Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी..

Maharashtra News : आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दिल्लीत सुनावणी आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यातच आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकताच आपल्या आमदारांना मोठ्या सूचना दिल्या आहेत.

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी..
breaking live
| Updated on: Nov 04, 2026 | 9:01 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 04 Nov 2026 09:00 AM (IST)

    दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीर केलेली 5 हजारांची अग्रीम मदत खात्यात जमा

    दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिवाळीपूर्वी जाहीर केलेली 5 हजार रुपयांची अग्रीम मदत आता खात्यात जमा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 320 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे एकूण 196 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शासनाकडून अनुदान प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली. जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅकवरील माहितीच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली असून, दिवाळीपूर्वी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास आता सुरुवात झाली आहे.

  • 04 Nov 2026 08:55 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर दरोडा प्रकरणी मोठी बातमी!

    शासकीय कार्यकारी अभियंता खान अब्दुल फरीद यांचे अपहरण करून दरोडा टाकणारे आरोपी निघाले बदली ड्रायव्हर! २४ तासांत कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना संभाजीनगरमधून ठोकल्या बेड्या! आकाश उसारे ,गोपाल बनमावत उर्फ राजपूत, लहू बारवार,दुर्गेश फतपुरे ,आकाश शेवाळे असे पाचशे आरोपीचे नाव असून इतर साथीदारांचा शोध सुरू


  • 04 Nov 2026 08:50 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याची दहशत! आता थेट बाजारपेठेतच मुक्तसंचार

    रत्नागिरी जिल्ह्यात आता बिबट्या थेट मानवी वस्तीतच नव्हे, तर बाजारपेठांमध्येही शिरू लागला आहे. संगमेश्वरच्या आठवडा बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २२ आणि २७ ऑक्टोबरला गल्लीत दर्शन दिल्यानंतर आज पहाटे बिबट्याने थेट घराच्या कंपाऊंडवरून उडी मारली.

  • 04 Nov 2026 08:40 AM (IST)

    फायनान्स कंपनीच्या कार्यालयात अल्पभूधारक शेतकरी मृत्यू प्रकरण

    उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांना एसआयटी प्रमुख पदावरून हटविले. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची एसआयटी प्रमुख पदी निवड. मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. या भेटीदरम्यान एसआयटी प्रमुखाला बदलून अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना एसआयटी प्रमुख करण्याची मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओसएसडीकडे केली

  • 04 Nov 2026 08:35 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यातील 65 अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी…

    दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात आली….


  • 04 Nov 2026 08:30 AM (IST)

    परभणीत दुष्काळाची दाहकता..

    परभणी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळामुळे गावं निर्मनुष्य व्हायला लागली आहेत. जिंतूर तालुक्यातील जोगी तांडा येथील 80 टक्के पेक्षा अधिक ग्रामस्थांनी कामाच्या आणि पाण्याच्या शोधात गाव सोडल आहे. गावात उरली ती फक्त म्हातारी आणि शाळकरी मुलं.. गावात पाणी नसल्याने सत्तरी गाठलेल्या वृद्धांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे..

आज राज्य मंत्रिमंडाळाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचे उद्घाटन होईल. आदित्य ठाकरे आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असणार आहेत, दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधणार. आज शरद पवारांना आज डीस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.  शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. रोहित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सिंहस्थ कुंभमेळा कामांची पाहणी करणार आहेत. कोल्हापूर ऊस दरासाठीच्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा उद्या दुसरा दिवस आहे उद्यापासून हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टीने दिला आहे. इतरही महत्वाच्या घडामोडींकरिता टीव्ही9 चा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us