Maharashtra News LIVE : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. अमराठी रिक्षाचालकांना मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली.

LIVE NEWS & UPDATES
-
भंडारा : परिवहन विभागाच्या इमारतीची शिवेंद्रराजेंकडून पाहणी
भंडारा उपप्रादेशिक परिवहन विभागाची 5 कोटी 60 लक्ष रुपये खर्च करून पलाडी येथील पहाडीवर इमारत बांधण्यात आली. यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही नवीन इमारत कोठेवधी रुपये खर्चून बांधण्यात आली. या दोन्हीही इमारतींची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाहणी केली.
-
धुळे – दोंडाईचा शहरात मोबाईल स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद
दोंडाईचा शहरात मोबाईल स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला आहे. दोन्ही समूह समोरासमोर आले असताना पोलिसांनी मध्यस्थी केली. यादरम्यान झालेल्या दगडफेकीत दोन ते तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
-
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, चालक बचावला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील कुडे गावाच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरील लोखंडी रेलिंगला धडकला. धडक इतकी जोरदार होती की लोखंडी रेलिंग टेम्पोच्या आरपार घुसले. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
-
केमिकल फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानमधून दोन आरोपींना अटक
केमिकल विक्री व्यवसायात बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून 17 लाख 65 हजार 374 रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला एम.एच.बी. कॉलनी पोलिसांनी राजस्थान येथून अटक करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. तक्रारदार निर्मित संजय अजमेरा यांना फर्जी कंपनीचे व्हिजिटिंग कार्ड आणि लेटरहेड तयार करून बनावट आधारकार्ड, पॅनकार्डचा वापर करून बनावट फोन पे स्क्रीनशॉट आणि UTR क्रमांक पाठवून 17,65,347 रुपयांचे केमिकल मागवून फसवणूक करण्यात आली होती.
-
कुंभमेळ्यासाठी 34 हजार कोटी हजार रुपये का ? फडणवीस यांनी दिले उत्तर
कुंभ मेळ्यासाठी 34 हजार कोटी हजार रुपये कशासाठी खर्च करतात ? असा सवाल केला जात आहे. मात्र, यातील बहुतांश व्यवस्था कायमस्वरूपी आहेत. ही व्यवस्था 50 वर्षांसाठी असणार आहे. तीर्थक्षेत्र म्हणून असलेल्या कमतरता आपण पूर्ण करत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
-
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण
जळगाव येथील चोपड्यातील बहिणीकडे जाऊन शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. निर्जलाताई देशमुख आणि सुशीलाताई गुजर या बहिणींसोबत कौटुंबिक वातावरणात पालकमंत्री गुलाबराव पाटील रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.
-
जालनात बैल घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाच्या तोंडात शेण कोंबले, गुन्हा दाखल
जालना शहरात बैल घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण करीत त्यांच्या तोंडात गोबर कोंबल्याच्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर कथित गोरक्षक असलेल्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
यावेळेस १२ कोटी भाविक नाशिकच्या कुंभाला येणार – गिरीश महाजन
यावेळेस १२ कोटी भाविक नाशिकच्या कुंभाला येणार आहेत. गर्दीचे सारे रेकॉर्ड प्रयागला तुटले होते. आता नाशिकलाही गर्दीचे रेकॉर्ड तुटणार आहेत. नाशिक ही आपली साधू महंत आणि वारकऱ्यांची भूमी आहे, यंदा देशातील गायक येत आहेत, भरगच्च कार्यक्रम आहे असे नाशिकचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
-
अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च
अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळमधील निवासस्थानच्या दिशेने लाँग मार्च
आज लाँग मार्चचा दुसरा दिवस
आतापर्यंत विद्यार्थ्यांनी केला 45 किलोमीटरचा प्रवास
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार बळवंत वानखडे यांचा पाठिंबा
काही वेळातच विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यात दाखल होणार
-
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं रिक्षा चालकांकडून स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.या निर्णयानंतर मुंबईच्या कुर्ला परिसरात ऑटो-टॅक्सी चालकांकडून जल्लोष सुरू झाला आहे. ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. चालकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत निर्णयाचे स्वागत केले.
-
सिंहस्थ कुंभमेळा निमित्त आयोजित भक्ती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन
सिंहस्थ कुंभमेळा निमित्त आयोजित भक्ती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन
गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे स्वागत
उदय सावंत, गिरीश महाजन, दादा भुसे यांची उपस्थित
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 16 दिवस सुरू आहे. मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. उपोषणादरम्यान काही विद्यार्थांची प्रकृती खालावली आहे. पेसा अंतर्गत 12 हजार पदांची भरती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. वसतिगृहातील 600 विद्यार्थी आजपासून सामूहिक उपोषणाला बसणार आहेत.
-
एमपीएससी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सएप चॅट समोर
एमपीएससी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना केलेल्या नव्या दाव्याने प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. परीक्षेआधी पेपर मिळवण्यासाठी 50 लाख भरले होते, असं तिने एका मैत्रिणीला व्हॉट्सअॅपद्वारे सांगितलं होतं.
-
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदेंची टीम नेपाळमध्ये
नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम नेपाळमध्ये दाखल झाली आहे. राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मदत करण्याचां काम सुरू आहे.
-
कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीस यांचा पुढाकार
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. 37 भाविकांना सुखरूपरित्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या भाविकांचा सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू आहे.
-
नेपाळमध्ये पुन्हा पूर येण्याची परिस्थिती
नेपाळमध्ये पुन्हा एकदा पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिबेटमध्ये पुन्हा तलाव फुटल्याची माहिती आहे. नेपाळमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
-
कुणबी जातीचे पुरावे असूनही जात प्रमाणपत्र फेटाळल्याचा आरोप
कुणबी जातीचे पुरावे असूनही जात प्रमाणपत्र फेटाळल्याचा आरोप होत आहे. संभाजीनगरमधील शीतल सोनवणे या विद्यार्थिनीने हा आरोप केला आहे. वडील, आजोबा, पंजोबांचे कुणबी जातीचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, जात प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत रद्द होण्याची भीती व्यक्त होत आहे.
-
मानसरोवर यात्रेतल्या महाराष्ट्रातील 27 पर्यटकांशी संपर्क तुटला
मानसरोवर यात्रेतल्या महाराष्ट्रातील 27 पर्यटकांशी संपर्क तुटला. त्या पर्यटकांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील तिघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीमधील सुनील सुभेदार यांच्यासह कल्याण पश्चिमेतील पाटील दांपत्याशी संपर्क होत नसून, कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे.
-
मुंबई – गोरेगाव येथे मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा सेफ्टीगार्ड कोसळला
मुंबईतील गोरेगाव येथे मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा सेफ्टीगार्ड कोसळला. हा सेफ्टीगार्ड पुलाच्या बाजूला सुरक्षेसाठी लावण्यात येतो, जेणेकरून वरून खाली कोणी पडू नये किंवा कोणताही अपघात होऊ नये. मात्र तोच सेफ्टीगार्ड कोसळल्याने खळबळ माजली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही,एक मोठा अनर्थ होता होता टळला. सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ते प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
वाशिम : शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास
वाशिमच्या मोहजा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं चक्क बोटीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या शेतकऱ्यांचा पूर्वीचा रस्ता धरणात बुडाला आणि पर्यायी मार्ग इतर शेतकऱ्यांनी अडवला त्यामुळं नवीन रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडं अर्ज केला मात्र मागील वर्षभरापासून तहसीलदार यावर निर्णय घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी चक्क ५० हजार रुपये खर्च करून बोट विकत घेतली. आणि आता तुडूंब भरलेल्या धरणातून जीव मुठीत धरून शेतात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
-
चाकण–शिक्रापूर रोडवर रक्षाबंधनाच्या दिवशी वाहतूक कोंडी
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करत असताना, चाकण–शिक्रापूर रोडवर मात्र वाहतूक कोंडीने वाहनचालकांची चांगलीच कोंडी केली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
लासलगावपाठोपाठ मनमाडमधूनही कांदा एक्स्प्रेस धावणार
लासलगावपाठोपाठ मनमाडमधूनही कांदा एक्स्प्रेस धावणार. 800 टन कांदा घेऊन ही एक्स्प्रेस चेन्नईला जाणार आहे. मनमाड रेल्वे स्थानकात कांदा भरण्याचं काम सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत ही कांदा एक्स्प्रेस रवाना होणार आहे.
-
जळगावात चहाच्या दरामध्ये तीन ते पाच रुपयांपर्यंत वाढ
जळगावात चहाच्या दरामध्ये तीन ते पाच रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. साखरेचे दर 70 ते 72 रुपयांपर्यंत पोहोचल्याने चहा विक्रेत्यांकडून चहाच्या दरात देखील वाढ करण्यात आली. चहाची किंमत 3 रुपयांनी तर इतर ग्रीन टी, लेमन टी तसेच कॉफीच्या किमतीत पाच रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 10 ते 12 रुपयांना मिळणारा चहा आता 15 ते 20 रुपयांना मिळत असल्याचं दिसत आहे. आता साखर आणि त्यापूर्वी दुधाच्या दरात झालेली वाढ परवडत नसल्याने चहाच्या दरात वाढ केल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
-
चीनच्या सिचुआनमध्ये भूकंपाचे धक्के
चीनच्या सिचुआनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर येत आहे. चीनमधील भूकंपामुळे नेपाळमध्ये पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
न्यायालयात टिकेल असं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला मिळेल- शिवेंद्रराजे भोसले
न्यायालयात टिकेल असं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होणरा नाही, याची सरकार काळजी घेणार असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
-
आम्ही मनोज जरांगेंशी संवाद साधत आहोत. ते मुंबईत येणार नाहीत- प्रसाद लाड
आम्ही मनोज जरांगेंशी संवाद साधत आहोत. ते मुंबईत येणार नाहीत, असं प्रसाद लाड म्हणाले. काही ठिकाणी जीआर पोहोचण्यात तफावत असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करतील, असंही त्यांनी सांगितलं.
-
जळगावात शिवसेना शिंदे गट आणि युवा सेनातर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा
जळगावात शिवसेना शिंदे गट आणि युवा सेनातर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. दिव्यांग बहिणीकडून राख्या बांधून घेत युवा सेनातर्फे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. आयुष्यभर तुमचं संरक्षण करू, असं आश्वासन युवा सैनिक भावांनी दिव्यांग बहिणींना दिलं.
-
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना बहिणीने बांधली राखी
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना बहिणीने राखी बांधली आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याचा घट्ट विश्वास असणारा सण म्हणजे रक्षाबंधन, असं मुरलीधर मोहोळ यावेळी म्ङणाले. रक्षाबंधन पवित्र सणाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने राजकारणात शिखर गाठू शकलो, असंही ते म्हणाले.
-
राहुल गांधींच्या दौऱ्यापर्यंत आंदोलन लांबवण्याचा डाव- बन
राहुल गांधींच्या दौऱ्यापर्यंत आंदोलन लांबवण्याचा डाव असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी काँग्रेसवर केला आहे. काँग्रेसने प्रामाणिक विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नये, असंही ते म्हणाले.
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला जातोय- नवनाथ बन
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला जातोय, असा आरोप नवनाथ बन यांनी काँग्रेसवर केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवलं जातंय, असंही ते म्हणाले.
-
मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक असतो- प्रताप सरनाईक
मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक असतो त्यामुळे तशी कारवाई होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
-
मराठी सक्तीबाबत शिंदे आणि फडणवीस यांची भूमिका एकच-सूत्र
मराठी सक्तीबाबत शिंदे आणि फडणवीस यांची भूमिका एकच, समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये झालेली चर्चा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
नेपाळमध्ये मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीम पोहोचली
नेपाळमध्ये मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीम पोहोचली आहे. नेपाळमध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-
अहिल्यानगर, नाशिक मधील 45 पर्यटक नेपाळमध्ये अडकले..
अहिल्यानगर, नाशिक मधील 45 पर्यटक नेपाळमध्ये अडकले..नेपाळमधील चितवन मध्ये पर्यटक अडकले..महापुराच्या पार्श्वभूमीवर रस्ते बंद असल्याने पर्यटक अडकले…चितवन मधील हॉटेल मध्ये पर्यटक सुरक्षित…मात्र प्रशासनाकडून अद्याप संपर्क नसल्याने चिंता वाढली.. आगामी 72 तासात धोक्याचा इशारा दिल्याने पर्यटक चिंतेत..45 पर्यटकांमध्ये अनेक सेवा निवृत्त शिक्षक दांपत्य…संगमनेर, राहता, नाशिक सह संभाजीनगर मधील 45 पर्यटक…UPI बंद तर हॉटेलचे रेट वाढल्याने आर्थिक अडचणी समोर…
-
जळगावात चोरट्यांनी बंद घर फोडून ४५ ते ४६ तोळे सोनं, दीड लाखांची रोकड केली लंपास
जळगावात विश्वकर्मा नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून ४५ ते ४६ तोळे सोन्याच्या दागिन्यासह दीड लाखांची रोकड केली लंपास. सोन्याचे दागिने आणि रोकड असा साधारण एकूण 50 ते 55 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. घरमालक उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते, मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लांबवला.. या परिसरातून जाताना एक चोरटा सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.. ठसे तज्ज्ञ, तसेच श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील ठसे आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे
-
पुण्याच्या दौंडमध्ये रुग्णालयाबाहेर कुटुंबारवर टोळक्यांकडून हल्ला
पुण्याच्या दौंडमध्ये रुग्णालयाबाहेर कुटुंबारवर टोळक्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. कारला दुचाकी घासल्याने कोयता घेऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला.
-
गोळीबारानंतर शांत झालेला गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पुन्हा पेटला
गोळीबारानंतर शांत झालेला गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पुन्हा पेटला; कल्याण पूर्वेत शेतकऱ्याचे घर तोडल्याच्या वादातून राजकीय वातावरण तापले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही विकासकांकडून घर पाडून जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा कैलास नगरमधील कुटुंबाचा आरोप; मदतीसाठी महेश गायकवाडांकडे धाव. संबंधित बांधकाम अनधिकृत असून घर चुकून तुटले, उलट महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा विकासक संतोष केंदळे यांचा दावा “माजी आमदार गणपत गायकवाडांच्या पावलावर पाऊल ठेवत विद्यमान आमदार आणि वैभव गायकवाड शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेत”; मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याचा महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप. “या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही, जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून मानहानीचा दावा दाखल करणार”; वैभव गायकवाड यांचा महेश गायकवाडांना इशारा. रहिवासी, विकासक आणि लोकप्रतिनिधींमधील वाद पोलीस ठाण्यात; मारहाण, धमकी आणि जातीवाचक शिवीगाळीच्या आरोपांवर कोळसेवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, परिसरात तणावाचे वातावरण
-
जळगावातील रेल्वेस्थानकावर तिकिटासाठी स्वतंत्र खिडकी सुरू
जळगावातील रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजच्या बाजूने तिकिटासाठी स्वतंत्र खिडकी सुरू, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे, यांच्या हस्ते तिकिटासाठीच्या खिडकीचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ रेल्वे तिकीट खिडकी सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार. शिवाजीनगर बाजूच्या प्रवाशांना नव्या तिकीट खिडकीमुळे मोठा दिलासा
-
मी आता वर्षा बंगल्यावर जाऊन बसणार- मनोज जरांगे पाटील
“कोणीही आत्महत्या करु नये, मी आता वर्षा बंगल्यावर जाऊन बसणार आहे, शिंदेनी लाडकी बहिण, फडणवीसांनी लाडकी दीदी आणली” जरांगे म्हणाले.
-
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये हालचालींना वेग
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये हालचालींना वेग! मनोज जरांगे पाटील यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये सकल मराठा बांधवांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आणि नियोजनाबाबत बैठकीत चर्चा केली जात
-
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. लाडक्या बहिणींना शुभेच्छा देणारे शहरात लागले बॅनर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनर वरून लाडक्या बहिणींना शुभेच्छा.” लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा “आशयाचे बॅनर तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर
-
व्याज परतावे दिले नाही त्यांनीही अंतरवालीत यावं- मनोज जरांगे पाटील
व्याज परतावे दिले नाही त्यांनीही अंतरवालीत यावं, कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांनीदेखील यावं, मराठ्यांनी आता जागं व्हावे, असं जरांगे पाटील म्हणाले.
-
फडणवीस सांगतात तसं विखे पाटील बोलतात- जरांगे
मुंबईत येऊन उपोषण करणार, वर्षा बंगल्यावर येऊन आंदोलन करणार, जरांगेचे उद्यापासून अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहे, मराठ्यांनी लेकराबाळांचें वाटोळं करुन घेऊ नका, फडणवीस सांगतात तसं विखे पाटील बोलतात, असं जरांगे म्हणाले.
-
नोंदी सापडलेल्या असून काहींना अर्ज दिले नाही- मनोज जरांगे पाटील
नोंदी सापडलेल्या असून काहींना अर्ज दिले नाही, ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनाही अंतरवालीत यावं, अर्ज दिलेल्या मराठ्यांनी आजपासून अंतरवालीत यावं- मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
मकरंद राजेंच्या आक्रमक भूमिकेमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ
खासदार ओमराजे निंबाळकर गद्दार, आमचे नगरसेवक पंचायत समिती सदस्य फोडायला नको होते… येत्या काळात त्यांना परिणाम भोगावे लागतील. धाराशिव मध्ये नगरसेवकांच्या फोडाफोडीनंतर राजकारण तापलं,खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात बंधू मकरंदराजे निंबाळकर आक्रमक. ठाकरे गटाच्या धाराशिव मधील चार नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत तर कळंबमधील 9 नगरसेवकांनी केला आहे भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. आमच्या शिवसैनिकाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास गंभीर परिणाम होतील, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांना मकरंदराजेंचा इशारा. तुमच्यात दम असेल तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा. मकरंद राजेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ!
-
फडणवीस आणि शिंदेंनी एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहिती- सूत्र
रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. फडणवीस आणि शिंदेंनी एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे
-
सुषमा अंधारे या महिला भगिनी आमच्या पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या- अमरावती जिल्हाप्रमुख पराग गुढधे
सुषमा अंधारे या महिला भगिनी आमच्या पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या आहे…अनिल बोंडे तुम्ही सुषमा अंधारे यांच्या बद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला…तुम्ही जर तोंड असच वाजवत राहाल तर तुमचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही…भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख पराग गुढधे यांची अनिल बोंडे यांना थेट धमकी.. अमरावती लहान बालक मेली म्हणून तुम्ही दहीहंडी रद्द केली नाही तर रवी राणांच्या दहीहंडी समोर तुम्ही पुरणार नाही म्हणून भाजप वाल्यांनी दहीहंडी रद्द केली…
-
जळगाव शेतकऱ्याने चार एकरातील मका पिकावर रोटावेटर फिरवले
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गोवर्धन गावात शेतकऱ्याने चार एकरातील मका पिकावर रोटावेटर फिरवले.. दीपक राजेंद्र पाटील यांचे मका पिकाचे नुकसान झाले असून त्यांनी मका पिकावर रोटावेटर फिरवले आहे. शेतकऱ्याने दोन वेळा मक्याची लागवड केली मात्र पाऊस जास्त झाल्यामुळे मक्याचे नुकसान झाले होते. शेतात काही मक्याचं बियाणं वाहून गेले होते तर काही ठिकाणी उगवलेल्या पिकाची नुकसान झाले. दोन वेळा लागवड करूनही उत्पन्नाची आशा नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने मका पिकावर रोटावेटर फिरवले आहे.
-
रिक्षाचालकांसाठी चालवलेली मोहिम शाहांनी केराच्या टोपलीत टाकली- संजय राऊत
रिक्षाचालकांसाठी चालवलेली मोहिम शाहांनी केराच्या टोपलीत टाकली, दिल्लीतील निर्णय आला आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय दिला, मराठी भाणा यायला पाहिजे, त्याचा निवडणुकीशी काय संबंध? असं संजय राऊत म्हणाले.
-
मुंबईचे महापौरपद शिंदे दिल्लीतून विकत घेत आहेत- संजय राऊत
“मुंबईचे महापौरपद शिंदे दिल्लीतून विकत घेत आहेत, मुंबईचा महापौर दिल्लीतून किती खोक्यांना विकत घेणार? किती रुपयांचा सौदा झाला त्याची माहिती समोर येईलच” असं संजय राऊत म्हणाले.
-
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सेवा अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सेवा अभियान राबवणार आहे. मोदी यांना आशिर्वाद देण्यासाठी घरोघरी दिवा लावला जाणार आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे.
-
अंबनाथमध्ये पोलिसांच्या नावाने व्यापाऱ्याकडून उकळली खंडणी
पोलिसांच्या नावाने ज्वेलर्स व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांकडून दोन खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे. दोन खंडणीखोरांनी पान टपरी चालकाकडूनही पैसे उकळले. या प्रकाराने व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
CM फडणवीस नाशिकमध्ये भक्ती संगम कार्यक्रमाचे करणार उद्घाटन
मुख्यमंत्री आज नाशिक मध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने भक्ती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या नूतन इमारतीचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बस अनावरण केले जाणार आहे. यांत्रिकी झाडूच्या अत्याधुनिक गाड्यांना हिरवा झेंडा हिरवा झेंडा दाखवणार आहे. अग्निशामन दलाच्या हायड्रोलिक प्लॅटफॉर्म गाडीचं देखील मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेणार आहेत.
-
Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी मंत्री महाजन यांचा संवाद
नेपाळमधील पूरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. नागरिकांना धीर देत सुरक्षिततेचे आश्वासन देत
राज्य शासनाकडून आवश्यक मदत व समन्वयाची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता २४ तास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी शासन पूर्णपण कटिबद्ध असेही गिरीश महाजन म्हणाले. -
नेपाळमध्ये मदतीसाठी एकनाथ शिंदेंची टीम दाखल
नेपाळमध्ये मदतीसाठी एकनाथ शिंदेंची टीम दाखल झाली आहे. शिवसेनेच्या युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. संकटग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मदत दिली जात आहे. स्थानिक नागरिकांना तातडीने आवश्यक असलेले साहित्य पोहोचवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.
गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी शिवसेनेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. -
नाशिकचे 40 पर्यटक नेपाळ-तिबेट सीमेवर अडकले
नाशिकच्या पंचवटी परिसरातील 40 पर्यटक नेपाळ – तिबेट सीमेवर अडकले आहेत. 17 ऑगस्टला कैलास मानसरोवर यात्रेसाठी नाशिकहून निघाले होते. 40 गुजराती पर्यटक इंडो नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सने यात्रेसाठी रवाना झाले होते. सध्या हे सर्व जण नेपाळ तिबेट सीमेवर सुरक्षित आहेत. त्यांना सुखरूप नाशिकला आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
-
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह झाले आहेत. काल कोळीवाड्यात लोकांनी तातडीनं सांगितलेल्या कामाची पूर्तता करणार्यांसाठी अधिकारी कामाला लागले. इंजिनीअर, आर्किटेक्ट अशी सगळी टीम वरळी कोळीवाडा यात काही वेळात दाखल होणार आहे. काल नारळी पोर्णिमेच्या निमित्तानं लोकांनी काही मागण्या केल्या होत्या, आज १२ तासांत कामाला सुरुवात झाली आहे.
-
…तर 600 जण सामूहिक उपोषण करणार? विध्यार्थ्यांचा सरकारला इशारा
आज सरकारने जीआर हाती दिला नाही तर 600 विध्यार्थी सामूहिक उपोषण करणार, असा इशारा विध्यार्थ्यांनी सरकारला दिला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकारकडून मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतु मागण्यांचा जीआर हातात न मिळाल्याने सोळाव्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे. सरकारला दिलेली दोन दिवसाची मुदत आज संपली आहे.
-
गोव्याच्या दिशेने जाणारा लांजा बाजारपेठेतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
गौरी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा वेगवान होणार आहे. गोव्याच्या दिशेने जाणारा लांजा बाजारपेठेतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गेली १७ वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरची रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाची कामे पुर्ण होत आली आहेत.कोकणातला नागमोडी रस्ता नेहमीच सर्वांचे मन मोहून टाकायचा.
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पा क्लोरीन वायू गळतीची घटना
नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पा क्लोरीन वायू गळतीची घटना घडली. गोधनी येथील क्लोरीन वायू गळतीची घटना ताजी असताना गुरुवारी संध्याकाळी शंकरपूर मध्येही वायू गळती झाली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. जलशुद्धीकरण प्रकल्पात 900 किलो चे सिलेंडर लावण्यात आले होते,त्याचे वॉशर निघाल्याने गॅस गळती झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
कोट्यवधींच्या नव्या प्रशासकीय इमारतींची होणार सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज भंडाऱ्यात आहेत. यावेळी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन शासकीय कार्यालयांच्या इमारतीची पाहणी करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ कोटी ५९ लाख रुपये खर्चून राज्य उत्पादन शुल्क विभागाची अद्ययावत प्रशासकीय इमारत पूर्ण झाली आहे. तर ५ कोटी ६० लाख रुपये खर्च करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची प्रशस्त इमारत सज्ज करण्यात आली आहे. या दोन्ही इमारतींच्या बांधकामाचा दर्जा, सुविधा आणि उर्वरित कामांचा प्रत्यक्ष आढावा यावेळी ते घेणार आहेत.
-
नागपूर जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले पर्यंटक चार बसने भारताकडे निघाले
नागपूर जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले पर्यंटक चार बसने भारताकडे निघालेनागपूर जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले पर्यंटक चार बसने भारताकडे निघाले. लवकरच नागपूरातील पर्यटक भारतात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित आहेत. २२ ऑगस्ट २०२६ ला नेपाळमधील काठमांडू येथे पर्यटनासाठी नागपुरातील ११० पर्यंटक गेले होते. नेपाळमध्ये महापूराच्या घटनेचा नागपूरातील पर्यटकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती आहे.
-
भोर तालुक्यात चोरट्यांचा मोर्चा आता शेतातील शेतीपपांकडे
चोरट्यांकडून बंद दुकाने,घरे,मंदिरे,घरासमोरील वाहने चोरण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाच, आता भोर तालुक्यात शेतीपंप आणि वायरच्या चोऱ्या वाढल्या आहेत. भोर शहराशेजारील नवलाई मंदिर परिसरातील विहिरीवरील विद्युतपंप चोरांनी नेला चोरून..यात संजय सुरेश जाधव शेतकऱ्याचे २५ हजाराहून अधिक नुकसान झाले.. चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींवर बसवलेले शेती पंप आणि वायर चोरण्याकडे मोर्चा वळवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
-
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी महसूल अधिकाऱ्याला झापलं
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी महसूल अधिकाऱ्याला झापलं.याविषयीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांची कामे रखडल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी महसूल अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले. परंडा येथे महसूल विभागात शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नसल्याचा आरोप करत रणजीत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. शेतकरी आपल्या कामांसाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारत असताना कामे रखडत असल्याने पाटील यांनी अधिकाऱ्याला धारेवर धरले. संतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली बारामतीतील विकास कामांची पाहणी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर असून पहाटे सहा वाजल्यापासूनच त्यांनी बारामतीतील विकास कामांच्या पाहणीला सुरुवात केली असून बारामतीतील मार्केट यार्ड या ठिकाणी रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ व प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली.
-
तलाठ्यांचा पीक पाहणी कामावर बहिष्कार
पुणे जिल्ह्यात तलाठ्यांचा पीक पाहणी कामावर बहिष्कार टाकला. शंभर टक्के पीक पडताळणीच्या सक्तीला तलाठ्यांचा विरोध केला. शेतकऱ्यांची किंवा सहा टक्के पीक नोंदणी झाली. डिजिटल क्रोप सर्वे ॲप मध्ये पीक पाहणी सहाय्यकाने केलेल्या नोंदीची शंभर टक्के करण्याच्या सक्ती विरोधात तलाठ्यांनी बहिष्कार घातलाय राज्यात केवळ एकूण क्षेत्राच्या तुलनेत त फक्त सहा टक्के नोंद झाली आहे.
-
पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कुल उपक्रमातून शाळांचा होणार कायापालट
पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कुल उपक्रमातून शाळांचा कायापालट होणार आहे. सोयी सुविधांपासून दूर राहिलेल्या आणखी 300 शाळांना नव्या रूपात आणण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन 300 जुनी शाळा नवी ओळख हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आलाा आहे. ग्रामीण भागातील वीस हजार विद्यार्थ्यांना सुरक्षित सुसज्ज आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमातून जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. गरजू शाळांसाठी हा उपक्रम असल्याची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती दि
-
वडेट्टीवार मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावतायत
वडेट्टीवार मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावतायत असा आरोप महेश डोंगरे पाटील यांनी केला आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा. मराठा क्रांती मोर्चाने मागणी केली आहे. लक्ष्मण हाके, वाघमारे यांना वडेट्टीवार रसद पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यथा वडेट्टीवारांच्या मतदारसंघात जाऊन जाब विचारू अस इशारा पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर अंतरवाली सराटीत तयारीला वेग आला आहे. निर्णायक आंदोलनासाठी ते सज्ज झाले आहेत. अंतरवालीत मंडप तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. MPSC च्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानंतर त्यातील सुरस कथा समोर आल्या. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मार्किंग पॅटर्न फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे. आज रक्षाबंधन आहे. सीमेवर आणि राजकीय रक्षाबंधन दिसेल.
मुंबई महापालिकेवर शिंदे सेनेचा महापौर बसण्याची चर्चा समोर आली आहे. याविषयीचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. गणेश मंडळांना बाप्पााच्या मूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. तर डीजेच्या परवानगीवरूनही कार्यकर्त्यांना यंदा कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. नेपाळमध्ये महाप्रलय आल्याने जनजीवन उद्धवस्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथं वाचू शकता.