AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळच्या विजयानंतर सतेज पाटील पुण्यात; शेतकर्‍यांसाठी सरकारकडे केली मोठी मागणी

गोकुळच्या विजयानंतर सतेज पाटील पुण्यात आले आहेत.. पुण्यात पोहोचल्यानंतर सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी केली .

गोकुळच्या विजयानंतर सतेज पाटील पुण्यात; शेतकर्‍यांसाठी सरकारकडे केली मोठी मागणी
farmer loan Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 9:59 AM
Share

राज्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारने एकीकडे शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर मायक्रो फायनान्स कंपन्या या शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करत आहे. नांदेड, परभणीत मायक्रो फायनान्सच्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. या घटनेचे राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. गोकुळच्या विजयानंतर पुण्यात आलेले काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली.

सतेज पाटील म्हणाले, ‘सरकार म्हणतंय की, कर्जाचं पुनर्गठन करणार आहे. पण शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले नसेल,तर त्याचा फायदा काय…आमचे म्हणणं आहे की, सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही एका बाजूला कर्जमाफी जाहीर करताय. केंद्र शासनाला मदतीसाठी विनंती करताय. याचा अर्थ दुष्काळ आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न बुडाले आहे. मग तुम्ही कर्ज पुनर्गठन करून शेतकरी कर्ज कसा फेडणार…आमची मागणी आहे की, पीक कर्ज  हे तुम्ही 100 टक्के माफ करावे. दिवाळीत 5000 रुपये देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. ती दुर्दैवी आहे. किमान 25000 रुपये द्यावी. किमान त्यांची दिवाळी चांगली व्हावी’.

‘मायक्रो फायनान्स कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका बाजूला सरकार सांगतंय की, कर्ज फेडू नका. बँका तुमच्या दारात येणार नाहीत. मग मायक्रो फायनान्स कंपनीवर बंधने नाही का? आता कृषी खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे कुठे आहेत… कृषी खात्याचा पंचनामा किती झाला, हे कुठेही दिसत नाही. सहकार खाताच्या अंतर्गत हा विषय येतो. त्यांचंही विधान कुठे ऐकायला मिळत नाही. आता बावनकुळे प्रमुख झालेत. ते सर्व हाताळत आहेत. मग या मायक्रो फायनान्सवर बंधने येत नाही का, त्यांच्यावर कडक कारवाई होणार का? या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले.

‘शासनाने सेबीकडे तक्रार केली पाहिजे. आरबीआयकडे तक्रार केली पाहिजे. त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची असेल, तर कारवाई करतील.   ही सरकारची शेतकऱ्यांविषयी अनास्था  आहे. सरकारने कर्जवसुली करू नये, असं सांगितलं आहे. मग हे त्यांच्या घरी जातात कसं? शेतकऱ्याला उचलतात कसं? जर एका मायक्रो फायनान्सवर कारवाई होईल, तर दुसऱ्यांचं धाडस झालं नसतं, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...