Maharashtra News LIVE : पुण्यात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, 5 जणांना अटक
Maharashtra News LIVE : हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES
-
बदनापूर नगरपंचायतच आता कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र
जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायतच आता कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून आलं. नगरपंचायत कार्यालयाच्या मुख्य इमारती शेजारीच मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचरा साचल्याने या परिसरातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जातं आहे.
-
MPSC परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा
एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप. अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांचा धक्कादायक दावा. परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे प्रश्न-उत्तरे असल्याचा आरोप. व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य उत्तरे पाठविल्याचा दावा. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचाही आरोप. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
-
-
पुण्याच्या राजगुरुनगर येथील एका पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन मिळत असल्याचा आरोप
पुण्याच्या राजगुरुनगर येथील एका पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे इंधन गाड्यांमध्ये भरल्याने अनेक वाहने बंद पडली आहे त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करवा लागला आहे. बाटलीत पेट्रोल घेतल्यानंतर या मध्ये पाणी मिश्रित असल्याची बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
पुणे शहरात डेंगूच्या रुग्णात लक्षणीय वाढ…
पुणे शहरात डेंगूच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीवरून डेंगूच्या रुग्णात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. अवघ्या दीड महिन्यात एकूण 300 संशयित डेंगू रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. पावसामुळे विविध ठिकाणी साचणारे पाणी त्यातून होणारी डासांची पैदास आणि बदलते हवामान यामुळे डेंगूचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
-
जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी; पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाचा मुक्काम कायम असून गेल्या आठवडाभरापासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सध्या झालेल्या या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. सध्या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के पावसाची तूट असून २३ टक्के पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता.
-
-
नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो
नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाला आहे. दिंडोरी नगरपंचायत, कसबे वणी व परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून उन्हाळ्यातील पाणीटंचाईनंतर धरण भरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात शेती व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार. ओझरखेड धरण भरल्याने लखमापूर औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न सुटलाा आहे.
-
साता समुद्रापार इंग्लंडमध्येही दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर
छत्रपती संभाजीनगर : साता समुद्रापार इंग्लंडमध्येही विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला आहे. बेसिंगस्टोकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली . मराठी बांधवांनी टाळ-मृदुंग, दिंडी आणि अभंगांनी सोहळा रंगवला. परदेशातही महाराष्ट्राच्या वारीची परंपरा जपली गेली.
-
नांदेड – भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले,एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी, घटना सिसिटीव्हीत कैद
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातात सोनारी येथील जिकरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना सरसम येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र नांदेडला नेत असताना शेख सोहेल शेख जहीर यांचा मृत्यू झाला आहे. तर शेख जिकरान शेख सिराज यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात शुभेच्छांच्या बॅनरबाजीची चर्चा
कुणी पक्ष बदलले कोणी झेंडे बदलले परंतु आम्ही ना पक्ष बदलला ना झेंडा बदलणार इमान विकला नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणारी आमची अवलाद नाही मातोश्री परिसरात बॅनरमधून राजकीय संदेश… कलानगर आणि मातोश्री परिसरात शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा बॅनर झळकले आहेत.
-
नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो
नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाला आहे. दिंडोरी नगरपंचायत, कसबे वणी व परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईनंतर धरण भरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात शेती व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ओझरखेड धरण भरल्याने लखमापूर औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न सुटला आहे.
-
दोन दिवसाच्या विश्रांती नंतर विरार मध्ये पावसाची रिमझिम सुरू
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विरारमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. पहाटे पासून पावसाने रिमिझिम सुरू झाली असून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहेत. हवेत गारवा पसरला असून, आभाळ भरून आलेले आहे.
पुण्यातील आंबेगाव परिसरात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंबेगाव पोलिसांनी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आणला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या मेपीवन या औषधी इंजेक्शनच्या 50 बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मेपीवन औषधी इंजेक्शन हे नशेसाठी आणि शरीरसौष्टवसाठी वापरले जाते अशी वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती आहे. तर शिरुर तालुक्यात बिबट्याचा थरार पाहायला मिळाला आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे–गुणाट रोडवरील गुणाट परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग आज देखील कायम आहे. तर जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.