करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा
करुणा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसकडून संघटनावाढीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. राहुल गांधी यांच्यसहित राज्यातही अनेक कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. कथित मतचोरी आणि एसआयआरच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारविरोधात गंभीर आरोप करू लागले आहेत. राज्यातही काँग्रेस पक्षाकडून आंदोलनाची हाक दिली जात आहे. याच काँग्रेसमध्ये मुंडे नाव घुमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात भाजपमध्ये मुंडे आहेत. तर आता काँग्रेसमध्येही एका मुंडेंची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. करुणा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय समीकरणांची नांदी होणार का, अशी चर्चा सुरू आहे. मुंडे नाव आता काँग्रेसमध्येही घुमणार का, असा सवाल लोकांकडून करण्यात येत आहे. या भेटीनंतर करुणा मुंडे यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण काय आणि करुणा मुंडे आगामी काळात कोणती राजकीय भूमिका स्वीकारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.
कोण आहेत करुणा मुंडे?
करुणा मुंडे यांचं आधीचं नाव करुणा शर्मा असे आहे. त्या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी असल्याचा दावा केलाय. यासाठी त्याने कोर्टात अनेक पुरावे सादर केलेत. या कागदपत्रात स्वीकृतीपत्र, अंतिम इच्छापत्र, कौटुंबिक कागपदपत्राचा देखील समावेश आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. त्या सामाजिक आणि राजकीय पक्षाचं कामकाज देखील सांभाळतात. धनंजय मुंडे यांच्याशी 27 वर्षांहून अधिक काळ संबंध असल्याचा त्यांचा दावा आहे. या दाव्यावरून त्यांनी करुणा शर्मा वरून नाव हे करुणा धनंजय मुंडे असं बदललं आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे यांचा कायदेशीर पत्नी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु धनंजय मुंडे यांच्याकडून हक्क नाकारला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.