Maharashtra Live News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवासी बसला भीषण आग

Maharashtra Live News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबर पर्यंत मदत जाहीर करा अन्यथा विदर्भातून जाणारा समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.

Maharashtra Live News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवासी बसला भीषण आग
Breaking
| Updated on: Sep 24, 2026 | 9:50 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Sep 2026 09:50 AM (IST)

    जळगावमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

    जळगावातील पाळधी-तरसोद बायपासवर पुन्हा अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. बायपासवर असोदा पुलाजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दिली. युवराज भिका सोनवणे वय ३४ वर्ष आणि पवन अनिल चौधरी वय २९ वर्ष अशी मयत दोघांची नावे आहेत. अज्ञात वाहनाची धडक एवढी जोरदार होती की अपघातात दुचाकीच्या समोरील भागाचा चुराडा झालाय. पाळधी तरसोद बायपासचा भराव खचल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू असून एकापाठोपाठ तीन अपघात झालेत.

  • 24 Sep 2026 09:45 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस आज वाशिममध्ये दुष्काळी स्थितीची पाहणी करणार

    वाशिम जिल्ह्यात आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत. वाशिममध्ये सोयाबीनची सुमारे ७५ टक्के क्षेत्रावर पेरणी होते. या सोयाबीनच्या भरवशावर शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र यंदा पावसाने तब्बल ५० दिवसांचा खंड दिलाय, त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय. अनेक भागातील सोयाबीन पीक हातचे गेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय.


  • 24 Sep 2026 09:33 AM (IST)

    ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाहीच : राज ठाकरे

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भूमिका ठाकरेंनी घेतली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

  • 24 Sep 2026 09:24 AM (IST)

    दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

    दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्री मंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. प्रत्येक आठवड्याला उपसमिती राज्यातील दुष्काळाचा आढावा घेणार आहे. तसेच दुष्काळाचा आढावा घेऊन समिती उपाययोजना सुचविणार आहे.

  • 24 Sep 2026 09:06 AM (IST)

    नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा प्रवास होणार आणखी स्मार्ट

    नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा प्रवास आणखी स्मार्ट आणि वेगवान होणार आहे.  जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ने डीजी यात्रा सुविधा सर्व सक्षम गेटवर सिंगल स्टेप फेस रिकग्निशन तंत्रज्ञान सुरू केले आहे. त्यामुळे डीजीयात्रावर नोंदणी केलेल्या प्रवाशांना आता विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बोर्डिंग पास स्कॅन करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच चेहरा ओळखल्यानंतर गेट आपोआप उघडणार आहे.


  • 24 Sep 2026 08:55 AM (IST)

    शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

    शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा. दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई. बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना महिलांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अंतरिम दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने कायदेशीर बाबी विचारात घेता गायकवाड यांच्याविरुद्ध पुढील आदेशापर्यंत दोषारोप पत्र दाखल करण्यास मनाई केली आहे.

  • 24 Sep 2026 08:53 AM (IST)

    चाळीसगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट

    चाळीसगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट; आमदार मंगेश चव्हाणांकडून शेतशिवाराची पाहणी. हिरापूर, हातगाव, शेवरी परिसरातील करपलेल्या खरीप पिकांची आमदारांनी केली पाहणी. 50 दिवसांपासून पावसाचा खंड; शेतकऱ्यांसह जनावरांच्या चारा-पाण्याचे संकट. चाळीसगावचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेशासाठी पाठपुरावा करण्याचे आमदार चव्हाण यांचे आश्वासन. लोकप्रतिनिधी म्हणून मी शेतकऱ्यांसोबत असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले

  • 24 Sep 2026 08:29 AM (IST)

    मुंबईत विसर्जनानंतर अर्धवट मूर्तीचे फोटो काढणे पडणार महागात

    मुंबईत विसर्जनानंतर अर्धवट मूर्तीचे फोटो काढणे पडणार महागात. पोलिसांतर्फे देण्यात आलाय कायदेशीर कारवाईचा इशारा. विसर्जनानंतर गणपतीच्या अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून येतात अथवा काही मूर्ती पाण्यावर तरंगतात. अशा मूर्तीचे फोटो काढून ते समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्यांनो सावधान!. धार्मिक भावना दुखावणारा हा प्रकार करणाऱ्यांवर पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत.

  • 24 Sep 2026 08:28 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवासी बसला भीषण आग

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रवासी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. किलोमीटर 16 च्या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर ही घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवासी बसने अचानक पेट घेतला. किलोमीटर 16 च्या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

नागपूर विभागात गुटख्यावर मोठी कारवाई. नागपूर विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध साठ्यावर छापे टाकून ३१.८३ लाख रुपयांचा साठा व १९.६० लाख रुपयांची ३ वाहने जप्त करण्यात आली असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये प्रवासी बसमधून ५,००० किलो मिठाई जप्त. अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या ‘वेलकम ट्रॅव्हल्स’च्या प्रवासी बसवर छापा टाकून अत्यंत अस्वच्छ वातावरणात मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारी ५ हजार किलो संशयित भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे वाळून गेले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us