Maharashtra News LIVE : मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज नारायणगडावर दसरा मेळावा
Maharashtra News LIVE : शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट यांचे दसरा यांच्या दसरा मोळाव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटात येथे आज पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पाडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत देखील नारायणगडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. यासह विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
अजित दादा गेल्या पासून आपल्याला गृहित धरायचे काम सुरू आहे, मकरंद पाटील यांनी व्यक्त केली नाराजी
साताऱ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेते व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.या बैठकीला मंत्री मकरंद पाटील,खासदार नितीन पाटील आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सध्या पार पडत असलेल्या पदवीधर निवडणूकी बाबत ही बैठक बोलवण्यात आली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यामध्ये महायुतीत सतत धूस-फुस असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हाच धागा पकडून बैठकीला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सभागृहातील बऱ्याचशा खुर्च्या मोकळ्या असल्याचे देखील पाहायला मिळाले. ही गोष्ट मंत्री मकरंद पाटील यांच्या सुद्धा नजरेतून सुटली नाही त्यांनी यावेळी बोलत असताना आज नेहमीसारखी उपस्थिती नसल्याचे बोलून दाखवले.
-
धाराशिवमध्ये पाणी टंचाईच्या झळा
धाराशिव जिल्ह्यात ऑक्टोबरमध्येच पाणीटंचाईची झळ बसत आहे. जिल्ह्यात 9 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अल्प पाऊसामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. 34 ते 35 अंशावर तापमान पोहचले आहे. धाराशिव, उमरगा आणि लोहारा तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८६ खासगी विहिरींचे अधिग्रहण पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती थांबवण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
-
-
अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक
महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक की श्रीकांत देशपांडे मतदारांमध्ये संभ्रम आहे, अशी टीका ठाकरे गटाचे उमेदवार दत्तात्रय लहाने यांनी केली. भाजपने बंडखोरांवर कारवाई केली मग शिंदेंच्या शिवसेनेने बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यावर कारवाई का केली नाही? लहाने यांनी सवाल केला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे.
-
दसरा मेळाव्याला आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती
मंत्री पंकजा मुंडे यांचा आज भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. आजच्या दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याला आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती असणार आहे. दरम्यान मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली असून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.
-
राष्ट्राप्रती निष्ठा आणि कर्तव्य महत्त्वाचे -मोहन भागवत
प्राचीन काळापासून भारत हा एकत्र आहे. भारत हा विविधतेचा देश आहे. राष्ट्राप्रती निष्ठा आणि कर्तव्य महत्त्वाचे आहे. संतांनी समाजाला दिशा दिली असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. नागपूरमध्ये संघाचा विजया दशमी कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
-
-
आजच्या दिवशी वाईट बोलण्याची भावना नसावी-मंत्री पंकजा मुंडे
आजच्या दिवशी वाईट बोलण्याची भावना नसावी, अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. तर मात्र तो प्रत्येकांच्या संस्काराचा भाग आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आज भगवान भक्तिगडावर त्यांचा परंपरागत दसरा मेळावा होत आहे. बीडचे समाजकारण, राजकारणावर त्या काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येताना पाण्याची बॉटल, डोक्यावर रुमाल घेऊन या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-
संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी नारायण गडावर यावे-मनोज जरांगे
आज 12 वाजता नारायण गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. संकटाला तोंड देण्यासाठी सर्वांनी नारायण गडावर यावे. महाराष्ट्रातील बीड, बांधव हे मेळाव्याला आले पाहिजे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आज जरांगे पाटील कुणाविरोधात तोफ डागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात ते सरकारवर काय टीका करतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या टार्गेटवर असतील का, याची चर्चा रंगली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीत बाप-लेकाची हत्या
छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीत बाप-लेकाची हत्या करण्यात आली आहे. बाबासाहेब कीर्तिकर आणि नेहाल कीर्तिकर अशी मृतांची नावे आहेत. जुन्या वादातून दुहेरी हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून पाच संशयित काही तासांत ताब्यात घेतलं. हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन परिसरातून पकडले.
-
कल्याणजवळील म्हारळगावात चोरी करून पळताना चोरट्याची फजिती!
कल्याणजवळील म्हारळगावात चोरी करून पळताना चोरट्याची फजिती झाली आहे. पहाटे घरात घुसून मोबाईल आणि गणपतीची मूर्ती चोरणाऱ्या चोरट्याला कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडले. आरडाओरड होताच पत्रा तोडून छतावरून पळण्याचा प्रयत्न करत होता, पण पाय घसरल्याने चोरटा खाली कोसळला. रहिवाशांनी चोरट्याला चोप देत हातपाय बांधले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. गणेश अनिल देसले असे आरोपीचे नाव; त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल, कल्याण सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
-
डोंबिवलीत जुन्या वादातून २६ वर्षीय साहिल गायकवाडची चाकूने भोसकून हत्या!
अल्पवयीन मावसभावाच्या मारहाणीचा वाद मिटला, मात्र मोठ्या भावाला जीव गमावा लागला. डोंबिवलीच्या टेलकोसवाडीत जन गण मन शाळेबाहेर रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला हत्याचा थरार पाहायला मिळाला. पाच जणांनी साहिलला घेरलं त्यानंतर छातीत चाकू भोसकल्याने मृत्यू झाला. हर्षद गिरीसह पाच जणांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
ऑक्टोबरमध्येच पाणीटंचाईची झळ; जिल्ह्यात 9 गावांना टँकरने पाणीपुरवठा!
अल्प पाऊसामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आलं आहे. 34 ते 35 अंशावर टेंपरेचर पोहोचलं आहे. धाराशिव, उमरगा आणि लोहारा तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत, जिल्ह्यात आतापर्यंत २८६ खासगी विहिरींचे अधिग्रहण पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती थांबवण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
-
विजयादशमीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट
विजयादशमीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे. तब्बल दोन टन रंगीबेरंगी फुलांनी मंदिर सजवण्यात आलं असून, झेंडू, गुलाब, शेवंती आणि ऑर्किडच्या फुलांनी मंदिराचं रूप अधिकच खुललं आहे. पुण्याचे विठ्ठलभक्त राम जांभुळकर यांनी ही पुष्पसजावट विनामूल्य केली आहे. या मनमोहक सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणीचं रूप अधिकच लोभस दिसत आहे.
-
नवव्या माळेच्या संध्येला तुळजाभवानी मातेची हत्ती वाहनावरून छबिना मिरवणूक
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात नवव्या माळेच्या संध्येला देवीचा हत्ती वाहनावरून छबीना मिरवणूक सोहळा पार पडला… यावेळी प्रक्षाळ पूजा करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आज विजयादशमीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात सार्वत्रिक सीमोल्लंघन आणि बलिदानाचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवानंतर घटोत्थापन करण्यात येणार असून, यासह शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
-
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात झेंडूच्या फुलांचे दर घसरले
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात झेंडूच्या फुलांचे दर घसरले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना फटका बसला आहे. बाजारात फुलांची आवक वाढल्याने दरांवर परिणाम झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी दर घसरले आहेत.
-
जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध
जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध, विरोधानंतरही दसरा मेळावा होत असताना मंत्री तानाजी सावंतांच्या सहकाऱ्यांकडून जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून विरोध करण्यात आला. विरोधानंतर देखील शेकडो एकरवर नारायणगडावर हा दसरा मेळावा होत आहे. विरोधानंतर ही दसरा मेळावा होत असताना आज गडावर जाणाऱ्या लाखो लोकांच्या जेवण, पाण्याची व्यवस्था मंत्री तानाजी सावंत यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. एका गटाकडून विरोध तर दुसऱ्या गटाकडून मदत याची चर्चा होत आहे…
-
नवव्या माळेच्या संध्येला तुळजाभवानी मातेची हत्ती वाहनावरून छबिना मिरवणूक
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात नवव्या माळेच्या संध्येला देवीचा हत्ती वाहनावरून छबीना मिरवणूक सोहळा पार पडला… यावेळी प्रक्षाळ पूजा करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान, आज विजयादशमीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात सार्वत्रिक सीमोल्लंघन आणि बलिदानाचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवानंतर घटोत्थापन करण्यात येणार असून, यासह शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
-
अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात मृत पाल आढळली
अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात मृत पाल आढळली. सोयाबीनच्या भाजीमध्ये मृत पाल आढळल्याने आश्रमशाळेत खळबळ उडाली आहे. सेंट्रल किचनच्या जेवणाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा सामाजिक संघटनांनी आरोप केला आहे. सेंट्रल किचन बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेने कडून दसऱ्याचा मुहूर्त
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त… आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. आज शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंने भरलेले ट्रक्स रवाना होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत जीवनावश्यक मदतीच्या साहित्याचे ट्रक दुष्काळग्रस्त भागाकडे रवाना होणार, शेतकऱ्यांना साहित्याचं वाटप होणार. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे.
दरवर्षी प्रमाणे दसऱ्यासाठी मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मोठी तयारी सुरु असते. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट यांचे दसरा मेळावे हे राज्यामध्ये प्रचंड गाजतात. या मेळाव्यातून दोन्ही पक्ष त्यांच्या पुढील भूमिका जाहीर करतात. त्यांच्या याच भूमीकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज नारायणगडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता मनोज जरांगे नारायण गडाच्या दिशेने रवाना होतील राज्यभरातून मराठा समाज बांधव आज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार आहेत. तर बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटात येथे आज पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पाडणार आहे. भगवान बाबांच्या जन्मस्थळावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सुजय विखे, महादेव जानकरांची मेळाव्याला उपस्थिती असणार आहे. आजी-माजी आमदारांसह अनेक मान्यवरांची मेळाव्याला उपस्थिती सकाळी ११ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहेत. एवढंच नाही तर, भगवा घेवून खांद्यावर शिवसैनिक दिसेल बांधावर… असे बॅनर लावून शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वत्र बॅनर लावले आहेत. गोरेगावच्या नेस्को मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा आज पाच वाजता मेळावा पार पडणार असून, नेस्को च्या बाहेर सर्वत्र बॅनर लावले आहेत दसरा मेळाव्याच्या बॅनर मध्ये एक गुजराती भाषेतील बॅनर ही सर्वांचे लक्ष वेदत आहे. यासह विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.