Maharashtra News LIVE : 4 तारखेला ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली

Maharashtra News LIVE : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडांवर पालिका कुऱ्हाड चालवण्याच्या तयारीत आहे. याबाबत बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत लेखी स्वरुपात या प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Maharashtra News LIVE : 4 तारखेला ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली
Big Breaking
| Updated on: Oct 01, 2026 | 10:00 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Oct 2026 10:00 AM (IST)

    दुष्काळामुळे अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

    दुष्काळामुळे अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. पुढील वर्षीच्या जून-जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, सिंचनासाठी कमी आवर्तने देण्यात येणार आहे. यंदा सिंचनासाठी जास्तीत जास्त फक्त दोन आवर्तने मिळण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात पावसाची तब्बल 43 टक्के तूट आहे. सिंचन प्रकल्पांत फक्त 61 टक्के जलसाठा भूगर्भातील जलपातळी झपाट्याने घटण्यास सुरुवात झाली आहे.

  • 01 Oct 2026 09:54 AM (IST)

    घोटी येथून आदिवासी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च पोहचला बोरटेंभे शिवारात

    घोटी येथून आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान लाँग मार्च हा बोरटेंभे शिवारात पोहोचला आहे. बोरटेंभे येथील दशमेश गुरुद्वारा यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.


  • 01 Oct 2026 09:50 AM (IST)

    १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार मूळचे चेंबूरचे

    अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यासारखी भीषण दुर्घटना टाळत १८० प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धाडस दाखवणारे कॅप्टन स्मित मच्छार हे मूळचे मुंबईतील चेंबूरचे रहिवासी आहेत. चेंबूरमधील स्वास्तिक हाइट्स येथे त्यांचे आई-वडील राहतात. स्मित हे देखील काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्यासोबतच राहत होते.

  • 01 Oct 2026 09:40 AM (IST)

    लातूर शहराला आता सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा

    लातूर शहराला आता सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन चार दिवसातून एकदा करण्यात येणारा पुरवठा आता सहा दिवसानंतर एकदा करण्यात येणार आहे.

  • 01 Oct 2026 09:30 AM (IST)

    मका करपला नाही, तर शेतकऱ्यांची स्वप्नंही करपली; दुष्काळाचं भीषण वास्तव

    गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने करगाव शिवारातील मका पिकाला मोठा फटका. अडीच एकरांवरील मका पूर्णपणे करपला आहे. एकही कणीस नीट भरलं नाही. मका पिकातून उत्पादन तर नाहीच, मात्र जनावरांसाठी चाराही निघणार नसल्याने शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान.


  • 01 Oct 2026 09:20 AM (IST)

    तात्काळ उपाययोजना करून चारा छावण्या उभाराव्यात, शेतकऱ्यांची मागणी

    जालना जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यांच्या कालावधीपासून पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिकच जाणवत असल्याने खरीप हंगामातल्या पिकाबरोबर आता जनावरांना देखील फटका बसलाय. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने पशुपालक उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेच वातावरण आहे. त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करून चारा छावण्या उभाराव्यात जालना जिल्ह्यातल्या पशुपालक शेतकऱ्यांनी केली,

  • 01 Oct 2026 09:10 AM (IST)

    सोलापूर शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराला मार्च 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखीव आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी तुटवडा होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना होत आहेत. सोलापूर शहराला आता नियमित 3 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा 4 दिवसाआड केला जातो की काय असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.

  • 01 Oct 2026 09:02 AM (IST)

    सोलापूर शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला 

    सोलापूर शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला आहे.  सोलापूर शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो.  मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराला मार्च 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखीव आहे.  त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी तुटवडा होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना होत आहेत.

  • 01 Oct 2026 09:00 AM (IST)

    पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान

    जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. मेहनत वाया गेली, लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत. लाल पडलेल्या कापूस पिकामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. लागवडीचा खर्चही निघणार नसल्याची शेतकऱ्यांना भीती.

  • 01 Oct 2026 08:53 AM (IST)

    ध्वजारोहणापूर्वी गोदा घाट परिसरात युद्धपातळीवर काम सुरू

    31 ऑक्टोबर रोजी गोदाघाटावर होणार सिंहस्थाचा ध्वजारोहण सोहळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील अनेक मंत्री राहणार उपस्थित. ध्वजारोहण पूर्वी गोदाघाटवरील कामांना आला वेग. घाटांचे सुशोभिकरण, नवीन घाट बांधणे तसेच गोदाघाटचे सौंदर्यीकरण सुरू. कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान.

  • 01 Oct 2026 08:32 AM (IST)

    लालबागच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या वीटेची १ कोटी ५५ लाख रुपयांना विक्री

    लालबागच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या वीटेची १ कोटी ५५ लाख रुपयांना विक्री. लालबागचा राजाच्या दागिन्यांच्या विक्रीतून ३ कोटी २२ लाख रुपये जमा. लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव काल करण्यात आला.

     

  • 01 Oct 2026 08:31 AM (IST)

    ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली

    4 तारखेला ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली. गर्जना, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी अशी असेल मोर्चाची टॅग लाईन. भायखळा येथील रिचर्डसन अँड कृडास कंपनी ते मुंबई महानगर पालिका असा असेल मोर्चा

सांगलीची डीसीसी बँक म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, त्यामुळे कोंबडीचे सगळी अंडी आपल्यालाच मिळावं, यासाठी खासदार-आमदार सहपरिवार अर्ज भरायला लागलेत,अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी अप्रत्यक्षरीत्या खासदार विशाल पाटलांसह विरोधकांवर केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटलांनी आपली पत्नी व आईसर उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक समविचारी पक्षांना घेऊन आणि जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन लढवली जाईल,अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,त्यानंतर ते बोलत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us