
मुंबई : आज शुक्रवार 14 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मराठी हृदयसम्राट हिंदू जननायक राज साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा असा बॅनर दादर टी टी परिसरात लावण्यात आला आहे. त्या बॅनर शेजारी आदित्य ठाकरे यांना काल वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे शिवसैनिकांनी बॅनर लावण्यात आला होता. त्यामुळे दादरमध्ये पुन्हा आज मनसे आणि शिवसेना बॅनर आमने सामने पाहायला मिळाले.
नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुस्लिम धर्मगुरू आणि शहर काजी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्या विरोधात कलम 153 (अ), 295 (अ), 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल..
नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा
कराड – ईडीच्या चौकशीतून दहशद निर्माण केली जात आहे – माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरती ईडीने पुढील कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन
कराड येथे काँग्रेसच्या नव संकल्प कार्यशाळेत ठराव
नागपूर – नागपूरच्या जीपीओ ऑफिसमध्ये पार्सलमध्ये मिळालं ज्वलनशील पदार्थ
पार्सलमधील ज्वलनशील पदार्थाचा स्फोट
शेतामधील प्राण्यांना हकळण्यासाठी वाजविण्यात येणारे बंदुकीच्या बार भरून आवाज करणारे (फटका प्रमाणे ) यंत्र
नाशिकवरून पार्सल आलं होतं ते वर्धा येथे जाणार होत
सगळं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे
अमरावती – आपले सगळे नेते विदर्भात येऊन पक्ष वाढेल कसा याचा प्रयत्न करत आहे
मला धक्काच बसला आज.मोदी आज महाराष्ट्र मध्ये आले.दादांनी त्यांचा मान सन्मान केला
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना देहू येथील कार्यक्रमाचा प्रोटोकॉल दाखवला
भाजपचे मित्र म्हणाले मोदी यांनी अजीत दादा यांना भाषण करा म्हणता, हा अपमान आहे
अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे.आपल्या पक्षाचा नेता आहे पण तीन नंबरला
देवेंद्र फडणवीसचे भाषण झाले नसते तर मी काहीच म्हटले
देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात तर मग अजित पवारांना तुम्ही भाषण करू द्यायला पाहिजे
भाजप मधील देवेंद्र फडणवीस भाषण करू शकतात..मग मविआ मधील उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे भाषण का नाही.
मोदीजी मै नाराज नही हूं हैराण हूं मै.. हा महाराष्ट्रचा अपमान आहे
देवेंद्र फडणवीस यांचा पुण्याशी काय समधं आहे.ते नागपूर मधून निवडुन येतात
मोदीजी मला जेव्हा लोकसभेत भेटतील तेव्हा त्यांना मी हा प्रश्न विचारेल
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला संजय राऊत तयारीची प्रत्यक्ष पाहाणी
हनुमान गढी येथेही केली पाहणी
राम जन्मभूमी येथेही गेले
शरयू नदी तिरीही संजय राऊत
चुकीच्या पद्धतीने ओबीसी आरक्षण डेटा गोळा केला जात असल्याचा आरोप
नाशिकमध्ये दुपारी 3 वाजता समता परिषद जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार आंदोलन
तर राज्यभरात उद्या ठिकठिकाणी होणार आंदोलन
समता परिषद प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांची माहिती
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात अजित पवार यांना भाषण करू दिलं नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात अजित पवार यांना भाषण करू दिलं नाही
याचा निषेध करण्यासाठी नागपुरात राष्ट्रवादी च आंदोलन
आंदोलन सुरू होत आहे
कार वर झाड पडल्याने कार च झालं नुकसान
वाऱ्यामुळे झाड कोसळल्याची माहिती
सिव्हिल लाईन परिसरातील घटना
कारमध्ये कोणीही नसल्याने दुर्दैवी घटना टळली
अग्निशमन दल च्या साह्याने हटविले जात आहे झाड
अमरावतीत धुवाधार पावसाची हजेरी
पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे.
अमरावतीत मुसळधार पाऊस आला असला तरी १०० मिलीमिटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याच कृषी विभागाचे आव्हाहन
पाऊस झाल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा
पश्चिम विदर्भात 32 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा
दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पूर्व मशागतीला वेग आला आहे.
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू
बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीणचे पदाधिकारी दाखल
अमरावती : पंतप्रधान यांनी फक्त अजितदादा यांचा अपमान केला नाही. तर त्यांनी महाराष्ट्रचा अपमान केला आहे. – यशोमती ठाकूर
पदोपदी पंतप्रधान अस करत असतात. त्यांना त्यामध्ये मजा येते.
पदोपदी महाराष्ट्रचा अपमान महाराष्ट्रची जनता सहन करणार नाही.
संविधान आहे, प्रोटोकॉल आहे. रीतिरिवाज आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून या गोष्टी आपण फॉलो करत आहेत
एखाद्या राज्यात जायचं तिथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान करायचा हे काही जनतेला थोडी आवडत
या सगळ्या गोष्टी ते जाणीवपूर्वक करतात…
या देशाच वातावरण अतिशय खराब केलं आहे. महागाई वाढली आहे.
राजभवनातून मुख्यमंत्री Live
स्वातंत्र्याचा महोस्तव साजरा करत असताना या दालनाचे उद्घाटन होणे हा एक चांगला योग
स्वातंत्र्य हे फक्त उपभोगण्याची वस्तून नाही
काहींच्या पोटात दुखण्याचे कारण काय? – प्रवीण दरेकर
पंतप्रधान मोदी यांनी आज जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करून महाराष्ट्राचा, वारकरी परंपरेचा गौरव केला
तर काहींच्या पोटात दु:खत आहे
वारकर्यांचा सन्मान झाला, म्हणून महाराष्ट्राच्या अपमानाचा कांगावा कशाला?
राष्ट्रवादी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.
भाषणे कुणाची व्हावीत आणि कुणाची नाहीत, यापेक्षा आमच्यासाठी वारकर्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा
तो होतोय, याचा अधिक आनंद
वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका, ही माझी विनंती आहे.
यवतमाळ : अंगावर विज कोसळून दोघांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्याच्या केळापुर तालुक्यातील पाथरीत अंगावर वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू
ही घटना दुपारच्या सुमारास घडली
अक्षय गोविंद कांबळे व अभय भास्कर मेश्राम असे मृत तरुणांची नाव
अजित पवारच नको म्हणाले : अनिल बोंडे
अजित पवार यांनी नकार दिला
मोदिंच मोठं मन पण त्यांनी नकार दिला
मोदिंनी सन्मान दिला
अजित पवार यांनीच नकार दिला
संताच्या दारामध्ये राजकारण करण्याचा दरिद्रीपणा करू नये
अपमान कोण करणार
तो काही भाजपचा कार्यक्रम नव्हता, तो संताचा कार्यक्रम होता
प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे
जेंव्हा पंतप्रधानांनी भाषण करण्यासाठी बोलवलं असताना त्यांनी ती आदराने नाकारली यात अजित पवार यांचे मोठे मन
अजित पवारांना बोलू न दिल्यानं वारकऱ्यांमध्येही नाराजी
अजित पवारांना बोलू द्यायला हवं होतं
मात्र का बोलू दिलं माहिती नाही
अजित पवार हे आपल्या राज्यातले आहेत त्यांना बोलू द्यायला हवं होतं
वारकऱ्यांनीही व्यक्त केली नाराजी
उद्घाटनानंत वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी
अजित पवार यांना भाषन न करू देण्याच्या वादावर संत तुकाराम महाराज संस्थानाने स्पष्ट केली आपली भूमिका
संत तुकाराम महाराज संस्थानने जबाबदारी ढकलली केंद्रावर
आम्ही अजित पवारांच नावं दिलं होतं. मात्र दिल्लीतून का वगळण्यात आम्हाला सांगता येणार नाही
मात्र आम्ही भाषणाच्या यादीत अजित पवारांच नावं दिलं होतं
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांची माहिती
पंतप्रधान मोदी राजभवनात दाखल
क्रांतीकारी गॅलरीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
जलभूषण आणि क्रांतीकारी गॅलरीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करू देण्यावरून राज्यात वादंग
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, तरिही त्यांना भाषणाला संधी देण्यात आली नाही हा
महाराष्ट्राचा अपमान आहे – खा. सुप्रिया सुळे
धार्मिक क्षेत्रातही भाजपचे राजकारण केले आहे. त्यामुळे भाजपने राज्याची माफी मागावी – अमोल मिटकरी
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर मोदींनी इशारा केला होता
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा
18 जुलै पासून पावसाळी अधिवेशन
12 ऑगस्ट पर्यंत चालणार पावसाळी अधिवेशन
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदानही होणार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी
आपण जगातील प्राचीन परंपरा जपून ठेवली आहे
याचे श्रेस हा साधू, संताना जातं
समजाला दिशा देण्यासाठी महान आत्मा पुढे येत राहिल्या
संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, अशा महान संताच्या समाधीला 750 पूर्ण होतात
त्यांनी कठीण जीवन जगले आहे, त्यांनी त्यांच्या काळात दुष्काळासारख्या समस्या बघितल्या
अशा काळात तुकाराम आशेच किरण बनून उतरले
सलग दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची ईडी चौकशी
चौकशीवरुन काँग्रेस नेते आक्रमक, मुंबई काँग्रेसची सलग दुसऱ्या दिवशी निदर्शनं
भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्ते इडी ऑफिस दिशेने रवाना
आझाद मैदान जवळ काँग्रेसचा मोर्चा थांबविण्यात येत आहे
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पत्रकार परिषद
सरकारच्या मिशन अग्निपथ योजनेची घोषणा
तिन्ही सैन्याचे प्रमुखही उपस्थित
भारतीय तरुणांना अग्नीवीर म्हणून आर्मफोर्समध्ये सेवेत समाविष्ट करुन घेतलं जाणार
तरुणांना लष्करात सामीलकरुन घेण्यासाठी विशेष योजना
सशस्त्र दलात तरुणांना संधी दिली जाणार
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत तरुणांना संधी निर्माण दिली जाणार
दरवर्षी 50 हजार अग्निवीरांची भरती केली जाणार
शॉर्ट टर्म सर्विससाठी केली जाणार तरुणांची नियुक्ती
चार वर्ष सेवेत समाविष्ट करुन घेतलं जाणार
नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात एकत्रित सुनावणी
आगामी विधान परिषदेच्या मतदानाकरता परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांची हायकोर्टात याचिका
एकत्रित सुनावणीकरता मलिकांच्यावतीनं केलेली मागणी मान्य
मलिक आणि देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत
शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला चंद्रकांत दादांचे उत्तर
मराठी अस्मिता आम्हालाही आहे,
देश एक आहे त्यामुळे मराठी, हिंदी भाषिक उमेदवार असं म्हणून चालणार नाही
उमेदवार कर्तुत्ववान आणि न्याय देणारा हवा
चंद्रकांत दादांचा शरद पवार यांना खोचक टोला
नाशिक : पार्टी विथ डिफ्रन्स म्हणणाऱ्या भाजपात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याचा प्रवेश ..
रेकॉर्डवर अनेक गंभीर गुन्हे असणाऱ्या व्यंकटेश मोरेला भाजपाने दिला प्रवेश
वरिष्ठ पदाधिका-यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयातच मोरे याचा प्रवेश सोहळा..
व्यंकटेश मोरे विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी ,दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे
पोलिसांनी धिंड काढलेला व्यंकटेश मोरे भाजपात ‘पावन’
राहुल गांधी यांच्या चौकशी विरोधात आंदोलन
अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ
अनेक नेत्यांची धरपकड
सलग दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 54 रुपये लिटर प्रतिदराने पेट्रोल वाटप
राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त पेट्रोल वाटप सुरू
जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात चौबे पेट्रोल पंपावर
पेट्रोल खरेदी करण्यासाठी शेकडो मोटारसायकलची लागली रांग
रेशनकार्ड वरील सव्वा लाख लोकांची आधार नोंदणीच नाही
आधार नोंदणी नसल्याने होत नाही पूर्ण क्षमतेच्या रेशन चा पुरवठा
यात शहरातील 80 हजार लोकांची आधार नोंदणी झाली नाही
रेशन कार्ड सोबत आधार नोंदणी आवश्यक आहे ती करण्याचं प्रशासनच आवाहन।
नागरी समस्या निवारण केंद्रांद्वारे आतापर्यंत 430 तक्रारींचे निराकरण
नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे
झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे
या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोमवारी 13 जून पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 441 तक्रारी प्राप्त झाल्य
आतापर्यंत दहाही झोनमधील 430 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात तीन लाख 88 हजार क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी.
आधारभूत खरेदी केला 8 लाख 69 हजान्द्रार क्विंटल खरेदी मर्यादा.
धान खरेदीची मर्यादा चार लाख क्विंटलवरून आता आठ लाख 69 हजार क्विंटल करण्यात आली। त्यामुळे धान खरेदीला वेग आला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याचा धान खरेदी झाला नाही हे मात्र निच्छित.
मराठी हृदयसम्राट हिंदू जननायक राज साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा असा बॅनर दादर टी टी परिसरात लावण्यात आला आहे
त्या बॅनर शेजारी आदित्य ठाकरे यांना काल वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे शिवसैनिकांनी बॅनर लावण्यात आला होता
त्यामुळे दादरमध्ये पुन्हा आज मनसे आणि शिवसेना बॅनर आमने सामने पाहायला मिळाले