AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानसोबत किसिंग सीन देताच अभिनेत्रीला वाटलं लॉटरी लागली, पण सिनेमा प्रदर्शित होताच…

Aamir Khan Kissing Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत किसिंग सीनमुळे अभिनेत्री भलतीच खूश झाली होती. पण सिनेमा प्रदर्शित होताच तिला धक्का बसला.

आमिर खानसोबत किसिंग सीन देताच अभिनेत्रीला वाटलं लॉटरी लागली, पण सिनेमा प्रदर्शित होताच...
Aamir KhanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 10:15 AM
Share

बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता आमिर खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘हम हैं राही प्यार के.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३३ वर्षे उलटली असली तरीही हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत जुही चावला मुख्य भूमिकेत होती आणि त्यांची जोडी खूप लोकप्रिय ठरली होती. या दोघांनी ‘कयामत से कयामत तक’, ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘दौलत की जंग’ आणि ‘इश्क’ यांसारख्या इतर अनेक चित्रपटांतही एकत्र काम केले आहे. या सिनेमात नवनीत निशान या अभिनेत्रीनेही एक महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

नवनीत निशानने या चित्रपटात ‘माया’ची भूमिका साकारली होती. चित्रपटाला ३३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तिने या सिनेमाशी संबंधित एक किस्सा सांगितला. नवनीत यांनी ‘माया’ हे पात्र साकारले होते, जे आमिर खानसोबत लग्न करण्यासाठी खूप उत्सुक असते. अभिनेत्रीने खुलासा केला की चित्रपटात तिच्या आणि आमिर खान यांच्यात एक किसिंग सीन होता, जो नंतर काढून टाकण्यात आला.

किसिंग सीन काढून टाकला

एका मुलाखतीत नवनीत म्हणाली की, “हे दुर्दैव आहे की एक छानसा सीन शेवटी काढून टाकण्यात आला. आमच्या साखरपुड्यानंतर मी आमिर खानला घ्यायला त्याच्या घरी गेले होते आणि त्याच्या गालावर एक किस घेतले. त्यामुळे त्याच्या गालावर लिपस्टिकचा ठसा उमटला. नंतर आमिर म्हणाला की या सीनमध्ये कंटिन्युइटी असावी.”

सात-आठ वेळा किसिंग सीन शूट

नवनीतने पुढे सांगितले, “त्यामुळे दिवसभरात त्याने मला त्याच्या गालावर सात-आठ वेळा किस करायला लावले. मी घरी आले आणि मित्रांना सांगितले की मी पूर्ण दिवस आमिर खानला किस करण्यातच घालवला. मला तर लॉटरीच लागली!”

अंड्यांच्या वासामुळे त्रास

नवनीतने पुढे सांगितले की आमिर खान आणि जुही चावला यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणार असल्याचे समजल्यावर ती खूप अस्वस्थ झाली होती. तिने अंडी फेकून मारण्याच्या सीन्सबद्दलही सांगितले. ती शाकाहारी असल्याने त्या वेळी अंड्यांचा वास तिला अजिबात सहन झाला नव्हता.

‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. यात आमिर खान आणि जुही चावला यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे आमिर खानने रॉबिन भट्ट यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची पटकथाही लिहिली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी जुही चावलाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ देण्यात आला.

Follow Us
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र