Maharashtra News Live : नांदेडनंतर परभणीत 32 वर्षीय शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय
Maharashtra News Live : नांदेडनंतर परभणीत 32 वर्षीय शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. कर्जासाठी छळ केल्याने एका शेतकऱ्याने आयुष्य संपवलं. यावरून विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत .

LIVE NEWS & UPDATES
-
१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू अपघात नसून घातपात
बीडच्या पाटोदा येथील १९ वर्षीय तरुण आरिफ तकदीर शेख याचा मृत्यू अपघात नसून त्याची हत्या झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सखोल चौकशीसह, गुन्हा दाखल करण्याची तसेच दफन केलेला मृतदेह बाहेर काढून फेर शवविच्छेदन करण्याची मागणी आई रेश्मा शेख व कुटुंबीयांनी केली आहे. २५ सप्टेंबर रोजी संशयित गणेश गर्जे नामक मुकादम आणि त्याच्या एका साथीदाराने आरिफला मारहाण करून दुचाकीवर जबरदस्तीने सोबत नेले होते. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी आरिफचा अपघात झाल्याची माहिती गर्जे याने कुटुंबीयांना फोनवरून दिली.
-
नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे येथील महाले पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात
नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे येथील महाले पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात. कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन धडकली. धडक दिल्यानंतर कार दोन ते तीन वेळा पलटली. अपघातात एक जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
-
-
फडणवीस यांच्या शुभहस्ते नैना परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नैना परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन व मालमत्ता पत्रकांचे वाटप होणार आहें. नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण आहें. नैना प्रकल्प आज पासून सुरु होतं आहें खूप अडचणी होत्या मात्र आता मार्ग मोकळा झालाय. पनवेलवासियांसाठी आज दिवाळी भेट वस्तूचं आहे.
-
नागपूर शहरातील सेंट्रल एव्हेन्यू परिसरात आग
नागपूर शहरातील सेंट्रल एव्हेन्यू परिसरात गीतांजली चौकाजवळ, पाल पॅलेस हॉटेलच्या मागे असलेल्या कबड्डीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती…आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. …आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-
अर्थखात्याच्या मागणीवरुन अजित दादा गटाचे नेते फडणवीसांच्या भेटीला
अर्थखात्याच्या मागणीवरुन हे सर्व अजित दादां गटाचे राष्ट्रवादीचे नेते आता वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्याच्या भेटीला पोहोचले.
-
-
अजित दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आता फडणवीस यांच्या भेटीला
अजित दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत.
-
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपली
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपली. देवगिरी बंगल्यावर जवळपास दोन तास बैठक सुरु होती. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.
-
जळगावमध्ये स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आज लोकार्पण
जळगावमधील जिल्हा बँकेमध्ये स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा. अनावरण सोहळ्यानंतर छत्रपती संभाजी नाट्यगृहांमध्ये मान्यवरांच्या मनोगताचा कार्यक्रम पार पडणार असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा बँक परिसरात ठीक ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील दौऱ्यातील दादांच्या आठवणी संदर्भातले फोटो लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच शरद पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये पार पडणार सोहळा..
-
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळातही सावकारी परवान्याची मागणी
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळातही सावकारी परवान्याची मागणी करण्यात आली आहे. सावकारी परवान्यासाठी १२ नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. अवैध सावकारांकडून महिन्याला ५ ते १० टक्के किंवा त्याहून अधिक व्याज आकारणी केली जाते. विनापरवाना सावकारी आणि अवाजवी व्याज आकारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सहकार विभागाने दिला. सावकारांविरोधात न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकाने केलं.
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा – सतेज पाटील
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केलं. ‘शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले नसेल,तर त्याचा फायदा काय…आमचे म्हणणं आहे की, सरसकट कर्जमाफी करा, असे काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले.
-
जालन्यात दुष्काळाची दाहकता वाढली
जालना जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे. पाण्याअभावी दीड एकर क्षेत्रावरील मोसंबीची बाग जमीन दोस्त केली. जवळपास 350 मोसंबीच्या झाडावर jcb फिरवला. बदनापूर तालुक्यातल्या पाडळी गावातील विदारक चित्र पाहायला मिळत आहे. छोटे-मोठे जलस्रोत आटल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अधिकच चिंतेत आहेत.
-
पुढील चार दिवसांत कोकणात पावसाचा इशारा
रत्नागिरी- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामान विभागने २७ ते २९ ऑक्टोबरपर्यंत कोकणात पावसाचा इशारा दिलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. कोकणात सध्या संमिश्र आणि बदलत्या हवामानाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली तयार होत असल्याने त्याचा परिणाम दिसणार आहे. पुढील काही दिवस सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
-
नाशिक-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
नाशिक मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहन बंद पडल्याने झाली वाहतूक कोंडी
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल अवजड वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. -
रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका
धाराशिव जिल्ह्यात भीषण दुष्काळाचा फटका आता रेशीम उद्योगालाही बसू लागलाय. पाण्याअभावी रेशीम उद्योगासाठी महत्त्वाचे असलेले तुतीचे प्लॉट वाळून चालले आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकरी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने तुतीची झाडे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तुतीची पानेच उपलब्ध झाली नाहीत, तर रेशीम अळ्यांचे संगोपन आणि उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा रेशीम उद्योग आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
मायक्रो फायनान्सच्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून परभणीतील केकरजवळा येथील 32 वर्षीय शेतकऱ्याने जीवन संपवलं आहे. लहू माणिक लाडाने असं जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील दोन महिन्यापासून लहू लाडाने हे शेती उध्वस्त झाल्याने मानसिक तणावात होते. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. दुष्काळासहित राज्य, देशातील घडामोडी जाणून घ्या