Maharashtra Political Crisis | अजित पवार Action मोडमध्ये, उचललं एक महत्वाच पाऊल

Maharashtra Political Crisis | आतापर्यंत शांत वाटणारे अजित पवार Action मोडमध्ये आले आहेत. यापुढची सर्व लढाई आणखी तीव्र होत जाणार आहे. अजूनपर्यंत तरी परस्परांवर शाब्दीक टीका टाळण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis | अजित पवार Action मोडमध्ये, उचललं एक महत्वाच पाऊल
NCP Ajit Pawar
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 04, 2023 | 10:32 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलाथपालथ सुरु आहे. अजित पवार यांनी बंड केलय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट सोबत असल्याचा अजित पवार यांचा दावा आहे. सध्या अजित पवारांसोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे नेते मंचावर एकत्र दिसतायत. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार, नेत्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही राजकीय लढाई आणखी तीव्र होईल.

काल अजित पवार यांनी जयंत पाटील यांना हटवून त्यांच्याजागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्याशिवाय प्रतोद, प्रवक्त्याच्या नेमणूका जाहीर केल्या. शरद पवार यांच्या गटाने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघांना अपात्र ठरवण्यासाठी अजित पवार गटाने पावल उचलली आहेत.

आता पुढची लढाई कुठली?

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट जुन्या नियुक्त्या रद्द करुन नव्याने आपल्या समर्थकांची निवड करत आहेत. विधिमंडळातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आपल्याबाजूने असल्याचा अजित पवार यांचा दावा आहे. आता पक्ष संघटनेवर पकड मिळवण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.

अजित पवार यांनी काय पावल उचलली?

शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सूत्र हलवतायत. आता उपमुख्यमंत्री अजित पवारही Action मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत येण्यात आवाहन केलं आहे. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष त्यांचा निर्णय कळवणार आहेत.

कधी आहे बैठक?

येत्या 5 तारखेला अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीसाठी अजित पवारांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला येण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.

कुठे आहे मेळावा?

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. बांद्रा येथील एमआयटीच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन केलं आहे. मेळाव्याला राज्यभरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी येणार असल्याची माहिती आहे.