
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाही झाले असून बहुतांश जागी भाजपाच्या विजयाचे कमळ फुलले आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व 227 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तब्बल 89 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तरएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत अवघ्या तीन जागा जिंकल्या. शरद पवार गटाला फक्त एक जागा मिळाली. समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे 65 उमदेवार जिंकून आले आहेत. काँग्रेसने 24 जागा जिंकल्या आहेत. बीएमसीमध्ये महापौर निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा आकडा 114 हाँ असून भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ जोडल्यास, एकूण 118 (89 + 29) होते, जे बहुमताच्या आकड्यांपेक्षा चार जागा जास्त आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत महापौर हा महायुतीचाच होणरा हे स्पष्ट आहे.
राज्यात AIMIM ची कामगिरी
Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..
Maharashtra Municipal Election Results 2026 : शर्मिला ठाकरे यांचा पराभवानंतर मोठा खुलासा...
Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे
Mumbai Election Result 2026 : मुंबईत फक्त 6 नगरसेवक आले, तरी शर्मिला ठाकरे का म्हणाल्या मला अभिमान आहे?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
राज्यात भाजपचाच बोलबाला असला तरी आणखी एका पक्षानेही जोरदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे, तो म्हणजे इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM). या पक्षाने राज्यातील महापालिकां निवडणुकीत सरस कामगिरी करत एकूण 114 जागांवर विजय मिळवला आहे. AIMIM पक्षाचे नेते शारिक नक्षबंदी यांनी ही माहिती दिली. गेल्या निवडणुकांमधील अत्यंत कमी मतांनी झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुकांमध्ये विजय मिळवायचाच असा चंग बांधला होता.
या निकालावर शुक्रवारी, AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांचीही प्रतिक्रिया आली आगे. घरोघरी जाऊन केलेल्या प्रचारामुळे आणि मागील निवडणुकांमध्ये कमी फरकाने झालेल्या पराभवामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली. AIMIM छत्रपची संभाजीनगरमध्ये 33 जागा, मालेगांवमध्ये 21, अमरावतीमध्ये 15, नांदेडमध्ये 13, धुळ्यात 10, सोलापूरमध्ये 8, मुंबईत 6 , ठाण्यात 5 , जळगावमध्ये 2 आणि चंद्रपूरमध्ये 1 जागा जिंकली.
ओवैसींच्या प्रचाराचा फायदा
AIMIM चे नेते नक्षबंदी म्हणाले की, गेल्या महापालिका निवडणुकीत 80 जागा जिंकून पक्षाला शहरी मतदारांच्या मनःस्थितीची कल्पना आली होती, ज्यामुळे त्यांना विजय मिळविण्यात मदत झाली. सुरुवातीला, MIM छत्रपा ती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांकडून आव्हानांचा सामना करावा लागला. नंतर, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या रॅलींच्या उपस्थितीमुळे, आम्ही येथे 33 जागा जिंकल्या. यावेळी आम्ही मुंबईपासून ते चंद्रपूरपर्यंत सर्व ठिकाणी जागा जिंकल्या.
ठाकरे बंधूंची स्थिती काय ?
बीएमसी निवडणुकीत युती करूनही ठाकरे बंधूंना फार फयाद झालेला नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जोरदार झटका लागला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) 65 जागा जिंकल्या, तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवघ्या 6 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ने मुंबईत एकूण 8 जागा जिंकल्या, म्हणजे राज ठाकरेंच्या गटापेक्षा जास्तच जागा त्यांना मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने फक्त 1 जागा जिंकली.
बीएमसीत कोणी किती जागा जिंकल्या ?
भाजपा – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना शिंदे गट – 29
AIMIM – 8
मनसे – 6
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 3
समाजवादी पक्ष – 2
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) – 1
एकूण – 227 जागा