Maharashtra News LIVE : TCS प्रकरणात नाशिक मध्ये आज हिंदू सकल समाजाचा मोर्चा

Maharashtra News LIVE Updates : अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीमध्ये मनसेचे आंदोलन. स्थानिकांना रोजगार देण्याची जोरदार मागणी. इन्वेंशिया हेल्थकेअर लिमिटेड कंपनीविरोधात आंदोलन. मनसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.

Maharashtra News LIVE : TCS प्रकरणात नाशिक मध्ये आज हिंदू सकल समाजाचा मोर्चा
Breaking news
| Updated on: Apr 16, 2026 | 12:06 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Apr 2026 12:06 PM (IST)

    संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं

    संविधान सुधारणा विधेयक लोकभेत सादर करण्याबाबत 333 खासदारांचं मतदान. विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ 207 मतं तर विरोधात 126 मतं.

  • 16 Apr 2026 12:03 PM (IST)

    कैसा हराया फेम MIM पक्षाची उमेदवार सहर शेख नॅाट रिचेबल

    कैसा हराया फेम MIM पक्षाची उमेदवार सहर शेख नॅाट रिचेबल.  ⁠वडीलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेखच्या अडचणीत वाढ झाली आहे.  ⁠सहर शेख आणि तिझे वडील युनूस शेख नॅाट रिचेबल आहे.

    ⁠सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून MIM पक्षाची नगरसेविका आहे, मात्र ती व तिचे वडील मुंब्र्यातदेखील नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • 16 Apr 2026 11:50 AM (IST)

    घरगुती सिलिंडर मधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणारी मोठी टोळी जेरबंद

    घरगुती सिलिंडर मधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणारी मोठी टोळी जेरबंद झाली आहे. बेसा पिपळा परिसरात घरगुती सिलिंडर मधून गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना अन्न वितरण विभागाने कारवाई केली.  व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने गॅस चोरी करणारी टोळी सक्रिय, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त. 2 जणांना अन्न वितरण विभागाने पोलीसांच्या स्वाधीन केलं.  या टोळीतील मोठा मासा कोण? याचा शोध सुरू आहे.

  • 16 Apr 2026 11:40 AM (IST)

    मंगरूळ – डोक्यात दगड घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करून 36 वर्षांच्या युवकाचा खून

    धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे ३६ वर्षीय युवकाचा डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.  खून केल्यानंतर मृतदेह तब्बल 90फूट फरफटत नेऊन ओढ्याच्या काठावर पळसाच्या झाडाखाली टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

  • 16 Apr 2026 11:30 AM (IST)

    भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

    भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात जाऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पड-झड झालेल्या घरांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला .  हिंगोली जिल्ह्यात दिनांक 11-04-2026 रोजी सकाळी 08 वाजून 45 मिनिटांनी अनेक गावांना भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंप मापक वेधशाळेने या भूकंपाची तीव्रता 4.7 रिक्टर स्केल येवढी असल्याच सांगितलं आहे .

    ह्या भूकंपाचा केंद्र बिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहे.  या गावात अनेकांच्या घराला तडे गेले आहेत पांगरा शिंदे गावात जाऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पड-झड झालेल्या घरांची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधत ज्या ग्रामस्थांचे घरे पडली, काही घरांना तडे गेले अशा नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहेत.

  • 16 Apr 2026 10:57 AM (IST)

    जळगावच्या शेंदुर्णीत गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको; ग्राहकांचा संताप

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या शेंदुर्णी येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या महिनाभरापासून सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीच्या वारंवार फेऱ्या मारूनही कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला होता. पहाटे चार-पाच वाजल्यापासून रांगेत ताटकळत उभ्या राहूनही सिलिंडर न मिळाल्याने हताश झालेल्या ग्राहकांनी रस्त्यावर रिकामे सिलिंडर आडवे टाकून वाहतूक रोखली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 16 Apr 2026 10:47 AM (IST)

    धर्मांतरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक

    नाशिक येथील टीसीएस कंपनीत समोर आलेल्या धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणावरून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेत, अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर ‘राष्ट्रद्रोहा’चे गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. “हिंदुस्थानमध्ये आम्ही अशा घटना खपवून घेणार नाही. आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींचे छुपे कनेक्शन शोधून काढण्याचे आवाहन यंत्रणांना केले आहे. या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेणाऱ्यांनीही आपल्या भूमिकेचा विचार करावा, असे सांगत गृहमंत्रालयाने स्वतःहून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या अन्यायाविरुद्ध आज काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाद्वारे भाजप प्रशासनावर दबाव निर्माण करत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

  • 16 Apr 2026 10:37 AM (IST)

    नाशिक टीसीएस प्रकरण, निदा खानचा दिल्ली ब्लास्ट कनेक्शनचा संशय

    नाशिक येथील टीसीएस कंपनीत समोर आलेल्या लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणातील फरार एचआर मॅनेजर निदा खानचा दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील आरोपी डॉक्टर शहीन याच्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. निदा खान भिवंडी परिसरात लपून बसली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तिला पकडण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी सखोल शोधमोहीम राबवत आहेत. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या गंभीर आरोपांची चौकशी आता विविध स्तरांवर सुरू असून, लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संवेदनशील परिस्थितीत, नागरिकांनी निदा खान किंवा या प्रकरणाशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 16 Apr 2026 10:27 AM (IST)

    चांदिवलीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची तांत्रिक पडताळणी, देशातील पहिलीच ऐतिहासिक प्रक्रिया

    चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया आज १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील बोरीवली (पूर्व) येथे सुरू झाली आहे. माजी आमदार नसीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या मागणीनंतर, देशात पहिल्यांदाच ईव्हीएममधील बर्न मेमरी (Burnt Memory) आणि मायक्रो कंट्रोलर (Microcontroller) या घटकांची सखोल तांत्रिक तपासणी केली जात आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या राजेंद्र नगर गोदामात सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे. यामध्ये यंत्रणेची सुरक्षितता आणि अचूकता तपासली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक दृढ करण्यासाठी उचलले गेलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. या तांत्रिक माहितीसाठी आमदार दिलीप लांडे यांचे वकील ॲडव्होकेट समाधान सुलाने यावेळी उपस्थित राहणार आहेत.

  • 16 Apr 2026 10:18 AM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा दौऱ्यावर, सेवाग्राम आश्रमाला भेट देणार

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वर्धा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आपल्या या दौऱ्यात राष्ट्रपती सेवाग्राम आश्रमातील बापुकुटीला भेट देणार आहेत, त्यानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गांवरील वाहतूक २०-२० मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  • 16 Apr 2026 10:07 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ; हायकोर्टाच्या वकिलाची धारदार शस्त्राने हत्या

    छत्रपती संभाजीनगरमधील गांधेली फाट्याजवळ हायकोर्टातील वकील मिथुन भास्कर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. क्लायंटला भेटायला गेलेले असतानाच त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. घटनास्थळी संशयितांच्या दुचाकीचे ठसे उमटले आहेत, हा प्रकार लूटमारीतून घडला की त्यामागे काही नियोजित कट आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

  • 16 Apr 2026 09:50 AM (IST)

    कल्याणात शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून 47 लाखाची फसवणूक

    खडकपाडा पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधील बिकानेर येथून ठोकल्या बेड्या. रीगतमल शर्मा उर्फ लालचंद असे या आरोपीचे नाव असून याआधी देखील या प्रकरणी निकेश पटेल नावाच्या आरोपीला पोलिसांनी केले होते जेरबंद. सोशल मीडियातून संपर्क साधून विश्वास संपादन करून आरोपींनी केली होती फसवणूक. आणखी किती जणांना गंडा घातला याचा पोलिसांकडून तपास सुरू

  • 16 Apr 2026 09:40 AM (IST)

    आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून 11 दिवसात पर्दाफाश

    जळगावातील ७ लाखाची रोकड असलेले एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून ११ दिवसात पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून अजून तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. मोबीन मील्ला, अब्दुल नूर करीम अशी अटक करण्यात आलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. चोरट्यांनी जळगावातील इक्विटास बँकेचे ७ लाखाची रोकड असलेले एटीएम मशीन चोरून नेले होते, याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. जानेवारीपासून आतापर्यंत या टोळीने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सटाणा, जळगाव येथे लाखोंची रोकड असलेले एटीएम चोरून नेल्याची माहिती समोर

  • 16 Apr 2026 09:30 AM (IST)

    बसस्थानकात 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, हिंगोलीत खळबळ

    हिंगोली-बसस्थानक परिसरात 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा मृत्यू उष्माघाताने झाला असावा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ जिल्ह्याचे तापन 40° वर..

  • 16 Apr 2026 09:20 AM (IST)

    निलंबित ट्रॅफिक वॉर्डनला चेंन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक

    पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांची सोन साखळी हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पकडलेला आरोपी हा निलंबित ‘ट्रॅफिक वार्डन’ आहे. वाहतूक विभागातूनच चोरलेल्या गाडीचा वापर तो चोरी करण्यात साठी करत होता. सचिन चव्हाण असं सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्याच नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सचिन चव्हाण या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • 16 Apr 2026 09:05 AM (IST)

    नाशिकच्या वृक्षतोडी चा मुद्दा पुन्हा गाजणार

    21 एप्रिलला तारखेला वृक्षतोडी विरोधात नाशिक मध्ये निघणार मोर्चा. मनसे जिल्हा सम्पर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा. तपोवन आणि गंगापूर रोडवरील वृक्षतोडी ला करणार विरोध. या आधी अमित्त ठाकरे यांच्या उपस्थितीत निघाला होता पर्यावरण प्रेमीचा मोर्चा. वृक्षतोडी बरोबर गोदावरी सिमेंट काँक्रीट चा मुद्दाही उपस्थित करणार

  • 16 Apr 2026 08:58 AM (IST)

    हिंगोलीत उष्माघाताने मृत्यू का?

    हिंगोली बस्थानक परिसरात 30 वर्षीय व्यक्तीचा मृत देह आढळला. हा मृत्यू उष्माघाताने झाला असावा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तपमानात मोठी वाढ जिल्ह्याचे तापन 40° वर.

  • 16 Apr 2026 08:53 AM (IST)

    नाशिकच्या वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा गाजणार

    21 एप्रिलला तारखेला वृक्षतोडी विरोधात नाशिक मध्ये निघणार मोर्चा. मनसे जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांची घोषणा. तपोवन आणि गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला करणार विरोध. याआधी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत निघाला होता पर्यावरण प्रेमींचा मोर्चा. वृक्षतोडी बरोबर गोदावरी सिमेंट काँक्रीटचा मुद्दाही उपस्थित करणार.

  • 16 Apr 2026 08:36 AM (IST)

    धरणगावातअल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार

    जळगावातील धरणगावात अल्पवयीन मुलीवर तरुणाने घरात घुसून केले अत्याचार.  तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या आरोपीने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत तसेच पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले. एवढ्यावरच न थांबता, ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या आईलाही ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

  • 16 Apr 2026 08:30 AM (IST)

    दिंडोशी पोलिसांकडून भोंदू बाबाविरोधात एफआयआर दाखल

    दिंडोशी पोलिसांनी भोंदू बाबाविरोधात एफआयआर दाखल केला. सध्या दिंडोशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.  हा भोंदू बाबा उपचाराच्या नावाखाली दारूची बाटली आणि बोकडाचे काळीज मागायचा. दूरदूरहून लोक या बाबांकडे भूतबाधा उतरवण्यासाठी येतात. हे बाबा रात्री 6 ते 7 च्या सुमारास आपली झाडफुक सुरू करतात आणि सकाळी ६ वाजेपर्यंत ती चालू ठेवतात. हा बाबा म्हणतो की देवी माझ्यात अवतरते आणि ज्यांना मुले नाहीत त्यांना मदत करण्याचा दावा करतो.या बाबाविरुद्ध अनेक तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

  • 16 Apr 2026 08:17 AM (IST)

    खरात प्रकरणात नवा मोठा खुलासा

    जमीन खरेदीपूर्वी खात्यात 3 कोटींची उलाढाल उघड. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांची चौकशी. अशोक खरातच्या दोन बँक खात्यांमध्ये RTGS ने कोट्यवधींचे व्यवहार. आरोपींच्या खात्यांत मागील दोन वर्षांत 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार.शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती. रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा. अशोक खरात, पत्नी कल्पना खरातसह इतरांवर कारवाई. दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर. आर्थिक व्यवहारांची चौकशी.

  • 16 Apr 2026 08:16 AM (IST)

    नाशिक मध्ये आज हिंदू सकल समाजाचा मोर्चा

    TCS कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यलय पर्यंत निघणार मोर्चा. TCS कंपनीत घडलेल्या घटनेचा निषेधार्थ मोर्चाचे आयोजन. वेगवेगळ्या हिंदू संघटना मोर्चात होणार सहभागी. धर्मांतर आणि महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चा.

शिर्डी जमीन फसवणूक प्रकरण. कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज राहाता न्यायालयात सुनावणी. कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणुक प्रकरणात आरोपी. भोंदू अशोक खरात , कल्पना खरातसह तीन जणांवर गुन्हा. आरोपी अरविंद बावके आण किरण सोनवणे सध्या न्यायालयीन कोठडीत. दोघांचे जामीन अर्ज अगोदरच राहाता न्यायालयाने फेटाळले आहेत. कल्पना खरातला जामीन मिळणार का ? की फेटाळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष.परळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पोलीस प्रशासनाकडून नियमांचे पालन करत या जयंती मिरवणुकींना परवानगी देण्यात आली होती. परंतु अनेक ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे लावण्यात आले होते. दरम्यान आता या प्रकरणी 13 डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात 11 तर शहर पोलीस ठाण्यात 2 डीजे चालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow Us