Maharashtra News LIVE : विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीसाठी रोहित पवार दिल्लीत

Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीसाठी रोहित पवार दिल्लीत
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 12:29 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 07 Mar 2026 01:00 PM (IST)

    अर्थसंकल्पात सगळ्या घटकांना दिलासा

    संपूर्ण अर्थ संकल्प जो आहे सगळ्या घटकांना स्पर्श करणारा आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मध्ये 23 हजार किलोमीटर चे रस्ते होणार आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष होणार आहेत. त्यानिमित्ताने देखील मोठ्या प्रमाणात काम होणार आहेत. सामाजिक समता म्हणून हे वर्ष साजरे केले जाणार आहे असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

  • 07 Mar 2026 12:50 PM (IST)

    शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

    धुळे जिल्ह्यातील चोर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. शिंदखेडा तालुक्यात विक्रांत येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकर्‍यांकडून जमीन देण्यात आली होती. जमीन घेऊन देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष आणि दिशाभूल केल्याने सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन केले.

  • 07 Mar 2026 12:40 PM (IST)

    शेतकरी मदतीवरून पाशा पटेल भडकले

    युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी,कांदे इतर पडून आहेत यावर शेतकऱ्यांना मदत मिळणार का या प्रश्नावर एक पाशा पटेल भडकले.पाशा पटेल शेतकरी प्रश्नावर भडकले. मी पन्नास वर्ष शेतकऱ्यांसाठी काम केलेल्या माणसाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारत आहात.विषय अवघड आहे जरा समजून घ्या असे ते म्हणाले.

  • 07 Mar 2026 12:30 PM (IST)

    प्लास्टिकला बांबूचा पर्याय -पाशाभाई पटेल

    बांबू पदर्शन मांडले आहे याचा जगभरातील कलाकार सोबत तुलना केली तर आपण मागे आहोत, बांबू हे प्लास्टिकला पर्याय असू शकतो, बांबू न तोडला तर मरतो. माझा चष्मा घड्याळ बांबूचे आहे,या सगळ्या गोष्टी बांबू पासून बनणार असतील तर हा नवीन चमत्कार आहे. आपल्या सगळ्यांचा अस्तित्व समरूपाच्या दिशेने सुरुवात झाली आहे असे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल म्हणाले.

    फॉसिल फ्युएल बंद करावा लागणार आहे आणि बायो फ्युएल करावा लागणार आहे, लाकडाच्या बाबतीत अग्रेसर व्हायचं म्हणले तर वीस तीस वर्षे लागतील.. मानव जात वाचवण्यासाठी हे आहे.मी बांबू समर्थक आहे.काल महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये 4 हजार 300 कोटी बांबू साठी देण्यात आले आहेत, इन्व्हेस्ट वाढवणार आहे. शेतकऱ्याला अनुदानही सरकार देणार आहे, असे पटेल म्हणाले.

  • 07 Mar 2026 12:21 PM (IST)

    बाळ विक्री प्रकरणातील आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

    गोंदिया येथील डॉ. नितेश वाजपेयी यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात अधिक तपास केला असताना आणखी एक बाळ डॉक्टरने विक्री केला असल्याचं उघड झालं. त्या बाळाची आई ही अल्पवयीन मुलगी होती. पीडित मुलगी छत्तीसगड राज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया येथे आली होती.

  • 07 Mar 2026 12:10 PM (IST)

    लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक घटली

    लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक घटली. कांदा आवक घटल्याने कांद्याचे बाजारभाव अंशतः स्थिरावले. आज 685 वाहनांतून कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीतजास्त 1300 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. तर 400 ते 700 रुपये दराने कांदा खरेदी सुरू आहे.

  • 07 Mar 2026 12:00 PM (IST)

    युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेल डीलरवर?

    ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल असा मॅसेज तेल कंपन्यांनी पुण्यातील पेट्रोल डिझेल डीलरला आले आहेत. कालपासून पुण्यातील अनेक डीलर्सला पेट्रोल कंपन्यांचे मेसेज आले आहेत. युद्ध पेटल्यामुळे येणाऱ्या तेलावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे रोज पेट्रोल डिझेल हवा असेल तर ॲडव्हान्स पैसे भरा असं डीलर ला त्या त्या कंपनीने मेसेज करून सांगितले आहे. अगोदर आठ-आठ दिवसाचं क्रेडिट पेट्रोल डीलरला मिळत होते मात्र आत्ता असं मिळणार नाही असं कंपन्यांकडून सांगण्यात आला आहे.

  • 07 Mar 2026 11:57 AM (IST)

    मधमाश्या काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहरित पडून मृत्यू..

    वाशिम तालुक्यातील काटा ते वाशिम रस्त्यावर असलेल्या दागडिया यांच्या शेतातील विहिरीवर मधमाश्यां काढण्यासाठी गेलेल्या कोंडाळा येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोंडाळा गावातील ३६ वर्षीय भानुदास शिंदे हे मधमाश्यांचे महुळ काढण्यासाठी विहिरीवर गेले असता अचानक माश्यांनी डंख मारल्याने ,ते घाबरून विहिरीत पडले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….

  • 07 Mar 2026 11:47 AM (IST)

    केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील शेतकऱ्याने खिल्लारी गाईचे घातले डोहाळे जेवण

    केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील शेतकरी अनिल राख यांनी आपल्या पिल्लू नावाच्या खिल्लारी गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी महिलांनी गाईची ओटी भरली, या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी शेकडोच्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गौमातेच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने संपूर्ण गावाला गोड जेवण केले होते. याचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

  • 07 Mar 2026 11:35 AM (IST)

    मुंबईतील वर्सोवा येथील एका १० मजली इमारतीचा वरचा मजला पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईच्या वर्सोवा सात बंगला परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी सात बंगला परिसरात १० मजली इमारत रीडेव्हलपमेंटमध्ये गेली होती, या इमारतीचं डेमोलेशन कुठल्याही नियमांचा पालन न करता सुरू होती.  आता इमारतीचा मोठा भाग खाली कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ १० दिवसांपूर्वीचा आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मात्र या इमारतीचा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इमारत आहे त्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  कुठलेहीे नियम न पाळून सुरक्षा व्यवस्था न करता डेमोलेशन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.

  • 07 Mar 2026 11:25 AM (IST)

    पेट्रोल पंप कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून आगाऊ पैसे घ्यायला केली सुरुवात

    नाशिक येथे  पेट्रोल पंप कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून आगाऊ पैसे घ्यायला सुरुवात केली. यापूर्वी दोन दिवसांचे क्रेडिट दिले जायचे मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आगाऊ पैसे घ्यायला कंपन्यांनी सुरुवात केली. भारताकडे पुरेसा पेट्रोल डिझेल स्टॉक शिल्लक मात्र युद्ध किती दिवस चालणार याबाबत शासंकता आहे.  त्यामुळेच आता कंपन्यांकडून आगाऊ पेमेंट घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे.  पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यास सर्वसामान्यांना थेट बसणार युद्धाची झळ…

  • 07 Mar 2026 11:13 AM (IST)

    शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा सत्कार

    शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला आहे. सोलापुरातील मोदी परिसरातील मूळ झोपडपट्टीतील घरी जात वाघमारेनी घेतली आप्तेंष्टांची भेट घेतली. परिसरातील महिलांकडून ज्योती वाघमारे यांना ओवाळणी करत त्यांचे स्वागत केले जात आहे.

  • 07 Mar 2026 10:50 AM (IST)

    चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, थेट मध्यरात्रीच..

    धाराशिवच्या वाशीमध्ये मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. वाशी शहरातील कळंब रस्ता येथील चौकात मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराज यांचा सुमारे सहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवला. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल,घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता

     

  • 07 Mar 2026 10:40 AM (IST)

    केडीएमसीच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; एक्स्पायर्ड मशीनवर रुग्णांची परीक्षा

    2025 डिसेंबर मध्येच रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या एक्स-रे मशीनवरच दररोज 150 ते 200 रुग्णांचा एक्स-रे. रजिस्ट्रेशन रेडिएशन सर्टिफिकेट नसल्याने एक्स-रे च्या वेळी अधिक रेडिएशन होत असल्याने रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता. केडीएमसीचा भोंगळ कारभार मुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ? … संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळे याची तक्रार देत मागणी

  • 07 Mar 2026 10:30 AM (IST)

    जीएसटीच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह खाजगी व्यक्तीला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडले

    नाशिकमध्ये जीएसटीच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह खाजगी व्यक्तीला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. नाशिकमध्ये मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात या जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांनी मागितली होती 1 कोटी 25 लाखांची मागणी. तडजोडी अंती एक कोटीची रक्कम निश्चित करून घेतला 20 लाखांचा पहिला हप्ता

  • 07 Mar 2026 10:21 AM (IST)

    इराणचा साैदी अरेबियामध्ये अत्यंत मोठा हल्ला, थेट..

    इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर हल्ला केला आहे, जिथे अमेरिकन सैन्य तैनात आहे. या हल्ल्यात तळावर काम करणारे अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

  • 07 Mar 2026 10:20 AM (IST)

    मलकापूर शहरातील तणावाची परिस्थिती निवळली

    बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातील अब्दुल हमीद चौकात लहान मुलांच्या वादांमुळे दोन गट आमने सामने आले होते.. याचा रूपांतर दगडफेकीत झाल्यावर तणावावी परिस्थिती निर्माण खाली होती .. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात तणावाची परिस्थिती निवळली असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 07 Mar 2026 10:18 AM (IST)

    उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली होती- संजय राऊत

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी त्यांनी कर्जमाफी केली होती, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

  • 07 Mar 2026 10:05 AM (IST)

    शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून हटके जल्लोष

    मुलीची सभापतीपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून हटके जल्लोष.  बापलेकीचा डीजेच्या तालावरचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा भन्नाट डान्स. शिवसेना भाजपामध्ये सभापती पदावरून होती रस्सीखेच, महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला सभापतीपद

  • 07 Mar 2026 09:48 AM (IST)

    कल्याणमध्ये कुख्यात पीडी भाईंची दहशत; रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

    कल्याणमध्ये कुख्यात पीडी भाईंची दहशत; रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. “तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो! असे सांगत रेल्वे कंत्राटदारला भर चौकात 5–6 साथीदार सोबत बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत कंत्राटदार विशाल नायडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्या  डोक्याला 9 टाके पडले. रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

  • 07 Mar 2026 09:32 AM (IST)

    नाशिक – युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार ?

    नाशिक-  युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर सध्या धास्तीचे वातावरण असून अनेक पंप चालकांना कंपन्यांकडून आगाऊ रक्कम देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी शक्यता आहे.   सध्या पेट्रोल 104.77 रुपये प्रति लीटर तर डिझेल 91.28 रुपये प्रति लिटर आहे.

  • 07 Mar 2026 09:23 AM (IST)

    परभणी- सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एसीबीच्या सापळ्यात

    परभणी- सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एसीबीच्या सापळ्यात अडकला.  बिट जमादार भगवान मुंडेला 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक करण्यात आली. निळा फाटा येथील रसवंती गृहात बेड्या ठोकण्यात आल्य.  गोशाळेतील मुलीने केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी मुंडे यांनी 10 हजारांची लाच मागितली होती.

  • 07 Mar 2026 09:05 AM (IST)

    नाशिक – वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांवर परिणाम….

    लासलगाव  – वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांवर परिणाम होताना दिसत आहे.  द्राक्षांची प्रतवारी टिकवण्यासाठी सफेद कापडाचे अच्छादन टाकण्याचा प्रयोग लासलगाव परिसरात शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र द्राक्ष बागांवर कापड टाकण्यासाठी एकरी 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च येत आहे.  वाढत्या खर्चामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत.

  • 07 Mar 2026 09:04 AM (IST)

    इराण-अमेरिका युद्धाच्या झळा भारतापर्यंत, गॅस सिलिंडर्चाय दरात 60 रुपयांची वाढ

    इराण-अमेरिका युद्धाच्या झळा भारतापर्यत पोहोचल्या असून त्याचे चटके भारतातील नागरिकांना बसणार आहेत.  घरगुती सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली असून नवे दर आजपासू लागू केले जाणार आहेत. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला असून घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Gas) तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसू शकतो. दोन लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज; “सातबारा कोरा करा”ची जोरदार मागणी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकरी नाराज आहेत. रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमधून जाणून घेण्यात येतील.

Follow Us