AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला

| Edited By: | Updated on: Apr 15, 2026 | 10:22 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : इराण अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. यादरम्यान मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. युद्ध थांबवण्याकरिता बैठकांचे आयोजन केले जात आहे. राज्यात अजूनही एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे.

Maharashtra News LIVE : सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला
Maharashtra News

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडीत अमेरिकेने नाकेबंदी केली. भारतात अजूनही एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी बंद केली. आता युद्ध संपण्याचे संकेत आहेत. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यान रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची तब्बल आठ तास चाैकशी करण्यात आली. राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. उष्णतेमध्ये मोठी वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 42 च्या पार जात आहे. नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतरचा गारवा संपला. राजकीय घडामोडींना वेग आला. भारतीय हवामान विभागाने दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Apr 2026 06:58 PM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील पार्डी येथे टायरच्या दुकानाला भीषण आग

    धाराशिव जिल्ह्यातील पार्डी येथे टायरच्या दुकानाला भीषण आग

    आगीमध्ये आठ ते दहा लाखांचे नुकसान

    व्यावसायिक दीपक जाधव यांचे टायर व पंक्चर दुकान आगीत भस्मसात

    शॉर्ट सर्किटमुळे आग लावल्याची माहिती

  • 15 Apr 2026 06:45 PM (IST)

    पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे शेलार कुटुंबावर जीवघेणा हल्ला, घरकुलाच्या वादातून हल्ला

    पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे शेलार कुटुंबावर जीवघेणा हल्ला

    माझे घरकुल का कॅन्सल केलं या कारणावरून वाद

    हल्ल्यात कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी; काहींवर रुग्णालयात उपचार सुरू

    निलेश शिरसाटसह सात जणांवर हल्ल्याचा आरोप

    पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

    ग्रामपंचायतीच्या राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा

    आरोपींकडून अजूनही धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप

    शेलार कुटुंबाला संरक्षण आणि निष्पक्ष चौकशीची मागणी

    पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुढील तपास सुरू

  • 15 Apr 2026 06:38 PM (IST)

    मिरा भाईंदरमध्ये राजशिष्टाचार डावलल्याने आमदार प्रताप सरनाईक संतापले

    मिरा भाईंदरमध्ये राजशिष्टाचार डावलल्याने आमदार प्रताप सरनाईक संतापले

    ​मिरा-भाईंदर पालिकेने क्रीडा संकुल लोकार्पण पत्रिकेत कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव खाली छापल्याने नवा वाद

    स्थानिक आमदारांचे नाव जाणूनबुजून वर टाकल्याचा आरोप करत, सरनाईकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी

    जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास हा मुद्दा राज्य मंत्रिमंडळात मांडण्याचा दिला इशारा

  • 15 Apr 2026 06:15 PM (IST)

    संगमनेरमध्ये तलाठी कार्यालयात आमदार अमोल खताळांची अचानक भेट

    संगमनेरमध्ये तलाठी कार्यालयात आमदार अमोल खताळांची अचानक भेट

    कार्यालयात तलाठी गैरहजर, बाहेर एजंटांचा सुळसुळाट उघड

    एजंटांकडून टेबल मांडून खुलेआम कामकाज सुरू असल्याचं उघड

    टेबलवर विविध शासकीय दाखले तयार अवस्थेत आढळले

    काही दाखल्यांवर तलाठ्याचे सही आणि शिक्के असल्याची धक्कादायक बाब

    नागरिकांची एजंटमार्फत लूट होत असल्याचा संशय

    आमदारांचा पारा चढला अधिकाऱ्यांना तात्काळ फोन

    तहसीलदार, नायब तहसीलदार आणि संबंधित तलाठ्याला जाब विचारला

    वरिष्ठांकडे तक्रार संबंधितांवर कारवाईची मागणी

  • 15 Apr 2026 04:54 PM (IST)

    अहिल्यानगर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा जवळपास 40 अंशांवर

    अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढताना दिसत आहे. तापमानाचा पारा जवळपास 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • 15 Apr 2026 04:40 PM (IST)

    पुणे : भोसरीमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

    पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात काही वेळापूर्वी तरुणांच्या टोळक्यात जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. लांडेवाडीतील एका दुकानाबाहेर तीन तरुणांनी मिळून एका तरुणाला लाथा बुक्याने बेदम मारहाण केली आहे. यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

  • 15 Apr 2026 04:27 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड : अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

    पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फक्त अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 47 वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

  • 15 Apr 2026 04:12 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला

    सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसात तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा 40°C ते 42°C पर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 1:00 ते 3:00 या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. त्यामुळे या काळात अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 15 Apr 2026 03:55 PM (IST)

    राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

    विदर्भासह पुण्यातही चाळीशी पार तापमानाची नोंद… हवामान विभागाकडून पुण्यातही येलो अलर्ट तर पुढील चार दिवसात राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

  • 15 Apr 2026 03:45 PM (IST)

    दहिसरमध्ये शिवमंदिर समोर तरुणीला अमानुष मारहाण

    दहिसरमध्ये शिवमंदिर समोर तरुणीला अमानुष मारहाण… मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक, घटना सीसीटीव्हीत कैद… प्रेम प्रकरणातून मारहाण केल्याची माहिती…

  • 15 Apr 2026 03:30 PM (IST)

    राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढणार

    राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढणार… सातारा जिल्ह्याचं तापमान सरासरी 41 अंशांच्या पलीकडे… सातारा शहरात नेहमी असणारी वर्दळ कडक उन्हामुळे मंदावली… विनाकारण घराबाहेर पडू नये… जिल्हा प्रशासनाच्या सूचना…

  • 15 Apr 2026 03:20 PM (IST)

    अकोल्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी?

    अकोल्यामध्ये उष्माघाताचा पाहिला बळी?…. अकोल्यात मालवाहू ऑटोमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला… उष्माघाताने मृत्यू झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती… काल अकोल्यात 44 अंश इतकं तापमान नोंदवलं गेलं…

  • 15 Apr 2026 03:10 PM (IST)

    केसरकरांचीही अजून कोणतीही चौकशी झालेली नाही- अंधारे

    CDR खरे की खोटे?, ते खरे असतील तर शिंदे, केसरकरांची चौकशी कधी?… पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंचा राज्य सरकारला सवाल…. केसरकरांना अजूनही चौकशीला का बोलावलं जात नाही.. अंधारेंचा आरोप…

  • 15 Apr 2026 02:55 PM (IST)

    चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून मोठा तणाव, मिरवणुकीमध्ये दगडफेक

    जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रदे या गावांमध्ये रात्रीपासून मोठा तणाव निर्माण झाला आहे. रात्री सुरू असलेल्या मिरवणुकीमध्ये अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येतोय. लाईट गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

  • 15 Apr 2026 02:45 PM (IST)

    परतवाडा प्रकरणी पोलीस प्रशासनाल काँग्रेसने धरले धारेवर

    परतवाडा येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले

  • 15 Apr 2026 02:30 PM (IST)

    मिरा भाईंदरमधील लुटेरी दुल्हन गजाआड

    मिरा भाईंदर मध्ये लुटेरी दुल्हनला गजाआड करण्यात आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाला लुटणाऱ्या एका टोळीला काशिमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच घरातील दागिने आणि लॅपटॉप घेऊन पळून गेलेल्या ‘नवरी’सह तिच्या साथीदाराला पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे अटक केली.

  • 15 Apr 2026 02:15 PM (IST)

    धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा वाढला

    सध्या राज्यात उष्णतेची लाट आली आहे. अनेक जिल्हांमध्ये तापसान वाढले आहे. धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. आठ दिवसापासून एकेक अंशात झाली तापमानात वाढ.

  • 15 Apr 2026 01:57 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा पावसाचा धोका

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा पावसाचा धोका. पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट तर 17 एप्रिलला यलो अलर्टचा हवामान खात्याचा इशारा. अवकाळी पावससह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. हवामान खात्याच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला. राज्यात उष्णतेची लाट तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचे ढग.

  • 15 Apr 2026 01:43 PM (IST)

    बोरिवली एमएचबी पोलिसांकडून मुलीला मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

    मुंबईतील दहिसर पश्चिम येथील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगावमध्ये एका मुलाने मुलीला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, एमएचबी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. केवळ एका तासात एमएचबी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव राहुल विलास पंडित (28) असे आहे.

  • 15 Apr 2026 01:21 PM (IST)

    भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात प्रकरणात नवा खुलासा

    शिर्डीतील चार एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर. अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या नावे खाती. संबंधित दोन बँक खात्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू. खात्यांमधून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती.कल्पना खरात अद्याप फरार. पोलिसांकडून शोध सुरू. या प्रकरणी दोन आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात.

  • 15 Apr 2026 01:09 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

    गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही 4 हजार रुपयांची वाढ. सोने जीएसटी सह 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 63 हजार 680 रुपयांवर. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा.

  • 15 Apr 2026 12:49 PM (IST)

    राज्यात उष्णतेची लाट, विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार, हवामान विभागाकडून पुण्यातही येलो अलर्ट

    गेली दोन दिवसापासून राज्यात तापमानाचा पारा चांगला वाढला आहे. विदर्भासह पुण्यातही चाळीशी पार तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवसात राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .

  • 15 Apr 2026 12:41 PM (IST)

    हिंगोली- आमदारांचा एखादा मंत्री फोन उचलत नसेल तर त्याला मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही

    हिंगोली- आमदारांचा एखादा मंत्री फोन उचलत नसेल तर त्याला मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही.  मंत्री म्हणजे एका विधानसभे पुरता मर्यादित नाही, बाकीच्या मतदारसंघात/ जिल्ह्यात काय चाललंय त्या पद्धतीने त्या मंत्र्यांनि काम करायला पाहिजेत.  आमदार संतोष बांगर यांचा रोष नेमका कोणत्या मंत्र्यावर..?

  • 15 Apr 2026 12:21 PM (IST)

    रूपाली चाकणकर ला कायदा कळत नाही संविधान कळत नाही वागण्याच्या रीती रिवाज कळत नाही – रुपाली ठोंबरे पाटील यांचाहल्लाबोल

    दहावी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्ट वरती तुम्ही आहात. तुमच्या माध्यमातून महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले. तुम्हाला अटक झाली पाहिजे का अटक होत नाही…? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी विचारला आहे.

    रूपाली चाकणकरला कायदा कळत नाही, संविधान कळत नाही, वागण्याच्या रीती रिवाज कळत नाही. ज्यांना महिला आयोगाच्या पदाची गरिमा कळली नाही त्यांनी 28 दिवसांनी बोलू द्या किंवा 280 दिवसांनी बोलू द्या त्यांच्याकडे बोलायला काही नाही अशी टीकाही त्यांनी केली.

  • 15 Apr 2026 12:03 PM (IST)

    रुपाली चाकणकर तुमचं काम नव्हतं, तर फोन करणाऱ्यात दुसऱ्या नंबरवर कशा? अंजली दमानिया

    टॉप १० फोन नंबर समोर आहे, जे जास्तवेळ खरातांशी बोलले. त्यात खरातची मुलगी पहिल्या नंबरवर आहे. समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहे. 33 हजार 727 सेकंद त्या बोलल्या. रुपाली चाकणकर तुमचं काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम पाहत होत्या. तर तुम्ही फोन करणाऱ्यात दुसऱ्या नंबरवर कशा?  अंजली दमानिया यांचा सवाल

  • 15 Apr 2026 11:58 AM (IST)

    फोन बंद होईपर्यंत चाकणकर खरातशी बोलायच्या, एकेदिवशी त्या 22 मिनिटं बोलत होत्या- दमानिया

    “ही यादी रुपाली चाकणकरांच्या फोनची आहे. मी ही यादी मीडिया ग्रुपवर टाकते. 177 कॉल्स आहेत. इनकमिंग कॉल 119, आऊटगोईंग 58 आहेत. 1 एप्रिल ते 17 मार्चचा हा डेटा होता. फोन बंद होईपर्यंत त्या खरातशी बोलायच्या. एकेदिवशी त्या 22 मिनिटं बोलत होत्या. त्यांना वाटत असेल चूक केलं नाही तर परमेश्वरच जाणो. मी यादी काढली चौकशीची मागणी केली,” असं दमानिया म्हणाल्या.

  • 15 Apr 2026 11:48 AM (IST)

    धनंजय मुंडेंप्रमाणेच रुपाली चाकणकर गायब का? अंजली दमानिया यांचा सवाल

    रुपाली चाकरणकर यांनी समोर येऊन भूमिका मांडावी. धनंजय मुंडेसारख्याच चाकणकर गायब आहेत का? खरातचा मोबाइल बंद होईपर्यंत चाकणकरांचा त्यांना कॉल होता. चाकणकर कुटुंबातील अनेकजण भोंदूच्या संपर्कात होते, असा आरोप दमानिया यांनी केला.

  • 15 Apr 2026 11:45 AM (IST)

    राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मोठं केलं- अंजली दमानिया

    राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मोठं केलं. दीपक केसरकरांचे खरातसोबत 19 कॉल होते. पोपटराव पवार, भुसेंचे पीए खरातकडे गेले होते. जयंत पाटलांचेदेखील खरातसोबत फोन कॉल्स आहेत, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला.

  • 15 Apr 2026 11:32 AM (IST)

    अमरावतीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी MIM चा पदाधिकारी?

    अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यावर आता एमआयएम पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी त्याला सोशल मीडिया प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, असं एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी स्पष्ट केलं. पूर्ण निवडणुकी काळात त्याने पक्षासाठी कोणताही काम केलं नाही, त्यामुळे त्याला पक्षातून काढण्यात आलं होतं, त्यामुळे एमआयएम पक्षाचा आणि त्याचा कोणताही संबंध नाही, असंही ते म्हणाले,

  • 15 Apr 2026 11:20 AM (IST)

    अमरावतीत मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीचं घर बुलडोझरने पाडणार?

    अमरावतीच्या परतवाडामधील मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरचं घर अचलपूर नगरपरिषद बुलडोझरने पाडण्याची शक्यता आहे. आरोपीच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नगरपरिषदेच्या सीईओ यांनी घराची पाहणी केली. नगरपरिषदेच्या वतीने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आली.

  • 15 Apr 2026 11:09 AM (IST)

    दहिसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

    दहिसर नवागाव इथल्या शास्त्रीनगर शिवमंदिरासमोर घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामुळे महिला सुरक्षा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांकडून संबंधित आरोपीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

  • 15 Apr 2026 10:52 AM (IST)

    अमरावतीच्या परतवाडा मधील मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण..

    मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरच्या घराचे अतिक्रमण अचलपूर नगरपरिषद बुलडोझरने पाडण्याची आज शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे आरोपीच्या घराजवळ ही पोलिसांचा बंदोबस्त आहे. नगरपरिषदेच्या वतीने आरोपीच्या परिवाराला अतिक्रमण संदर्भात नोटीस दिल्याची ही सूत्रांनी माहिती दिली आहे, मुख्य आरोपीने घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचा नगरपरिषदला संशय आहे.

  • 15 Apr 2026 10:40 AM (IST)

    राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

    राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या मुख्य उपस्थितीत एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थां )च्या द्वितीय दीक्षांत समारंभ सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित आहेत.

  • 15 Apr 2026 10:30 AM (IST)

    बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरा

    बीडच्या पारगाव शिरस गावात भैरवनाथ यात्रेनिमित्त रंगलेल्या बैलगाडी शर्यतीने अक्षरशः थरार उभा केला. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी वेग, ताकद आणि कौशल्याचा संगम दाखवत मैदान गाजवलं. या रोमांचक लढतीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगावच्या ‘आदत किंग लक्ष्य’ने बाजी मारत तब्बल एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर बुलढाण्यातील ‘हिंदकेसरी लक्ष्य’ दुसऱ्या क्रमांकावर. ड्रोनच्या खास दृश्यांमधून या शर्यतीचा थरार आणखी उठावदार झाला. पारंपारिक क्रीडेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 15 Apr 2026 10:20 AM (IST)

    मुंबईच्या बोरिवलीमध्ये आलेली जलपरी आकर्षणाचे केंद्र

    मुंबईच्या बोरिवलीमध्ये आलेली जलपरी आकर्षणाचे केंद्र बनली असून, तिला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. मुंबईतील बोरिवली कोरा केंद्र मैदानावर एका जत्रेचे आयोजन करण्यात आले असून, तिथे जलपरीचा शो आयोजित करण्यात आला आहे. मत्स्यकन्येचा पोशाख घातलेल्या दोन मुली पाण्याखाली लोकांचे मनोरंजन करत आहेत, मुलांना या मत्स्यकन्या खूप आवडत आहेत. ही जलपरी मुलांसोबत खेळते आणि पाण्यात पोहते, जे मुलांना खूप आवडते.

  • 15 Apr 2026 10:11 AM (IST)

    दादासाहेब खिंडकरच्या सांगण्यावरूनच मारहाण केली, भाऊ समाधान खिंडकरकडून मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण

    एका तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात 13 महिने जेलमध्ये राहिलेल्या दादासाहेब खिंडकरच्या भावाने मोठा दावा केला आहे. दादासाहेब खिंडकर बाहेर आल्यानंतर हॉकीस्टिकने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आपण जामिनावर आहोत आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असे सांगत ही मारहाण ग्रामपंचायत निवडणूक काळात दादासाहेब खिंडकर याच्या सांगण्यावरूनच झाल्याचा दावा दादासाहेब खिंडकरचा सख्खा भाऊ समाधान खिंडकर याने केला आहे.

  • 15 Apr 2026 09:55 AM (IST)

    शिवसेना ठाकरे गटात होणार मोठे फेरबदल, आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?

    शिवसेना ठाकरे गटात आगामी काळात मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून घोषित करण्याचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.

  • 15 Apr 2026 09:45 AM (IST)

    ठाणेकरांची तहान भागवण्यासाठी धावपळ, मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई

    ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या शटडाऊनमुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत ठाणे महापालिकेच्या वतीने साकेत परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, या टँकरसाठी ७०० ते १००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले आहे. शटडाऊनच्या निर्णयामुळे शहरातील अनेक गृहसंकुलांमधील नळांना पाणी येणे बंद झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी संपल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने टँकरची संख्या वाढवावी आणि नागरिकांना जास्तीत जास्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • 15 Apr 2026 09:35 AM (IST)

    भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या, सिमेंट ब्लॉकने ठेचून खून, येवला हादरले

    नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एका ३८ वर्षीय तरुणाचा सिमेंट ब्लॉकने डोक्यात प्रहार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृताची ओळख एकनाथ गायकवाड (रा. सुरेगाव) अशी पटली आहे. अज्ञात हल्लेखोराने एकनाथ गायकवाड यांच्या डोक्यावर सिमेंट ब्लॉकने जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एकनाथ यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 15 Apr 2026 09:25 AM (IST)

    सोलापुरात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून यलो अलर्ट जारी

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून, काल जिल्ह्यात तापमानाचा आकडा ४३.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या तापमानाचा विचार करता, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाढत्या उष्माघाताच्या धोक्याला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळणे हिताचे ठरेल.

  • 15 Apr 2026 09:15 AM (IST)

    अमरावतीच्या परतवाड्यात तरुणींच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश, 4 आरोपी गजाआड

    अमरावतीच्या परतवाडा शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. परतवाडा पोलिसांनी या गंभीर प्रकरणात आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर, तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रात्री आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर, उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक अशी आरोपींची नावे आहेत.

  • 15 Apr 2026 09:05 AM (IST)

    बीकेसी मेट्रो साइटवर भीषण अपघात, गर्डर उचलत असताना क्रेन उलटली

    मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे बुधवारी पहाटे मेट्रोच्या कामादरम्यान एक गंभीर अपघात घडला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मेट्रो साइटवर गर्डर उचलण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. पिलरवर गर्डर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अचानक तोल गेल्याने बीम खाली कोसळला आणि तो उचलणाऱ्या क्रेनचीही पलटी झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या क्रेन हटवण्याचे आणि परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

  • 15 Apr 2026 08:55 AM (IST)

    नाशिक म्हाडा घोटाळा बाबत आज SIT ची पहिली बैठक

    राज्य शासनाकडून या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची झाली आहे स्थापना. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT काम करणार.  SIT ची पहिली बैठक आज होणार संबंधित यंत्रणांकडून आधी सर्व माहिती मागवली जाणार. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात होणार. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांमध्ये नियमभंग करत बड्या बिल्डरांनी केली शासनाची फसवणूक

  • 15 Apr 2026 08:50 AM (IST)

    गोव्यात पकडलेल्या भोंदूबाबावर दोन गुन्हे

    काळी जादू झाल्याची भीती दाखवत ठाण्यातील एका महिलेकडून सुमारे अडीच कोटी रुपये आणि सोन्याचे दागिने उकळणाऱ्या कर्नाटकातील भोंदूबाबा मंजुनाथ सुंदर शेट्टी उर्फ दिक्षीत बाबा (वय ३५) याच्याविरुद्ध आधीपासूनच गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्कार आणि वर्तकनगर ठाण्यात विनयभंग आणि फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत.

  • 15 Apr 2026 08:40 AM (IST)

    कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला गती

    मुंबई, कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दा आता प्रत्यक्ष हालचालींच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुमारे २६३ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.

  • 15 Apr 2026 08:30 AM (IST)

    कल्याणमध्ये ‘पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत मोठी लूट

    कल्याणमध्ये ‘पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अरेस्ट’च्या करत ७३.३० लाखांची लूट. पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक म्हणत आजींना घाबरवले ‘तपास अधिकारी’ बनून पाच सायबर भामट्यांची सुनियोजित केली आजींची फसवणूक. पाच दिवस सतत फोन करून मानसिक दबाव वाढवत‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचून बँक व्यवहार तपासणीचा केला बहाणाय RTGS व ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे ७३.३० लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळले. कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • 15 Apr 2026 08:20 AM (IST)

    नाट्यगृह भाडेवाढीच्या स्थगितीस मुंबई महापालिकेचा नकार

    अखिल भारतीय मराठी परिषदेसी मागणी अमान्य. मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहाचे भाडे शुल्क चार हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. दरवर्षी पाच टक्केने होणार वाढ. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे नाट्य निर्मात्यांवर आर्थिक भार येणार. भाडेवाढीला स्थगिती देण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महापालिका. मात्र यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं

  • 15 Apr 2026 08:14 AM (IST)

    मोठी अपडेट! उद्या पुण्यात पाणीपुरवठा बंद

    पुणे महापालिकेच्या दुरुस्ती व देखभाल कामांमुळे उद्या शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून ते उद्या मध्यरात्रीपर्यंत हा बंद लागू असेल. शुक्रवारी कमी दाबाने पाणी मिळणार आहे. नागरिकांनी पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Published On - Apr 15,2026 8:13 AM

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.