमक. जोपर्यंत रस्ता करणार नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याचा ईशारा
हातावरील शाई जाण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट, मनसे यांच्यात जुंपली असून गंभीर आरोप केली जात आहेत. ठाकरेंच्या आरोपाला भाजपाने थेट उत्तर दिले.
आशिष शेलार यांनी म्हटले की, मुंबईत 50 पेक्षा जास्त ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे डिपोर्झिट जाणार. निवडणुकीच्या निकालापूर्वीच त्यांनी हे विधान केले.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार यांनी म्हटले की, त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे.
मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का? हा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
दिनेश वाघमारे यांनी म्हटले की, मी मान्य करतो की, 2 टक्के EVM मध्ये बिघाड झाला आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 10 वर्षात नवीन मशीन खरेदी केल्या नसून या मशीन जुन्या झाल्या आहेत.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले की, खोटे व्हिडीओ किंवा एडीट करून व्हायरल केली जात असतील तर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. तसे निर्देशही देण्यात आली आहेत.
नुकताच निवडणूक आयोगाने मोठा खुलासा करत निवडणूक आयोगाने सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच आपण वापरतो आणि ती शाई योग्यच आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना थेट उत्तर दिले असून त्यांनी म्हटले की, सत्ताधाऱ्यांना कोणतीही मदत केली जात नाही. चुकीच्या गोष्टी सेट केल्या जात आहेत.
नुकताच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केली आहेत. सत्ताधारी पक्षाचे काम निवडणूक आयुक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. मतदानानंतर बोटावरील शाई निघून जात असल्ाचा आरोप केला जात आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून रश्मी ठाकरे यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ दाखवला असून मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयुक्तांवर कारवाई करावीच लागेल. त्यांचा स्टाफ रोज काय करतो. सरकारी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवावे लागेल. इतकी वर्ष पगार खाता. केलं काय. मी पूर्ण आयोगावर कारवाईची मागणी करतोय. त्यात महापालिका आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची माणसं असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही लोकशाही मानत आहात.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक हारले आहेत, त्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत. निवडणूक पूर्ण होण्यापूर्वीच मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले…
उद्धव ठाकरे यांनी थेट म्हटले की, राज्याचे निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा. ते फुकटचा पगार घेत असल्याचा त्यांनी आरोप केला.
निवडणूक जिंकण्यासाठी आटापीटा केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला असून यादरम्यान त्यांनी बोटावरीला शाई पुसली जात असल्याचा आरोप केला.
शाई पुसून मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शाई पुसली जात असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका करत चंद्रकांत खैरे यांनी म्हटले की, अंबादास दानवेला अक्कल नाही…
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान करण्याचे आवाहन देखील लोकांना केले.
उद्धव ठाकरे यांचे राजकारण काही दिवसांचे राहिले आहे त्यामुळे ते तशी वक्तव्य करत आहेत. उद्धव ठाकरेंना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते असे वक्तव्य करत आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांना माझे आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या उमेदवारांची किमान नावे सांगावीत. खासदार प्रणिती शिंदे या राहुल गांधींना खुश करण्यासाठी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात
कल्याण पूर्व नेतेवली परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानादरम्यान अडथळा. महानगरपालिकेच्या प्रबोधन बाळासाहेब ठाकरे शाळेतील ईव्हीएम मशीन अचानक बंद. मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये काही काळ संभ्रम व गोंधळ. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्ती व मतदान पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया
Maharashtra Mahanagar Palika Election Results 2026 LIVE Counting and Updates: राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एक्झिटपोलही पुढे आले. एक्झिटपोलच्या आकड्यांनी अनेकांची थेट झोप उडाली. अनेक प्रस्थापितांना धक्का बसताना दिसत आहे. काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. राज्यात सत्तेत असलेले पक्ष काही महापालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होती. शेवटी आज राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. मोठ्या नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची निवडणूक बनलीये. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड, नांदेड, सांगली, सातारा या महापालिकांच्या निवडणुकीकडे (Maharashtra Election) राज्याच्या नजरा आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. साधारणपणे सायंकाळपर्यंत राज्यातील 29 महापालिकांचे निकाल स्पष्ट होतील. प्रशासनाकडून या निवडणुकीचे जय्यत तयारी करण्यात आली. 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्याला tv9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगवर बघायला मिळेल. पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, मुंबई, जालना, परभणी, बीड, लातूर, अहिल्यानगर, कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागणार आहे.